दोघांत अंतर अता फक्त एका श्वासाच राहीलं होतं.
तोही श्वास काही क्षणांनंतर अंतरे मिटवुन गेला,
मग मागे राहीले ओठांवर ओठांचे काही मंजुळ स्वर.
एक अनामिक स्पर्श, आणि निस्सीम प्रेम,
तिने एकाच स्पर्शात तिच्या मनाच सार गुज सांगुन टाकलं.
ती पहिली भेट ओठांची, किती अविस्मरणीय होऊन गेली,
तिने डोळे उघडले, तेव्हां ते पाण्याने डबडबले होते..!!

No comments:
Post a Comment