NiKi

Wednesday, February 27, 2013
मी हसले तर.
तू येतोस कितीदा,
आणि कितीदा जातोस....
मी हसले तर कविता,
आणि रुसले तर गझल लिहतोस.........
तू " वेडा पीर " दिसतोस
जराजराशाने चिडतोस
तुझ्या माझ्या संदर्भांना
कधी जोडतोस...कधी तोडतोस .....
तुझीच तोडफोड...तुझीच उरस्फोड
वर दोष मला देतोस.........मी हसले तर.....
माझे आनंदाचे घर
माझे गुलाबी आंगण
माझ्या मानेभोवती सुत्र
माझे सोनियाचे कंगण
तुला अर्थ कळत नाहीत
तुला बंध सलत नाहीत
सारे सोडून ये म्हणतोस
कधी घेऊन ये ही म्हणतोस...........मी हसले तर....
माझे मातीचे पाय
मी जमिनीशी ठाम
मला आकाशाची भूल नाही
कि नाही वा-याशी काम
मी माझ्यातच लहरते
माझ्यातच बहरते
तु उगाचच तुझे अर्थ जोडतोस.....
मी हसले तर कविता
रुसले तर गझल लिहतोस..............!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment