तुला कुठे म्हणते मी ,
की माझ्या जवळ बसत जा
तुला जमेल तितका
तू, फ़क्त 'माझा' असत जा .....
तुला कुठे मागितली मी
चिमुट कुंकवाची
तू फ़क्त माथ्या वरच्या
टिकलीसारखा हसत जा ....
तुला कुठे मागितला मी
कधी तुझा गोरा रंग
तू फ़क्त मला
कृष्ण-सखी म्हणत जा ...
तुला कुठे मागितले मी
चंद्र सूर्य,तारे बिरे
फ़क्त माझ्या पापण्यांवरचे हे दव
आठवणीने पुसत जा ...
तुला कुठे म्हटले मी
माझे शल्य घे जरा
फ़क्त काल घेवुन गेलास ते,
माझ्या ओठांवरचे ओझे,
परत माझ्या ओठांवर
ठेवून जा ....!
No comments:
Post a Comment