NiKi

NiKi

Friday, February 22, 2013

ते निळशार आभाळ..
एकमेकांच्या डोळ्यांत शोधन ..
ते एकटक बघत
गर्दीतही हरवन.....

ते हसन ते रुसन...
क्वचिच कधीतरी भांडन ...
भांडुन भांडुन दमलो की..
स्वतःवरच रागवन ....

ते सोबतीच्या आणाभाका घेण
ते भविष्याची सप्तरंगी स्वप्ने रंगवण
तु नकळतच व्हायचीस गुंग
अन ते तुझी थट्टा उडवन....

ते पावसाच्या साक्षीने..भिजन...
ते एकरुप होऊन जाण ...
त्या मावळतीच्या सुर्याला पाहायला...
त्या आडवळणाच्या नदीवर जाण...

तो किनारा...
अन रेतीवरची तिची ती अल्लड नक्षी...
तिच्या सादेला मी देलेला प्रतिसाद ..
तोच कुठलातरी चुकार पक्षी...

तोच मी...अन तीच तु...
सारं काही तेच जुनं...तसच
मला पुन्हा जगायचं आहे....
पुन्हा जगायचं आहे.......

No comments:

Post a Comment