NiKi

NiKi

Wednesday, February 6, 2013



प्रीत एक स्वप्न आहे
बंद पापण्यात उमटत आहे
पापणी उघडल्यावर मात्र
हळूच विरून जात आहे ।

प्रीत एक आभास आहे
आकार नाहीं रूप आहे
त्या रुपामागे लागून
जीवन वाया जात आहे ।

प्रीत फक्त मृगजळ आहे
दुरून ते चकाकत आहे
त्या जवळ जातांच मात्र
आणखी दूर जात आहे ।

प्रीत फक्त गीत आहे
ज्यांत फक्त सूर आहे
कंठातून निघतानाच
ते बदसूर होत आहे ।

प्रीत फक्त आभास आहे
मृगजळ अन गीत आहे
तरी सुधा वेडा मानव
त्याच्या मागे धावत आहे ।।

No comments:

Post a Comment