NiKi

NiKi

Wednesday, February 6, 2013

सुर्यास्ताची वेळ ती ,
जशी रमणीय संध्याकाळ होती
अलगद हातात हात देत तू ,
कवेत माझ्या येत होती...
मंद वा-याचा स्पर्श तो ,
जवळीक साधुनी जात होता
... बिलगताच मजला तू ,
अंगावरी शहारे तो आणीत होता...
निशब्द झालेले मन ते ,
शब्दरूपी आता होत होते
इवलेसे हृदय माझे ते ,
तारुण्यात आता येत होते...
मखमली तारुण्याला त्या ,
मनी प्रकाशाची भीती होती
अन लाजणा-या लोचनांना ,
आज अंधाराची आस होती...

No comments:

Post a Comment