NiKi

NiKi

Friday, March 30, 2012


रोज काहीतरी लिहायचे
अस कधीच ठरवल नाही
पण लिहायला बसलोच तर
शब्दच पाठ सोडत नाहीत

कवितांच्या माग लागण्याची
वेळच कधी आलीच नाही
डोळे मिटले कि मनातले भाव कळतात
यमक जुळायला शब्द कमी पडत नाहीत

मनाचा तारू असा उधळतो
कि; लगाम त्याचा फुका ठरतो
आठवणींच्या गुंत्यात येवून
“माझ्या लेखणीतून…” स्थिरावतो
सावली नसलेल्या अंधारात
तू सावली माझी होशील का?..
छेडतोय एकांत हा मला
तू आठवण बनून येशील का?..



तुला आठवावं म्हणून मी
रोज कविता करायला बसतो
एक एक आठवणीचा धागा सोडत
मनातल्या मानत कुडत असतो

उदास निरभ्र हे आकाश
मी रंगवतो सखे तुझ्या ओढीन
कल्पनेच्या तुझ्या माझ्या
सुंदर सप्तरंगी स्वप्नांन

अर्थ माझ्या कवितेतला
तू बनून येशील का?..
जीवनाच्च्या पायघडीवर
साथ माझी देशील का?…
असं का होत? कुणीतरी खुप आवडायला लागतं....
अनं ते आवडण, एकाकी मनाला वेड लाऊ लागतं......

असं का होत? कुणाचीतरी खुप आठवण यायला लागतें...
अनं ते आठवणच, आयुष्याचा प्रत्येक क्षण व्यापु लागतें....

असं का होत? कुणीतरी ह्र्दयाच्या खुप जवळ येतं........
अनं ते जवळ येण,आपल्यालाच आपल्यापासुन खुप दुर घेऊन जाते......

असं का होत? कुणीतरी आधारासाठी हात देऊ लागतो.......
अनं तो आधाराचा हातच जगण्याचा आधार होऊन जातो.......

असं का होत? कुणीतरी क्षणभर आनंद देऊन जातो.....
अनं तो आनंदच सगळ्या  मुळ होऊन जातो....

असं का होत? कुणासाठीतरी जगावास वाटतं......
अनं जगावास वाटतानाच,  आणखी जगावस  वाटतं ............
जसं अतूट नातं असतं
पाऊस आणि छत्रीचं ,
तसंच काहीसं असावं
तुझ्या माझ्या मैत्रीचं..!

अंगरख्याच्या आत असतं
मुलायम अस्तर जरीचं ,
तसंच काहीसं असावं
तुझ्या माझ्या मैत्रीचं..!

जसं हळुवार बंधन असतं
श्रावणाशी सरीचं ,
तसंच काहीसं असावं
तुझ्या माझ्या मैत्रीचं..!

जसं नातं लाटांचं
किना-याशी खात्रीचं ,
तसंच काहीसं असावं
तुझ्या माझ्या मैत्रीचं..
कीती पाखंरे जळाली गुढ हे उलगण्यासाठी
की ज्योत जळण्यासाठी आहे की जाळण्यासाठी
रडणा-या तुला रडण्याचा अर्थ कुठे माहीत
अश्रुं रडण्या-यासाठी आहेत का रडवण्या-रासाठी.

अश्रुं रडण्या-यासाठी आहेत का रडवण्या-रासाठी.
की सुर्य उगवण्यासाठी आहे की मावळण्यासाठी
जागणा-या तुला जागण्याचा अर्थ कुठे माहीत
डोळे झोपण्यासाठी असतात का आसवे गाळण्यासाठी.

कीती किनारे झीजुन गेले सागराच्यां लाटांसाठी
की लाटा सागरासाठी असतात की किना-यासाठी
भरती आहोटीच कारणं कोणाला कुठे माहीत
भरती सागरासाठी असते का सागर भरतीसाठी .

कीती कविता केल्या मीही तुझ्या विरहासाठी
की विरहं भेटीसाठी असतो का भेट विरहांसाठी
आठवणा-या तुला आठवणीचां अर्थ कुठे माहीत
आठवणी आठवण्यासाठी असतात की विसरण्यासाठी.
वाटते मनाला माझ्या पंख द्विजाचे असावे
असशील तू जेथेही भेटण्यास उडत यावे ।
वाटते मनाला माझ्या कोमल स्वर शब्द व्हावे
तुझ्या हंसर्या ओठांवरती नाचत फुलत उमटावे।
वाटते मनाला माझ्या मधुर सुगंधी फुल व्हावे
हारामध्ये गुंफुनि तुझ्या सतत कंठी राहावे ।
वाटते मनाला माझ्या रक्ताचा थेंब व्हावे
प्रेमळ हृदयांत तुझ्या कायमचे वास्तव्य करावे ।
वाटते मनाला माझ्या मंद सुगंधी वारा व्हावे
अन तुझ्या अंग-अंगाला हळुवारपणे गोंजारत रहावे ।
वाटते मनाला माझ्या आभाळीचा मेघ व्हावे
प्रीत-धारांनी तुला पूर्णपणे भिजवून टाकावे ।
वाटते मनाला माझ्या तुझ्या नेत्रींचे अश्रुं व्हावे
सुखाने व दुखाःने सुटता तुझ्याच ऊरी विराजावे ।।

Thursday, March 29, 2012



कस कळेल मला काय तुझ्या डोळ्यात आहे.

नजरा मिळवण्या आधीच नजर चुकवतेस तु
कसे ओळखावे कोणते शब्द बंद ओठात आहे.

मी शोधतो जागा माझी सदा तुझ्या भोवताली
पण हे मात्र खर की तु माझ्या काळजात आहे.

सा-या जरी बंद वाटा माझ्या मुक्या शब्दांच्या
परी तु समजुन घे आयुष्य माझ तुझ्यात आहे.

तुला मागुही शकत नाही मी आज तुझ्यापासुन
प्रश्न कोणताच नाही सार काही तुझ्या उत्तरात आहे.

हो आज या नात्याला नाव अस कोणतच नाही
आणि कशाला हव नाव अस काय नावात आहे.

मला फ़क्‍त तु हवी आहेस आणी तुझा श्वास
श्वासाशिवाय जगणा-या काय या देहात आहे.

कधी तरी सागं भावना पोहचल्या मनापर्यंत
कळालच नाही तर काय अर्थ या काव्यात आहे.



तुझी आठवण आली की मला काहीच सुचत नाही,
तू म्हणतेस कविता कर माझ्यावर
पण शब्दच फुटत नाही.
डोळ्यांसमोर सारखे तुझे़च चित्र
तूच दिसते सर्व जागी
अशी फीलिंग विचित्र,
तुझ्यासाठी काय लिहावे तेच मला कळत नाही,
तुझी आठवण आल्यावर मला काहीच सुचत नाही.
खुप गोड़ हसतेस तू,
खुप गोड़ लाजतेस,
प्रेमाची घंटा मनात माझ्या अचानक वाजते,
बोलायच असत खुप काही पण ओठ हालत नाही,
तुझी आठवण आली की मला काहीच सुचत नाही.
खरच.. ...
तुझी आठवण आली की मला काहीच सुचत नाही

वचन आहे ,
कधीही तुला एकटं वाटलं
तेव्हा मी तुझ्यासाठी असेल
तुझ्या डोळ्यात पाणी दाटलं
तर मी तुझे अश्रू पुसेल वचन आहे,
तुला शब्दच सापडले नाही
तर तुझा आवाज होईल
तुझ्या विरुद्ध गेलं कुणी
तर जगाशी मी लढा देईल वचन आहे,
तू रुसलीस माझ्यावर
तरी मी रुसणार नाही
आयुष्याच्या शेवटपर्यंत
तुझी साथ सोडणार नाही...
आज पहाटे पहिल्या प्रहरी माझ्या दारी,
कोणाची पावले वाजली,
ती तू होतीस की तुझी सावली…
केसातील मोगरा दरवरळा,
त्या गंधाने जीव बहरला,
न सांगता जी परत फिरली,
ती तू होतीस की तुझी सावली…
आज पहाटे झोपाळ्यावर
तू घेत होतीस झोके,
कसे सांगू कितीदा चुकले
माझ्या काळजाचे ठोके,
बांगड्यांची किणकिण तुझ्या
अजुनही माझ्या कानी,
आठवतात अजुनही मजला
तु गायलेली गाणी,
अजुनही जी घरभर व्यापून उरली,
ती तू होतीस की तुझी सावली…
वाटले तुझ्या चेहऱ्याच्या चंद्राला
ओंजळीत घ्यावे,
मन भरून, जीव ओतून
प्रेम तुला द्यावे,
चांदण्यांचे अंग तुझे
डोळे भरून प्यावे,
जवळ येवून तुला घट्ट मिठीत घ्यावे,
तेवढ्यात पावसाची सर आली,
माझी स्वप्ने भिजून गेली,
थोडासा रुसलो मी अन
स्वतःशीच हसलो.जडला कसा हा जीवघेणा ध्यास,
सगळीकडे फक्त तुझाच भास,
पण भास तरी म्हणू कसे?
सकाळी अंगणात होते
तुझ्या पावलांचे ठसे,
आता तरी खरे सांग,
आज पहाटे पहिल्या प्रहरी माझ्या दारी,
कोणाची पावले वाजली,
ती तू होतीस की तुझी सावली
कधी येतो मनी, हा विचार आपोआप ...
माझ्याचसाठी का हे, लावण्य निष्पाप ...

कधी ओठांवर तिच्या
नाव माझे खुले,
रोजचे परी नव्याने
मजला मी मिळे,

माझ्यातच गुंतली ती, आपसूक आपोआप ...
माझ्याचसाठी का हे, लावण्य निष्पाप ...

कधी केसांत तिच्या
अडकता मी जरासे,
शहाऱ्याचे मोरपीस
फिरविते ती जरासे,

हळुवार मऊ हात, मग केसांत आपोआप ...
माझ्याचसाठी का हे, लावण्य निष्पाप ...

कधी गालांना तिच्या
स्पर्शिता मी अचानक,
मधुघटिका रित्या किती
मोजली ना मी एक,

चिंब चिंब पावसाची, कशी बरसात आपोआप ...
माझ्याचसाठी का हे, लावण्य निष्पाप ...

कधी डोळ्यांत तिच्या
खोल खोल बुडता मी,
गूढ त्या डोहांमधून
काळजात उतरता मी,

न कळे कोण कुठे, मी आरशात आपोआप ...
माझ्याचसाठी का हे, लावण्य निष्पाप ...

कधी येतो मनी, हा विचार आपोआप ...
माझ्याचसाठी का हे, लावण्य निष्पाप ...

खळखळणारे हास्य तुझे
मनात मी साठवून घेतो
अन अश्रू तुझ्या नकळत
मी सदैव टिपून घेतो....

गालावरची खळी तुझी
हेच माझे विश्व आहे
गुंफलेले हात आपले
हेच चिरंतन सत्य आहे.....

विरहाचा कापरा वारा
सदा मला त्रस्त करतो
बरसणाऱ्या पावसातही
तुझी आठवण घेऊन येतो....
शब्द हेच साधन असतं
एकमेकांच्या जवळ येण्याचं
मुका स्पर्शही बोलून जातो निमित्त फक्त कोसळणाऱ्या पावसाचं...
कळतं पण वळत नाही,
असतं पण मिळत नाही,
प्रेम हे असंच असतं,
जे शोधूनही सापडत नाही.


जळतं पण विझत नाही,
रडतं पण हसत नाही,
प्रेम हे असंच असतं,
कधी होतं ते दोघांनाही कळत नाही.


रुसतं पण रागावत नाही,
सरतं पण करत नाही,
प्रेम हे असंच असतं,
सावरता सावरत नाही.


नशिबानं एखाद्याला मिळत असतं,
टिकवणं ते एखाद्यालाच जमतं,
प्रेम हे असंच असतं,शेवटी प्रेमच प्रेमाला मिळत असतं


शब्दांत नाही सांगता येणार
डोळ्यांतुन समजुन घेशील ना ?

अस्वस्थ होइन मी जेव्हा
धीर मला देशील ना ?

माझ्याही नकळत दुखावले तुला तर
माफ़ मला करशील ना ?

ओघळले अश्रु माझे तर
अलगद टिपून घेशील ना ?

आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर
हात माझा धरशील ना ?

सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा
विश्वास माझ्यावर ठेवशील ना ?

चुकतोय मी असे वाटले कधी तर
हक्काने मला सांगशील ना ?

हरवलो मी कुठे कधी जर
सावरून मला घेशील ना ?

कितीही भांडलो आपण तरीही
समोर आल्यावर सारे विसरून जाशील ना ?

मी आता विसरणे शक्य नाही तुला
तू मला लक्षात ठेवशील ना ?

जीव तयार आहे तुझ्यासाठी
गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना ?

मला तुझी गरज आहे, हे
न सांगता ओळखशील ना ?

आजवर तुझ्यासाठी काही नाही करू शकलो,
पण माझ्यासाठी एवढे एक करशील ना ?

तुझ्यासाठी मी कित्येकांपैकी एक असलो
तरी माझ्यासाठी..........
तूच एक असशील ना ?
तू बरोबर असतोस तेव्हा,
खूप खूप बोलावसं वाटत,
नाहीतर फक्त गप्प रहावस वाटत...

तू बरोबर असतोस तेव्हा,
फक्त तुलाच पाहावस वाटत,
नाहीतर डोळे मिटून शांत बसावस वाटत...

तू बरोबर असतोस तेव्हा
तुझ्याबरोबर पावसात भिजावस वाटत,
नाहीतर खिडकीतूनच, पडता पाऊस पाहावस वाटत...

तू बरोबर असतोस तेव्हा,
फक्त तुझ्या बरोबरच रहावस वाटत,
नाहीतर फक्त तुलाच आठवावस वाटत...

स्पर्शाने तुझ्या जीवन बदलून गेल
होत नव्हत ते सार तुझ झाल
तुझ रूप हे माझ्या मानत भरल
पाहता पाहता तुला माझ मन तुझ्या प्रेमात पडल

आठवन ही येते तुझी क्षणों क्षणी
तू राहतेस घर करुनी माझ्या मनी
रूप ही सुंदर मन ही सुंदर
तुझ्या पुढे शमतो हा सागर

रात्रण दिवस तुझीच आठवण
तुलाच पाहतो माझे हे मन
स्वप्नात ही तूच राहते
तुझ्याच साठी आहे माझा प्रत्येक क्षण


नाती अनेक प्रकारची असतात
पण एखादं नातं असं असतं
ज्याला नाही बांधता येत शब्दात
नाही अडकवता येत कुठल्याच बंधनात

ते असतं स्वैर ............ .
फ़क्त ह्रुदयाचं ह्रुदयाशी असलेलं नातं !!!
त्याचं गहिरेपण नाही कोणी समजू शकत
ते केवळ त्या दोन वेड्या जीवांनाच माहित असतं
अगदी जगावेगळं ............
कदाचित समाजाच्या रूढींमधे न बसणारं
तरीही अगदी हवंहवंसं ... खूपच खास
ज्या नात्याला नाही देता येत काही नाव .........

एक असं नातं .........
जसं कोणीतरी अंतर्मनात घर करून रहावं
जसं उदास असताना येऊन कोणीतरी हसवावं

एक असं नातं ........
जणू अंधाऱ्या वाटेवर दिसावा प्रकाशाचा किरण
जणू बेरंगी जीवनात उधळावे कोणी हजारो रंग

असं एक सुंदर, हळवं अनामिक नातं ......

Wednesday, March 28, 2012

आज येथे थांबण्याला अर्थ आहे
शब्द माझे मांडण्याला अर्थ आहे

निर्झराचा भाव माझ्या बोलण्याला
ओढ असता वाहण्याला अर्थ आहे

पावलांना बंध नाही उंब-याचा
चौकटीच्या रंगण्याला अर्थ आहे

मित्र नाही येथ कोणी साधकाचा
स्वप्नदेशी दंगण्याला अर्थ आहे

कोणता ना चेहरा खोटा समोरी
आरश्याला दावण्याला अर्थ आहे

रातराणी फक्त माझ्या एकट्याची
चांदण्याच्या सांडण्याला अर्थ आहे

वाट जाते नागमोडी दूर देशी
बेफिकीरी चालण्याला अर्थ आहे

जाम माझे घोट घेई तृप्त झाला
मी हताशा झिंगण्याला अर्थ आहे?

रत्न आणि माणके ना स्वस्त येथे
आसवांना रोखण्याला अर्थ आहे

पावसाने धार व्हावे मुक्त होता
का ढगाशी भांडण्याला अर्थ आहे?

खेळ सारे तूच केले जाणले मी
सर्व काही हारण्याला अर्थ आहे

घे उशाशी मल्मली ह्या शांततेला
एक घटका झोपण्याला अर्थ आहे

भावनेला बाज येता गेयतेचा
शायरीला वाचण्याला अर्थ आहे

पास येणे, दूर जाणे पाहिले मी
बंधनांना तोडण्याला अर्थ आहे

दर्द माझा जन्म देतो शायरीला
एकट्याने जाळण्याला अर्थ आहे

स्वार्थ ज्याने साधला तो थोर झाला
गुप्त माझ्या राहण्याला अर्थ आहे

एक छोटे विश्व माझे बांधले मी
ध्वस्त होता खंगण्याला अर्थ आहे

वेड ज्याला लागले ह्या आशिकीचे
तीर वर्मी लागण्याला अर्थ आहे

देव आहे मानतो मी सर्व दूरी
आस वेडी ठेवण्याला अर्थ आहे

तोच माझा राहिला वाटे मलाही
जीवनाला पोसण्याला अर्थ आहे

अंबराचे सांडणे बेबंदशाही
सागराच्या माजण्याला अर्थ आहे


सत्य आणि झूठ झाले एक तेथे कान-डोळे झाकण्याला अर्थ आहे

एक भूमी, सूर्य अन् तो एक चंदा
प्रेमकोनी गुंतण्याला अर्थ आहे!!
तुझे पाश लेण्यास आतूर आहे
निशेचा नशीला नवा नूर आहे

तृषा संपते ही तुझी ना कधीही
रिते होत जाण्यास मंजूर आहे

जरा धीर घे रे जरा श्वास घे रे
घडी मीलनाची जरा दूर आहे

असे मी तुझी खास नाही कुणाची
जरी गीत माझे, तुझा सूर आहे

नको त्रास देऊ तुझ्या लाडकीला
तुझे प्रेम नयनी जणू पूर आहे
सांडला सुगंध येथ वेचतो जरा जरा
कुंतलांत मी उगाच गुंततो जरा जरा


बाहुपाश भोवती असेच राहु दे सखे
मी तुझ्यातुनी तुलाच चोरतो जरा जरा


जन्म सार्थ जाहला खराच, प्रेम लाभुनी
स्वर्गतुल्यश्या सुखास भोगतो जरा जरा


हात जाहले परीस दिव्य तेज लोचनी
स्वाद अमृतासमान चाखतो जरा जरा


देव देवळात बांधला कधीच ह्या जगी
मी तुझ्यात ईश्वरास पाहतो जरा जरा


घाव झेलले अनेक जीवनात फक्त मी
वेदनांस साहुनी सुखावतो जरा जरा
पुन्हा आठवण आली आज
त्या नाजुक क्षणांची

काही वेळ तरी हाती सोबत
त्याच्या आपले पणाची
...
खांद्यावरती डोके ठेवून
दु:ख आपले सांगण्याची

एकमेकांचे हात धरून
प्रित फुलांना जपण्याची

समुद्राच्या लाटांन सारखे
ऊंच ऊंच उडण्याची

क्षितीजातील त्या शुन्याकडे
एक टक पाहण्याची

दोघांनी मिळून बघितलेल्या
सुंदर सुंदर स्वप्नांची

पुन्हा आठवण आली आज
त्या नाजूक क्षणांची

Monday, March 26, 2012



प्रेम माझे तू आहेस ,
प्रेयसी ही तूच आहेस ,
साथ माझी तू आहेस ,
वेड माझे तूच आहेस …

तूच माझे बोल ,
माझी कविता तूच आहेस ,
तूच माझे शब्द ,
वाक्य माझे तूच आहेस …

रात्र माझी तू आहेस ,
दिवस माझा तू आहेस ,
तूच इन्द्रधनुष्य माझा ,
पावसातही तूच आहेस …

देव माझा तू आहेस ,
धर्म देखिल तूच आहेस ,
भाव माझे तू आहेस ,
भवनांतही तूच आहेस …

तूच माझी बाग़ , त्यात
फुल देखिल तूच आहेस ,
रंग त्या फुलांचा नी ,
गंध त्यांचा तूच आहेस …


स्वप्न माझे तू आहेस ,
स्वर्ग माझा तूच आहेस ,
जीवनात या माझ्या ,
सर्व काही तूच आहेस …


मला हरवून टाकलेस तू.....
काय सखे तु जादू केलीस,
मी माझ्यातच हरवून गेलो,
तुझ्या आसीम प्रेमाखातर,
माझं मलाच विसरून गेलो,
तुझे ते बंदिशातले केस,
आज अचानक वार्‍यासवे डोलू लागले,
जणु माझ्या भुललेल्या चेहर्‍यावर,
पिसार्‍यातले सारे मोरपिस गुदगुल्या करू लागले,
माझे ते छुपे इशारे अन,
तुझ्या त्या घाबरलेल्या नजरेचे तीर सारे,
माझ्या काळजाचा ठाव घेऊ लागले,
नकळत एवलूष्या जागेत तुझ्या प्रेमाचे बोन्साय वाढू लागले,
काय म्हणावा तुझा तो नखरा,
जणू बारमाही ठरलेला दिवाळी अन दसरा,
मी आपलं स्वत:ला त्यात गुंतवत गेलो,
आनंदाचे दिस कायमचे बस आपलेसे करत गेलो,
तु नाही दिसायची डोळ्यासमोरी माझ्या,
तेव्हा माझ्या पापण्याही जड व्हायच्या,
मान उंचावूनी मग त्या नयन बाहूल्या,
चराचरात तुला,रातनदिस शोधत रहायच्या,
तुझ्यासोबत मी अनुभवला तो श्रावण मंद सरींचा,
काय सांगू तुला मला कधी जाणवलच नाही,
असाही असतो पाऊस लहरीचा अन,
गोड गुलाबी मंद शिरशिरीचा,
कधी भांडलो तुझ्याशी उगाच,
अन कधी तरसवले मी तुला कारणांविनाच,
मग तुझी माफी मागताना साजने,
केला मी स्वत:ला एका पायवर उभा राहुनी अजब शिक्षेचा जाच,
बघ कसा हरवलो सखे मी तुझ्यात,
तुच सांग आता ही प्रेमाची कुठली जात???
का झालोय मी प्रेमवेडा अन,
सामावूनी गेलोय तुझ्या त्या अमर आत्म्यात........


फक्त , ' तू अन मी ' जाणे..

गार वारे असे वाहले,
भाव का गारठले ?
कुणी न जाणे..

पण , शहारे का गारवा देऊन गेले
फक्त , ' तू अन मी ' जाणे..

बहर वॄक्षांना मग फुलले,
पर्ण का गळाले ?
कुणी न जाणे..

पण , मनास का पालवी देऊन गेले
फक्त , ' तू अन मी ' जाणे..

वैशाख वणवे तेव्हा पेटले,
ह्रदय का होरपळले ?
कुणी न जाणे..

पण , वणवे का ऊब देऊन गेले
फक्त , ' तू अन मी ' जाणे..

नभी मेघ दाटून आले,
नयनांत का उतरले ?
कुणी न जाणे..

पण , पूर का तहान देऊन गेले
फक्त , ' तू अन मी ' जाणे..

परत ,
वाहले वारे सुखाचे,
फुलले बहर प्रेमाचे,
पेटले वणवे विरहाचे,
दाटले मेघ दु:खाचे..

ॠतु जीवनी असे आले,
श्वासांत का मिसळले ?
कुणी न जाणे..

पण , ऋतु प्रेम शिकवून गेले
फक्त , ' तू अन मी ' जाणे..

' तू अन मी ' जाणे


असे नको ग ...
रुसू सखे माझ्यावरी,
चुकून डोळा लागला ..
बोलत असता कुशीवरी.




बोल ना ग आता...
झोप गेली लांब तीरावरी,
बोलली नाहीस की ...
नाही करमत मझला तुझ्यापरी


तुझ्या प्रेमरंग जादू निराळी,
तुझेच सप्तरंग दिसे आभाळी,
परी जैसी उडुनी आकाशी,
ये ये ये ग सखे ये ,
अडीच मिनिटे येना माझ्यापाशी

मन-सदनी ग माझ्या ,
बघ वसंत ऋतू बहरला,

तूझी वात पाहताना ,
वाटेच्या गाव्ताचाही हिरवा रंग वधरला,

तुझ पाहण्यासाठी ,नयन माझे उपाशी ,
ये ये ये ग सख्ये ये,
अडीच मिनिटे येना माझ्यापाशी
तू येता सजनी,
बघ फुलांची जागी झाली वस्ती,

सळसळत्या पानांतून,
प्रेम-लहरीची कानी पडते मस्ती,

ये ग लवकर मधुमाशी,
ये ये ये ग सख्ये ये,
अडीच मिनिटे येना माझ्यापाशी


मन कधी फ़सत,मन कधी रुसत...
कुनाला हे कळत,कुणी उगाचच हसत..
हसताना मनात बरंच काही असतं...
सांगायला मात्र काही जमत नसत...
समजुन घ्यावं असं खुप वाटतं....
समजतय त्याला हेही कळत....
शब्दांच्या शोधात मन हरवत...
न बोलताच मग डोळ्यांना समजत..
गालावरच्या खळीत उत्तर मिळतं....
पापन्यांखाली ते हळुच लपतं.........


प्रित फ़ुला रे आज अवचित असा अचानक येशील का ?
लाजलाजूनी चूर होताना हळूच मजला पाहशील का ?
तुझीच वेडी धुंद होऊनी रात्र रात्र मी जागताना
इंद्रधनुचे सप्तरंग तु स्वप्नी माझ्या भरशील का ?

क्षणाक्षणाला कणाकणांमध्ये भास तुझा रे होताना
आयुष्यात माझ्या तु गंध प्रीतीचा भरशील का ?
प्रित फ़ुला रे आज अवचित असा अचानक येशील का ?
लाजलाजूनी चूर होताना हळूच मजला पाहशील का ?

ओढ मला रे तुझी असताना सहवासाने तुझ्या
मला स्वर्गसुख तू देशील का ?
कधी अचानक पाऊस बनुनी चिंब भिजवूनी जाशील का ?
स्वप्नामधल्या स्वप्न फ़ुला रे वास्तवात तू येशील का?
प्रित फ़ुला रे आज अवचित असा अचानक येशील का ?
लाजलाजूनी चूर होताना हळूच मजला पाहशील का ?

तुझ्या वाचुनी जगणे माझे व्यर्थ असे रे असताना
उगाच "तिला" तू पाहशील का ?
झुरताना मी तुझ्याचसाठी तु कुणावर भाळशील का ?
साथ मी देईन तुलाच जन्मभर तुही माझाच राहशील का ?
प्रित फ़ुला रे आज अवचित असा अचानक येशील का ?
लाजलाजूनी चूर होताना हळूच मजला पाहशील का ?


भेट तुझी स्मरताना
भेट तुझी स्मरताना तो क्षण हवासा वाटतो.
न कळत येणाऱ्या आठवणींना , हे हसू आवरेनासं होतं.
अबोल माझ्या ओठांना, तुझ्या ओठांनी चव दिली.
एकाच ठिकाणी तासंनतास बोलण्याची सवय लावली.
विषयाचं ताळ तंत्र दोघांनाही नाही.
काहीही बोलत असतो. जे दोघांनाही पटत नाही.
भेट तुझी स्मरताना
त्या आठवणीत रमून जावसं वाटतं
तासंन तास तुझ्या मिठीत स्वतःला जखडून घ्यावसं वाटतं.
चुंबनाच्या स्पर्शाने, तुला रोमांचित करावसं वाटतं.
अंग अंग शहारुन, तुला वेडां पिसं करावसं वाटतं.
प्रत्येक भेटीत तुला पुन्हा भेटावसं वाटतं.
भरभरून मिळालं प्रेम, तरी ते कमीच वाटतं.
भूक माझी भरपूर आहे असं नेहमी तुला वाटतं.
भेट तुझी स्मरताना
नव्याने भेटण्याची इच्छा होते.
तुझ्या प्रेमाची जादू
मला वेड पिस करते.
निरागस तुझं हास्यं, एकटक पहावसं वाटतं
भेट तुझी स्मरताना
आठवणींची दृष्ट काढावी वाटतं.
कुणाचीही नजर न लागता
तुला पुन्हा भेटावसं वाटतं.
शेवटचा श्वासापर्यंत तुझ्यावर फक्त तुझ्यावरच
भरभरून प्रेम करावसं वाटतं


तसं सोपं असतं कविता करणं

शब्दाला शब्द जुळवणं..

अवघड असतं ते कविता रुजून येणं

स्वप्नील गंधील क्षणी फुलून येणं..

भावनांच्या लहरींवर झोकून देणं..

कविता असावी कशी..

मनातल्या गंधकोषी

जपता यावी अशी

अलगद उमलणारी

अन अंतरंग व्यापणारी

कविता हवी सुरावटींची

साद घालणार्‍या तरलतेची

मन्मनातल्या गोड गुपिताची

सुंदरतेची अन कुरूपतेची

बालपणाची अन वार्धक्याचीही

अगाध अगम्य आयुष्याची

जितकी रम्य सुर्योदयाची

तितकीच हसर्‍या सुर्यास्ताची

अवखळ चंचल सरितेची

अन शांत प्रगल्भ सागराचीही

ती हळूवार जणू कळी निशिगंधाची

ती प्रखर बंधन मुक्ततेची

वेदनांची अन चटक्यांची

आर्त भीषण वास्तवाची

खोल खोल रुजू पहाणारी

कविता हसर्‍या गाण्याची

गोजिर्‍या स्पंदनांची

तुझ्या माझ्या स्वप्नांची…

Thursday, March 22, 2012

कोणाला तू आवडत नसलास
तरी मला का खूप आवडतोस?


नयनी तुझीच स्वप्ने,
ओठांवर तुझेच नाव,
मनात तुझेच विचार,
आजकाल हे रे असे का?


प्रेमाची हि नशा असावी कि
ह्याला तुझीच जादू म्हणावी?


ओढ तुझ्या प्रीतीची मला
स्वस्थ बसू देत नाही,
कामात हि आजकाल का
कुठेच लक्ष लागत नाही?


आपली सगळी परकी वाटतात
आणि तूच का आपलासा वाटतोस?
चल ये ना आणि मला तुझ्या कुशीत घे,
नेहमीच्या त्या आपल्या स्वप्नांच्या नगरीत ने.
उगाचच स्वप्ने पडतात
स्वप्नात तू येतेस रोजप्रमाणे पुन्हा रडवून जातेस
घेऊन पापण्या ओल्या मी कसाबसा जागतो
आणि आरश्यातल्या मलाच
मी डोळे पुसताना पाहतो
पहाटेच्या किरणाबरोबर
देवासमोर ठाकतो
अन त्याच त्याच गोष्टींसाठी
पुन्हा माथा टेकतो
तुझ्याविनाच दिवस मग मावळतीकडे झुकतो
आजच्या दिवसावरपण मी फुली मारून परततो
संध्याकाळी आभासांचा खेळ चालू होतो
शून्यात नजरा लावून मी देवारयाकडे बघतो
मिणमिणत्या पणतीमधली वात हि मग संपते
आणि पुन्हा मला कालच्या स्वप्नांची चाहूल लागते ..........!!!!!
मनातील तुझ्या विचारांना
आवर कसा रे घालु,
तूच सांग अजून किती दिवस
तुला नुसतंच स्वप्नात पाहू.


भेटशील कधीतरी याच आशेवर
अजूनही मी रे जगतेय,
नजर का गर्दीत दरवेळी
तुलाच जिथेतिथे शोधतेय.


ये ना आतातरी समोर
का इतकं सतावतोस,
जाणून बुजूनच ना रे
तू हे सर्व काही करतोस.


म्हणूनच ठरवलंय मी हि
आता माझ्याच मनाशी,
समोर येत नाहीस तोपर्यंत
जा कट्टीच तुझ्याशी.
मनातील तुझ्या विचारांना
आवर कसा रे घालु,
तूच सांग अजून किती दिवस
तुला नुसतंच स्वप्नात पाहू.


भेटशील कधीतरी याच आशेवर
अजूनही मी रे जगतेय,
नजर का गर्दीत दरवेळी
तुलाच जिथेतिथे शोधतेय.


ये ना आतातरी समोर
का इतकं सतावतोस,
जाणून बुजूनच ना रे
तू हे सर्व काही करतोस.


म्हणूनच ठरवलंय मी हि
आता माझ्याच मनाशी,
समोर येत नाहीस तोपर्यंत
जा कट्टीच तुझ्याशी.
कधी कधी तुझं वागणं,
कधी प्रेम, कधी अबोला
कधी नूसतचं एकटक पाहणं.


कधी असतोस पावसांच्या सरी
मनाला हळुवार स्पर्शून जाणा-या,
कधी होतोस इंद्रधनुष्य
आयुष्याचे विविध रंग दाखविणारा.


कधी येऊन भुंग्याप्रमाणे
माझे सर्वस्वच लुटतोस,
कधी नाजुक फुलांप्रमाणे
मला अलगद जपतोस.


कधी बनून विशाल व्रुक्ष
मायेची सावली देतोस,
रागावल्यावर जणू काही
तप्त वाळवंटच भासतोस.


खंर सांगु का, तु मला
केव्हा जास्त आवडतोस,
मी काही न बोलताही
मनातील सर्वच जाणतोस.
एक नदी अशीच
स्वतंत्र एकटी वाहणारी,
कधी भेटते सागराला
नेहमी वाट पाहणारी.


वाहता वाहता जरी ती
वाटेतल्या तलावांना मिळाली,
पण सागराची ओढ तिची
तशीच कायम राहिली.


असेच एकदा सागराच्या
ओढीने तिला झपाटले,
खिन्न मनाचे दर्शन
तिने पूरातून करविले.


शांत करण्यासाठी तिला
पावसांचे थेंब जमले,
सोपी करुन तिची वाट
तिला सागराजवळ आणले.


पाहून समोर सागराला
आपले भान ती हरपली,
शिरुन त्याच्या मिठीत
स्वंत:चे अस्तित्वही विसरली.


सागरानेही तिला मग
आपल्यात सामावून घेतले,
त्याच्या मनातील सर्वच
जणू काही तिलाही कळले.


तो ही होता तिच्यासाठी
झालेला तेवढाच आतूर,
खुदकन ती मनात हसली
अधुराच नदीविनाही सागर
कसं रे सांगु तुला
मी तुझाच विचार करते,
धुंद तुझ्या मिठीत
मी स्वत:लाच हरवते.


बोलणे तुझे ते मधाळ
मी माझा राग ही विसरते,
बाहुपाशात मग तुझ्याच
अश्रुनां मोकळी वाट मिळते.


सांत्वन करता करता तू
मला स्वंत:मध्ये गुंतवतोस,
नकळत मग माझ्या
देहाशी खेळत बसतोस.


जादू तुझ्या स्पर्शातील
अशी माझ्यावर चालवतोस,
करुन मनाला बेधुंद
अवधे विश्वच माझे व्यापतोस.


नसतो तुझ्याशिवाय मला
दुसरा कसलाच ध्यास,
सांग ना रे तुच, का होतात?
स्वप्नांत मला हे असले भास.
तुझा आवडता सुर्य,
माझा आवडता चंद्र,
तू आगीचा तप्त गोळा.
मी शितल दुधाची छाया.


सगळ्यांसाठी तू दिवसभर सूर्यासारखा खपतोस,
रात्री माझ्या कुशीत हळूच अंग टाकून झोपतोस,
माझे हि काम त्या चंद्रासारखेच रात्रभर जागणे,
प्रेमाच्या वर्षावात तुला अखंड न्हाहून टाकणे.


जसा सूर्याचा उसना प्रकाश
चंद्राचे रूप उजळवतो,
तसाच तुझा स्पर्श रे सख्या
माझे सौंदर्य खुलवतो.


एकटाच तळपतो तो सूर्य नभी
तसेच तुझे हि असामान्य तेज,
सोबतीला माझ्या जरी चांदण्या
तुझ्याशिवाय नाही रे अजिबात चैन
आपण जिच्यावर प्रेम करतो
तिच्या आठवणीत नेहमी झुरतो
डोळ्यासमोर निरागस चेहेरा तिचा येतो
फक्त एकदाच भेटून जा एवढेच सांगून जातो
दूर राहून कधी प्रेम कमी होत नसते
कारण ती आपल्या हृदयात असते
प्रेम कमी होऊ नये म्हणून महिन्यातून एकदातरी भेट होते
क्षणभर भेटते आणि अमाप प्रेम देऊन जाते
दुसऱ्या दिवशी पुन्हा तिचा चेहेरा डोळ्यासमोर येतो
स्पर्श करायला हात तिच्या जवळ सरतो
भास होत आहे हे जेव्हा मला कळते
तिचा विरह जाणवतो आणि काळीज माझे जळते
जीवापाड प्रेम जरी मी तिच्यावर करतो
नियतीच्या खेळापुढे मी कसा हरतो
आपण जिच्यावर प्रेम करतो
पुन्हा तिच्या आठवणीत नेहमी झुरतो
पुन्हा तिच्या आठवणीत नेहमी झुरतो
दूर कुठेतरी
शांत समुद्रकिनारी ...
कुशीत तुझ्या मी
अन गुंफलेले हातात हात...
थोडेसं लाटांसोबत अन
थोडेसं एकमेकांसोबत खेळून ...
मावळत्या सूर्याच्या साक्षीने ...
एकमेकांकडे पाहत
सारया जगाला आज विसरून जावू ...
मिठीत एकमेकांच्या ...
चल ना रे सख्या
आज आपण विरघळून जावू ...
दिवसाचा तळपता सुर्य
रात्रीचा शितल चंद्र
दोघं मला हसतात,
तुझ्या विचारात मी वेडी
येता जाता सर्वाना सांगतात.


अल्लड बेभान वारा
खटयाळ पाऊसधारा
माझी खोडी काढतात,
तू जवळच असल्याची
सैदव जाणिव करून देतात.


उफाळणारा सागर
शांत समुद्रकिनारा
मदहोश मला करतात,
तुझ्या आठवणीत अगदी
चिंब चिंब भिजवून टाकतात
क्षण ते मोहरलेले
धुंद सुगंधित सारे
शहारे आणती सर्वांगावर
स्पर्श तुझे ते का रे ...
हरवून जाई माझ्यातून मी
होता नटखट इशारे
होई तुझ्यातच एकरूप
विसरून देहभान सारे ...
तेव्हा माझी न मी राही
अन् न तू तुझा सख्या रे
बघ ना काय, कसे हे होई
जेव्हा वाहती प्रेमाचे वारे .
सुख म्हणे शोधायच नसत ते आपोआपच मिळत
खरच अस असत का?
मग ह्या जगात कुणीच दुक्खी नसत नाही का?
सुख हे मानन्यावर असत अस मला वाटत....
कुणाला पावसात अखंड भिजुन सुख मिळत
तर कुणाला नुसताच पाउस बघून सुख मिळत
सुख हे मानन्यावर असत......
कुणाला प्राजक्ताच्या सुवासात सुख मिळत
तर कुणाला तीच फूल तोडून सुख मिळत
सुख हे मानन्यावर असत......
कुणाला मित्रांमध्ये रमण्यात सुख मिळत
तर कुणाला एकटाच रहाण्यात सुख मिळत
सुख हे मानन्यावर असत......
कुणाला प्रियकराची वाट बघण्यात सुख मिळत
तर कुणाला प्रियकराला वाट बघायला लावण्यात सुख
मिळत
सुख हे मानन्यावर असत......
कुणाला प्रेम देण्यात सुख मिळत
तर कुणाला प्रेम घेण्यात सुख मिळत
सुख हे मानन्यावर असत......
कुणाला ही कविता लिहिण्यात सुख मिळत
तर कुणाला ही कविता वाचण्यात सुख मिळत
सुख हे मानन्यावर असत......
कुणाला देव देव करण्यात सुख मिळत
तर कुणाला फक्त मनापासून नमस्कार करण्यात सुख
मिळत
सुख हे मानन्यावर असत......
कुणाला हसता हसता आयुष्याशी दोन हात करण्यात सुख
मिळत
तर कुणाला रोज़ रोज़ रडून रडून जगण्यात सुख मिळत

Wednesday, March 21, 2012



ती अबोली सांज होती, की होती शांत रात्र
पण तीच्या डोळ्यात दिसत होते माझेच छायाचित्र

अन् सजले होते स्वप्नही तिच्या डोळ्यान्मध्ये
कि हरवले होते मन तिच्या प्रेमामध्ये

असे वाटे माझ्या मनाला तिचे सौंदर्य पाहून
आली असावी परी आकाशातील चांदन्या लेवून

ती शरद चांदनी अशी काही हसली
आणि कळलेच नाही मला ती कशी कुठे हरवली

आठवणीत तीच्या आता कसा बसा रमतो आहे
या गुलाबी क्षणानाही आता तिचीच वाट आहे
आता तिचीच वाट आहे


एकदा ती माझ्याकडे आली
माझ्याबरोबर 'चल' म्हणाली,
'हो' म्हणायच्या आतंच ती
देऊन हात, घेऊन गेली

होतो सोबत आम्ही चालत
कधी शांत कधी बोलत,
पायवाट निळसर नव्हती संपत

नभी चांदणे, चंद्रासंगत
गोड गप्पा नव्हत्या थांबत
सुरेल आवाज जणू कोकिळेगत
मौनामधे भासे दिव्य एक रंगत
अनवट सूर, बासरीचे उमलत

हसताना ती बाहुली दिसायची
बारीक डोळे अलगद लाजायची,
गालांवर खळी नाजुक पडायची
नयन शिंपल्यात, जपावी वाटायची

तरूतळी एका आम्ही बसलो
मनीचे सारे तिला मी वदलो,
हात थरथरता तिच्या हातात
परि नजर थेट डोळ्यात

काय झालं पूढे सांगत नाही
स्वप्न सारं पुन्हा आठवायचं नाही,
झालो जागा तरी उठलो नाही
करत विचार पडलो मी,
प्रेमामधे तर पडलो नाही !


