NiKi

NiKi

Wednesday, February 6, 2013

संगत

तुझ्या सांगतीत,

सकाळ...
नहालेल्या ओलेत्या लख्ख उन्मत्त
सोळा वर्षांच्या मुलीसारखी...

दुपार...
कसलीही घाई नसलेल्या वाहणाऱ्या नदीच्या
संथ थंड पाण्यासारखी

संध्याकाळ...
गुलाबी...सौम्य...
दिवस अन रात्रीच्या प्रणयात विरघळलेली...

रात्र...
बेभान..
दिवसावर ताबा मिळवुन
जाईच्या सुगंधात वेडयासारखी मोहरून गेलेली

आणि पहाट...
दिवस आणि रात्रीला घट्ट बिलगुन लाजणारी..
सरण्यास नाकारणारी...

No comments:

Post a Comment