NiKi

Wednesday, February 27, 2013
तू आहेसच जगा वेगळी .............
तू रहातेस शांत , शीतल
नदीसारखी
अन हसतेस इतकी गोड
नुकतीच कळी उमलल्यासारखी
तुझ्या मनाची सुंदरता
टपकते तुझ्या वागण्यातून
इतका गोड स्वभाव कसा
असं वाटत मनास राहून राहून ...................
तुझ्या त्या स्वभावानच मी
तुझ्याकडे खेचला गेलो
मैत्रीचे धागे जुळले तुझ्याशी
अन तुझा होत गेलो .....
तुझ्या न माझ्या सहवासातल्या
त्या सुंदर क्षणांनी
मनी प्रितीचे तार छेडले
तुझे लांब सडक केसं
अन कधीतरी घातलेल्या अंबाड्यात
माझे मन गुंतले ........
जेव्हाही पाहिले तुझ्या सुंदर डोळ्यांत
माझे भान हरपत गेले
गत जन्माची तूच राधा
माझ्या मनास कळून गेले
तुझ्या त्या नयन कटाक्षाने
मन शिकार झाले
कळले नाही काळजात
तू कधी घर केले ...............
विश्वासाच्या धाग्यांनी अपुल्या
मनास जवळ आणले
जे स्वप्न न पाहिले कधी
ते ओंजळीत आले
मला कुठे ठाऊक होतं
प्रेम म्हणजे काय
पण तू भेटलीस अन
मन प्रेमाचे होऊन गेले .......
कुठलीही वचने नाहीत
कुणाला फसवणे नाही
तरी दोन जीव नकळत
एक हृदय होऊन गेले
अशी हि प्रेमाची
कहाणी आहे वेगळी
प्रेम झाले तुझ्यावर
कारण
तू आहेसच जगा वेगळी .
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment