मनी कोंडल्या विचारांनो
जिव्हेवरती येऊ नका
नेत्रातील स्वप्नांनो
नेत्राबाहेर जाऊ नका ।
विचारांच्या राज्यात
वावरतो मी आनंदात
त्या आनंदाला पारखे
पुन्हा मज करू नका ।
रोज रोजच्या स्वप्नात
असते नवनवी रंगत
रंगत ती जीवनाची
दूर जाऊ देऊ नका ।
भावनांना पूर येतो
वेगळ्या विश्वात वावरतो
भावनांच्या त्या उर्मींना
बांधतो घालू नका ।
चोरून सखी येते
पापणीत विसावते
पापणी उघडून माझी
झोप ही उडवू नका ।
माधुर्य स्पर्शात असते
शब्दांत गीत असते
संगीत त्या मिलनाचे
बेसूर ते करू नका ।।
जिव्हेवरती येऊ नका
नेत्रातील स्वप्नांनो
नेत्राबाहेर जाऊ नका ।
विचारांच्या राज्यात
वावरतो मी आनंदात
त्या आनंदाला पारखे
पुन्हा मज करू नका ।
रोज रोजच्या स्वप्नात
असते नवनवी रंगत
रंगत ती जीवनाची
दूर जाऊ देऊ नका ।
भावनांना पूर येतो
वेगळ्या विश्वात वावरतो
भावनांच्या त्या उर्मींना
बांधतो घालू नका ।
चोरून सखी येते
पापणीत विसावते
पापणी उघडून माझी
झोप ही उडवू नका ।
माधुर्य स्पर्शात असते
शब्दांत गीत असते
संगीत त्या मिलनाचे
बेसूर ते करू नका ।।
No comments:
Post a Comment