राहीले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे
भेट होती आपुली का ती खरी, की स्वप्न माझे ?

कापरे ते हात हाती, बावरे डोळ्यात आसू
आग पाण्यातून पेटे जाळणारे गोड हासू
दोन थेंबांच्या क्षणाचे प्रीतीचे तकदीर माझे

गर्द हिरवे पाचपाणी रक्तकमळे कुंकूमाची
खेळताना बिंबलेली शुभ्र जोडी सारसांची
आठवे ? म्हटलीस ना तू ? हे हवेसे विश्व माझे

मी म्हणू कैसे फुला रे, आज तू नाहीस येथे
वेल दारी सायलीची रोज अजुनी बार देते
लाख पुष्पे तोडल्यावीण, ये भरोनी पात्र माझे


अशी असते ती मैत्री...
मैफ़लीत रंगून जाते ती गायत्री
जीवनात विलीन होऊन जाते ती मैत्री

मैत्री हा असा एक धागा,
जो रक्ताची नातीच काय
पण परक्यालाही खेचून आणतो
आपल्याही मनाला जवळचा करून ठेवतो
आपल्या सुख-दु:खात तो स्वत:ला सामावून घेतो.

मैत्री करण्यासाठी नसावं
लागतं श्रीमंत आणि सुंदर
त्याच्यासाठी असावा लागतो
फ़क्त मैत्रीचा आदर

काहीजण मैत्री कशी करतात?
उबेसाठी शेकोटी पेटवतात अन
जणू शेकोटीची कसोटी पहातात.
स्वार्थासाठी मैत्री करतात अन
कामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात.
शेकोटीत अन मैत्रीत फ़रक काय?
दोन्हीपण एकच जाणवतात.

मैत्री करणारे खूप भेटतील
परंतू निभावणारे कमी असतील
मग सांगा, खरे मित्र कसे असतील?

कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात
कधी प्रेमाची बात, अशी असते निस्वार्थ मैत्रीची जात

या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो?
नेत्रकडा ओलावल्या अन शब्द ओठांवरच अडखळला
मित्र या शब्दाचा अर्थ तो दूर गेल्यावर कळला

आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं
सुख-दु:खाच्या क्षणी आपल्या मनाला जपणारं
जीवनाला खरा अर्थ समजावणारं
अशी असते ती मैत्री
ठेवा या लक्षात या गोष्टी
माझ्याशी सुद्धा कराल ना तुम्ही गट्टी??


फुलांनी पुन्हा चूर लाजून व्हावे अशी गोड तू...
निशेने नव्या मंद गंधात न्हावे अशी गोड तू...

अशी तारकांनी असूया करावी तुला पाहता;
सदा चंद्र-सूर्यात संवाद व्हावे अशी गोड तू...

ढगांनी झुलावे, हळूवार यावे, तुझ्या अंगणी;
नभाने तुझ्या उंबर्‍याशी झुरावे, अशी गोड तू...

जणू आळवावी पहाटे पहाटे कुणी भैरवी,
दवाने उन्हालाच ओले करावे, अशी गोड तू

जसे चातकाला मिळावे जरा थेंब मेघातले,
मनाचे समाधान आकंठ व्हावे, अशी गोड तू...

तहानेत ज्या बालकाने किती आसवे वाहिली,
तुला पाहता त्या मुलाने हसावे, अशी गोड तू...

यमाला कसा प्राण माझा मिळे, मी तुला जिंकता;
अता श्वास माझे चिरायू बनावे, अशी गोड तू...

असे मेघ काळे झपाटून जावे, तुला पाहुनी;
इथे पावसाळे सुगंधी बनावे, अशी गोड तू...

कसे काय सांगू कसा गुंतलो मी, तुझ्या प्राक्तनी;
अनावर्त ज्योतिष्य दिग्मूढ व्हावे, अशी गोड तू...

शहाणा म्हणा की, म्हणा आज झालोय, वेडा खुळा;
स्वतःला सखे मी अता विस्मरावे, अशी गोड तू...

सये लाघवी हास्य येता तुझ्या, मुग्ध ओठांवरी;
पुन्हा आज सौदामिनीने रुसावे, अशी गोड तू...

तुझे मूल्य जाणून झाले, अचंबीत ब्रम्हांड हे;
कुबेरासही, मी भिकारी गणावे, अशी गोड तू...

कधीही, कुठेही, कसेही, कुणी नाव घेता तुझे;
पुन्हा या जगाने मला आठवावे, अशी गोड तू...

मला स्पर्श साधा, तुझा भासतो, 'अमृता'च्यासवे;
'तुला मी कसे बाहुपाशात घ्यावे?' अशी गोड तू...

कशाला असे मांडतो मी तुला व्यर्थ शब्दांतुनी?
तुला रेखिण्या जन्म संपून जावे, अशी गोड तू...


आठवण माझी कधीतरी येईलच तुला
तु कदाचीत रडशीलही
हात तुझे जुळवुन ठेव तु
सगळी आसवं तुझी त्यात सामावतील
जो थांबला तुझ्या हातावर
नीट बघ त्याच्याकडे
एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेल

माझ्या आठवणी एखदयाला
सांगताना तु कदाचीत हसशीलही
जो थांबेल तुझ्या ओठावर येता-येता
नीट वापर त्याला
अडखळलेला तो शब्द मीच असेल

कधी जर पाहशील पोर्णीमेच्या तु चंद्राला
त्याच्या तेजाला तु निखरत राहशील
मध्येच गर्द काळ्या ढगांनी जर त्याला घेरलं
नीट बघ त्याच्याकडे घेरलेला तो ढग मीच असेल

कधी जर सुटला बेधुंद गार वारा
मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशील
मध्येच स्पर्शली तुला
जर उबदार प्रेमळ झुळुक
नीट बघ जाणवुन ती झुळुकही मीच असेल


दूरावा म्हणजे प्रेम...
अन, ऒलावा म्हणजे देखील प्रेम...

दूराव्यात असते आठवण...
अन, ऒलाव्यात असते ती साठवण...

दूराव्यात अनेक भास असतात...
अन, ऒलाव्यात तेच भास खास असतात..

दूरावा असह्य असतॊ...
ऒलावा मात्र हवाहवासा असतॊ...

दूराव्यातही असावा ऒलावा...
पण, ऒलाव्यात असू नये कधीही दूरावा...

दूराव्यात प्रेमाचं घर असतं,
अन, ऒलाव्यात त्याला सजवायचं असतं...

दूरावा तूझ्यात अन माझ्यात असला म्हणून काय झालं?
ऒलाव्यालाही हेवा वाटेल असा आहे आपल्या मनाचा आरसा


दिसली कविता की,
उगीच अभिप्राय ठोकुन दे.
छान,सुंदर,ग्रेट,झक्कास..
असे उगीच काहीही फेकुन दे.

प्रोत्साहन देणे म्हणजे
झाडावर चढवणे नसते.
आपल्यातला दिसला की,
राखीव ढोल बडवणे नसते.

हीला कविता कसे म्हणावे ?
हा साधा प्रश्नही पडत नाही .
खोट्या कौतुकाच्या पुढे
इथे काही काही घडत नाही .

शब्दापुढे शब्द मांडले की,
त्याची कविता होत नाही.
आतले बाहेर ओतल्याशिवाय
तिला कवितापण येत नाही.

मला दिसतेय कविता
गटा-गटात अडकते आहे.
बिचारी दर्जेदार कविताही
एखादा वाचक हुडकते आहे.

जग बदलतेय हे खरे तर
कवितेला बदल का रूचत नाही?
चाकोरीबद्ध विषयांशिवाय
दुसरी कविताच का सूचत नाही?

कोणी रोखीत नाही म्हणून
लिहायचे म्हणून लिहू नका.
आपल्याबरोबर शब्दांचा अ‍न्
वाचकांचाही अंत पाहू नका.

