अश्याच एका रम्य संध्याकाळी , तू असावी माझ्या जवळी , समुद्र किनारी बसून गर्दीतल्या एकांतात , सुचाव्यात दोघांनाही गाण्याच्या काही ओळी , ... सूर्य मावळत होता , माझ्या भावना उमाळत होत्या , माझ्या मनाप्रमाणे , हा समुद्रही उधाणलेला होता .. आजचा दिवस माझ्या साठी , खूप मोठा होता , तू नसली तरी काही हरकत नव्हती पण कमीत कमी तुझा आवाज सोबत हवा होता ... मावळत्या सूर्याची सोनेरी वलये , उगीचच तुझ्या केसांची सर करू पाहत होत्या , एका मागून एक येणाऱ्या लाटा , तुझ्या न संपणाऱ्या गप्पांची आठवण करून देत होत्या ! पाण्यात पाय बुडवून उभा राहिलो , नेहमी सारखी वाळू तेव्हा पायाखालची सरकली , पडता पडता सावरलो तेव्हा , एकटे असल्याची जाणीव झाली ... घरी परत निघतांना , समुद्र जरा जास्तच उधाणाला , पाऊस पाडून माझ्या वर तो रडू देखील लागला .. हताश होऊन असे जाऊ नकोस मित्रा , असे खचून जायचे नसते , दुःखा प्रमाणेच सुख सुद्धा आजकाल , एकट्यानेच पचवायचे असते !

No comments:
Post a Comment