NiKi

NiKi

Monday, February 11, 2013


मी प्रेम केलं .......मनापासून ..............मनावर
प्रेम करताना
कसला विचार करायचा नसतो
विचार करून कधी
प्रेम करता येत नाही .....

मी प्रेम केलं .......
तुझ्या गोड हसण्यावर
तुझ्या शांत बसण्यावर
तुझ्या मनमोक्लेपानावर
आणि वेगळ्या वाटणाऱ्या स्वभावावर .......

मी प्रेम केलं .......
तुझ्या स्वप्नांवर , इच्छा , आकांक्षांवर
तुझ्या मनातील भावनांवर
तू सोसलेल्या वेदनांवर
आणि जीवनातील दुखांवर

मी प्रेम केलं .......
तू घेतलेल्या प्रेतेक श्वासावर
हृदयातील स्पंदनांवर
माझ्या आठवणीत पाणावलेल्या
तुझ्या डोळ्यांवर ......
मी फक्त प्रेम केलं .... कारण .....
प्रेम फक्त करायचं असतं...
निस्वार्थ मानाने .....
....प्रेम फक्त द्यायचं असतं ...
निरपेक्ष अंतःकरणाने ....

No comments:

Post a Comment