मलाच हे समजावे,
एवढा मी काही शहाणा नाही.
दिसले तेच सांगतोय
यात कसलाही बहाणा नाही.

पटले तर होय म्हणा,
नाही तर आहे तसे चालू द्या.
शेवटी कविताच सांगते
मुक्यालाही शब्दाने बोलू द्या.

वाटले तर कवितांचे
आपण पाळणेही लांबवू शकतो !
आपल्यासाठी नाही पण
कवितेसाठी तरी हे थांबवू शकतो !!


धुंद होती रात सारी धुंद होते चांदणे
धुंद होता श्वास माझा धुंद त्याचे वागणे...

धुंद या बेधुंद रात्री सूर होई बावरा
अन तुझ्याही आठवाचे काळजाशी लागणे...

या अश्या एकांतवेळी शब्द येई भेटण्या
पेरतो मी कागदांवर चांदण्यांचे सांगणे...

ओळखीचे लोक सारे ना कुणीही ओळखे
पाहुनी माझ्या दशेला आरश्याचे हासणे...

पावसाने चिंब केले आग ही विझली ज़रा
पण इथे डोळ्यात माझ्या आसवांचे जाळणे ....

शोधतो आहे अजुनी मी तिच्या खाणाखुणा
चालले आहे अजुनी दु:ख ते गोंजारणे ....


जेव्हापासून तुझ्यावर प्रेम केलंय
स्वत:पासून हरवत गेलोय
तुझंच स्मरण असते फक्त
सगळं काही विसरत गेलोय

जेव्हापासून तुझ्यावर प्रेम केलंय
मन तुझ्याचभोवती फिरते आहे
आकाशाकडे पाहत रात्री
स्वत:शीच उसासे भरते आहे

जेव्हापासून तुझ्यावर प्रेम केलंय
जीवन सुंदर झालाय माझं
तुझ्या प्रेमाच्या वर्षावात
चिंब चिंब मन न्हालंय माझं

जेव्हापासून तुझ्यावर प्रेम केलंय
आयुष्याचे अर्थ कळाले
तुझ्या रूपानेच मला गं
प्रेमरूपी दैवत मिळाले!!



मनाला एकदा आसेच विचारले


का इतका तिच्यात गुंततो ?
नाही ना ती आपल्यासाठी
मग का तिच्यासाठी झुरतो ?

कळत नाही तुला
त्रास मला भोगावा लागतो
आश्रूं मधे भिजून भिजून
रात्र मी जागतो.

मी म्हटले मनाला
का स्वप्नात रमतो ?
तिच्या सुखा साठी तू
का असा दुखात राहतो ?

मन म्हणाले
प्रेम तेव्हा सुरू होते जेव्हा
आपण स्वता ला विसरतो
सार काही तिच्यासाठी
ईतकेच मनाला समजावतो।


 कस ओळखाव मी काय तुझ्या मनात आहे
कस कळेल मला काय तुझ्या डोळ्यात आहे.

नजरा मिळवण्या आधीच नजर चुकवतेस तु
कसे ओळखावे कोणते शब्द बंद ओठात आहे.

मी शोधतो जागा माझी सदा तुझ्या भोवताली
पण हे मात्र खर की तु माझ्या काळजात आहे.

सा-या जरी बंद वाटा माझ्या मुक्या शब्दांच्या
परी तु समजुन घे आयुष्य माझ तुझ्यात आहे.

तुला मागुही शकत नाही मी आज तुझ्यापासुन
प्रश्न कोणताच नाही सार काही तुझ्या उत्तरात आहे.

हो आज या नात्याला नाव अस कोणतच नाही
आणि कशाला हव नाव अस काय नावात आहे.

मला फ़क्‍त तु हवी आहेस आणी तुझा श्वास
श्वासाशिवाय जगणा-या काय या देहात आहे.

कधी तरी सागं भावना पोहचल्या मनापर्यंत
कळालच नाही तर काय अर्थ या काव्यात आहे।


 



शब्दांपेक्षा सुध्दा अधिक
स्पर्श असतो बोलका म्हणे
म्हणून काही बोलण्यापेक्षा
मी मिठीतच तुला भरतो सये..

त्या मीठीची मिठास काहि और होती
जीवनात रंग भरत माझ्या चालुन
आलेली ती चांदणी रात्र होती
आज हि मिठी आणि तीचा आभास आहे
आज हि माझ्या आठवणीत ती चांदणी रात्र आहे

Tuesday, March 20, 2012






तुझा हात हातात घेऊन
मला दूरदूर फिरायचय
पट पट चालत नाहीस
म्हणून तुला खूप रागवायचय

फुगलेले तुझे गाल बघून
परत समजवायच य
तुझ्या गालावरच्या अश्रूंना
माझ्या ओठांनी तिपायचय

तुझा हात हातात घेऊन
मला दूरदूर फिरायचय
सोनेरी कोवळ्या उन्हात
चमकत्या पाण्यात उतरायचय

तुझ्या लटक्या नकारात
तुला चिंब भिजवायचय
ओल्या मिठीत तुझ्या
तासन्तास हरवायच य

तुझा हात हातात घेऊन
मला दूरदूर फिरायचय
पायात काटा मोडला म्हणून
तुला कवेत घ्यायचय

थोडे अंतर का होईना
तुझ्या डोळ्यांत बघून चालायचय
अचानक जाणीव येताना
पापनीला झुकताना बघायचय

तुझा हात हातात घेऊन
मला दूरदूर फिरायचय


"निरोप तुझा घेताना, का गं पाऊल जड होतं...?"

निरोप तुझा घेताना, का गं पाऊल जड होतं...?
इतक्यावेळ निपचीतलेलं माझं मन धडधडतं...
काहूर माजतं मनात, मन पाखरासारखं फडफडतं...
बुरुज जरी अभेद्य याचा, हे शरणागत गड होतं...
निरोप तुझा घेताना, का गं पाऊल जड होतं...?

तुझा हात असतो हातात...न्यारं तमाशाचं फड होतं...
तो सुटतो जेव्हा हातातून, डोळे पाणी...काळीज दगड होतं...
स्पर्श तुझा विरतो आणि हे बोथट.. बोजड होतं...
वस्तीपासून दूर...माळरानातलं एकाकी 'वड' होतं...
निरोप तुझा घेताना, का गं पाऊल जड होतं...?

समजावतो, तू भेटणारचं आहेस काहीच दिवसांत...
पण तरीही हे हट्टी, अल्लड होतं...
कुरकुरतं, धुसमुसतं... समजावणं खरच खूप अवघड होतं...
कल्पनेनं विरहाच्या, हे भांबावतं... वेडं होतं...
निरोप तुझा घेताना, का गं पाऊल जड होतं...?


एकदा तिला भेटावसं वाटतय......
आज तिची खूप आठवण येतेय
एकदा तिला बगावसं वाटतय
एकदा तिला जवळ घ्यावसं वाटतय
एकदा तिला खूप सारं प्रेम द्यावसं वाटतय
एकदा तिच्या डोळ्यात बगावसं वाटतय
तिच्या डोळ्यातल्या अश्रूंना पियावासं वाटतय
तिचे सर्व दुख स्वतः सहन करावसं वाटतय
तिच्याशी खूप सारं बोलावसं वाटतय
तिला पूर्ण आयुष्याची ख़ुशी द्यावीशी वाटतय
तिच्या संग एकदा आयुष्याचा खुशीचा क्षण घालावासा वाटतोय
फक्त एकदा फक्त एकदा तिला भेटावसं वाटतय..♥♥♥


तुला चोरून बघताना
मला खुप बर वाटत
तुझ्या मागुन फिरताना
तुझ्या सोबत फिरावस वाटत

तुझ ते निरागस हास्य
निहारून पहावस वाटत
हातात हात घालून
तुझ्या सोबत चालावस वाटत

तुझ्या त्या लाजन्या कड़े
एकटक पहावस वाटत
तुझ्या समोर उभा राहून
तुझा चेहरा मनात भरावसा वाटत

मला खुप खुप खुप
तुझ्या सोबत बोलावस वाटत
तुझ्यावर जिवापार
प्रेम करावस वाटत

खरच
तुझ्यावर जिवापार
प्रेम करावस वाटत


धुंद आसमंत ....
अथांग सागर.....
ओठांच्या किना-यावर आदळणा-या ,
उसळत्या यौवनाच्या लाटा,
स्वैर मनातून भावनांना ,
अभिव्यक्तीच्या हजार वाटा.
एकमेकांत सामावण्याची
एक अनामिक ओढ,
वासनांचे वादळ ,
भावगर्भ डोळे,
जोडत होते निशब्द नाती ,
अस्तित्व विसरायला लावणा-या,
सहवासातील प्रत्येक क्षणाच ,
सार केवळ एकचं........प्रीती.
व्यापून राहिलीय जणू ,
या विश्वाच्या अंती अनंती.


