'' मी म्हणजे समुद्र किनारी रेतीवर लिहीलेल नाव नाही
जो समुद्राच्या लाटेनी पुसलं जाईल...
मी म्हणजे आकाशातून कोसळणारा पावसाचा थेंब नाही
जो जमीनीवर पडुन नष्ट होईल..
मी म्हणजे रात्री पडलेलं सुंदरस स्वप्न नाही
जो पाहीलं आणि विसरुन जाईल..
मी म्हणजे मंद प्रकाशनारा दिपक नाही
जो फुंकला की विझुन जाईल..
मी म्हणजे पौर्णिमेचा चंद्र नाही,
जो दिवस उजाडल्यावर साथ सोडुन जाईल..
मी म्हणजे वाऱ्याची हलकीशी झुलुक नाही,
जो क्षणभरात येईल आणि निघून जाईल..
मी एक जाणीव,
जी तुझ्या हृद्यात सामावलीय प्रेम बनून.........
मी एक रंग आहे
तुझ्या मनावर पसरलेलं जे कधीही पुसलं जाणार नाही........
मी एक गीत आहे
जे तुझ्या ओठावरून कधीही जाणार नाही....
.अर्ध्या रस्त्यात साथ सोडणाऱ्या
स्वप्न.. हवा.. थेंब..
चंद्र....दीपक.. या सारखा मी नाही
कारण
कधीही न संपणारा मी "प्रेम" आहे..
No comments:
Post a Comment