NiKi

NiKi

Wednesday, March 7, 2012



तुझ्याविना या भकास वाटा
तुझ्याविना हा प्रवास खोटा
तुझ्यामुळे ही मिजास आहे
तुझ्याविना मी उजाड आहे
तुझ्याच तारांमुळे मनाची सुरात आली सतार आहे
तुझ्याविना या जगात माझा जगावयाला नकार आहे

तुला बघावे किती दिशांनी तुला स्मरावे किती खुणांनी
मरून व्हावे जिणे सुगंधी अशी गुलाबी कट्यार आहे

कधी अबोला कधी दुरावा कधी तुझ्याशी उगाच त्रागा
तारीहि वर्षाव काळजीचा तुझ्यात प्रीती अपार आहे

बघा जरा हे जपून वाचा धरून ठेवा हृदय उराशी
नसेल माझा प्रभाव साधा अजून शब्दास धार आहे

हवे तसे ती करीत नाही खट्याळ हट्टी असे प्रिया ही
दुखावणाऱ्या तिच्या ढगाला तरी सुखाची किनार आहे

तुझ्या कृपेचा सदा ऋणी मी तुला विनाधाक मागतो मी
चिता जळावी अहंपणाची मनात अंधार फार आहे

No comments:

Post a Comment