मनालाही असातान मन तर बरं झालं असतं,
कदाचित हे वेडं मन तेव्हा कुणावरच आलं नसतं,
नसतं आवडलं कुणी इतकं,
आणि नसतं जपलं खरच इतकं कुणी कुणाला,
तळमळल नसतं कुणी आणि
कीव आली असती मग मनाचीच मनाला.
मनालाही असतं मन तर बरं झालं असतं....!!!

नसले दाटले अश्रू नयनी,
एव्हाना कातरवेळहि कडवी नसती,
कैद असती मग मनाच्या पिंजऱ्यात, ,
हि स्वप्नपक्षीहि उडली नसती,
मनालाही असतं मन तर बरं झालं असतं....!!!

आताश हे प्रश्न एवढे
तेव्हा नक्कीच जडले नसते,
विचित्र नात्याचे हे कोडे
तेव्हा मात्र पडलेच नसते,
कसं असतं हे विश्वं जेव्हा
प्रेमात कुणी कुणाच्या पडलं नसतं,
आणि वेळ आली असती तर
मनानीच मनाचं मन मारलं असतं
मनालाही असतं मन तर बरं झाला असतं.....
कदाचित हे वेडं मन तेव्हा कुणावर आलं नसतं......!!!!!


असावं कुणी जवळ श्वास आहे जसा,
पहिल्या थेम्बाशिवाय चातक जगेल तरी कसा?
आहे मनात काहूर तो सर्व सांगून टाकेन,
या पहिल्या थेम्बानंतरच माझी तहान भागेल…..

असावं कुणी जवळ ज्याचा मला आधार आहे,
इंद्रधनुष्य जसा त्याच्या रंगांशिवाय निराधार आहे,
माझ्या जीवन चित्रात रंग तिचेच असावेत,
आणि व्हावे असे काही कि चित्रच गोड हसावे…..

असावं कुणी जवळ जिने केसांतून हळूच हात फिरवावा ,
सुखावलेल्या मनाला मग फक्त तिचाच चेहरा दिसावा ,
जिच्याशी गप्पा करण्यात रात्र रात्र जागवाव्या,
वाटे मनाला हा सूर्य कधी न उगवावा….

असावं कुणी जवळ जिला फक्त नि फक्त माझान म्हणता यावं,
खोल पाणी जसं तिच्या डोळ्यात सतत पाहावं,
शब्द नसतानाही संवाद गोड व्हावा,
कधीतरी कातरवेळी तिचाच अश्रू नयनी दाटावा…..

सांग येईल का ती या चातकाला तिचीच आस आहे
थेंब तर बरेच आहेत पण
पहिलाच तो थेंब खास आहे
पहिलाच तो थेंब खास आहे…….!!!!


प्रिये तू जाऊ नकोस दूर
वाटेल हुरहूर तुझ्या विरहाची
तुजविन नाही मज
येणार नीज तळमळ होईल रातीची

तुझ्या निळ्या निळ्या नयनात
पाहता त्या ऐन्यात मीच ग मला
विसरुनी जाते देहभान, जगाची नच जाण
खरच सांगतो तुला

हाती घेता तुझा ग हात
माझ्या अंगात उठती धुंद लहरी
ओठ गुलाबी ते चुंबिता प्यावे जसे अमृता
वाटते ग सुंदरी

केसांमध्ये माळता मोगरा
आणखीच होई साजरा एक चेहरा लाजरा
थोडा लटका तो बावरा जणू ती अप्सरा
आली या भूवरा

लाडे लाडे एक खुले कळी
नाक ते चाफेकळी उडवी पाहुनी मजकडे
मग हसू येई मनात गुलाबी गालात
गोड खळी पडे

रुपेरी चांदण्यात माझ्या बाहूत
जेंव्हा तू शिरसी
एक आगळ्या धुंदीत वेगळ्या विश्वात
नेसी तू मजसी

असता तुझी ग साथ
केंव्हा सरे रात मज न कळे
लाल होई पूर्वेवर तुझ्या हि गालावर
रक्तमा खेळे


तुला पाहण्यासाठी,
आता माझ्या बरोबर चंद्र हि थांबतो,
तारे हि लाऊन बसतात डोळे, तुझ्या वाटेकडे,
वाराहि गाऊ लागतो, तूझ्या येण्याचे गाणे,
अन वेडे होऊन वाट पाहतो, आम्ही सारे शहाणे...

तू दिसताच, चंद्र हि लाजतो,
तारे हसू लागतात,
अन वारा नाचू लागतो...

मी हि हसतो, तुला पाहून ,
वार्या बरोबर नाचतो, मी हि थोडा जाऊन...
आज तरी सांगेन तुला मनातल गुपित ,
अस रोज मी ठरवतो...
पण तू समोर येताच,
कळतच नाही कधी, मी तुझ्यातच हरवतो...

रात्र निघून जाते तुझ्याशी बोलण्यात,
पण मनातल गुपित मनातच राहत...
तुला पाहून रोज माझ असच होत,
रोज ठरवतो मी बोलायचं,
अन तू समोर येताच,
शब्द गोठतात माझे,
आणि रोज माझ हस होत...
आणि रोज माझ हस होत...


कधी कधी कळतच नहीं आपण काय करतोय,
नकळत कुणाच्या भावविश्वात असे रमतोय,
वाटते की तो मार्ग आपला नाही,
पण न राहूनही मन तिकडेच वळतय,
काय सांगावे मनाला काहीच सुचत नाही,
काय म्हणावे याला हेच कळत नाही,

प्रित अशी ओढत घेवुन जाते,
साद तिची कानी एकु येते,
नाद असा घुमतो हा तिचा,
मन माझे बहरून जाते,
वेडावलेले मन थांबेल कसे,
तिच्या येण्याची फ़क्त वाट पाहत असे,

असेच होते जेव्हा प्रेम होते,
अनोळखी मन आणि नविन नाते,
हावी हवीशी वाटते ती प्रत्येक आठवण,
फ़क्त तिचे रूप आणि मनातील साठवण,
प्रत्येकाच्या जीवणात ही वेळ येते,
प्रेमामधे जेव्हा मैत्रीची भेळ होते,
प्रेम हा वेड्यामनाचा खेळ असतो,
कुणा एका अनोळखी व्यक्तिशी झालेला मेळ असतो......


बोल बाबा बोल,
काहीतरी बोल,
माझ्यासाठी तरी,
आज ओठ तुझे खोल ,

बोलून बोलून थकले रे ,
आता माझे तोंड,
का रे अचानक आज
मांडले तू बंड,

लावू नको माझा,
उगा जीव टांगणीला,
क्षमा कर न रे राजा,
तुझ्या या राणीला,

कळत कस नाही तुला,
खोट खोट रुसणं,
बर का हे अस ,
वेळोवेळी हिरमुसणं,

छळू नको माझ्या राजा,
पकडले मी कान,
माफ केल म्हणून नुसती,
हलव तरी मान.

आता मात्र हद्द झाली,
हास पाहू आधी,
निघून जाईन नाहीतर मी,
बोलणार नाही कधी,

आता कशी स्वारी ,
छान वळणावर आली,
उशिरा का होईना,
पण दया तुला आली,

तुझ्याशिवाय दुसर कोणी,
आहे का रे मला,
चुकले तरी तूच आता
सांभाळून घे मला,

उशीर झाला निघते आता,
कशी थांबू या अवेळी,
रागवू नकोस पुन्हा ,
उद्या भेटू या सकाळी...........


तू माझ्याबरोबर नसशील तर मी दुरावून जातो
माझ्यामधला मी हिरावून जातो
कुठलेही कार्य करण्याचे उमेद विरून जाते
तू बरोबर नसल्यावर....

तू बरोबर नसल्यावर....
काळाचे भान राहत नाही
वेळचा पत्ता लागत नाही

तू बरोबर नसल्यावर...
हसतानाही मी रडतच असतो
जगण्यात रस वाटत नाही
तू बरोबर नसल्यावर...

पण तू बरोबर असल्यावर
सगळे काही सोपे होते
सगळे दुखः विरून जाते
दिवसाही चंद्रमा भासू लागतो तू बरोबर असल्यावर..........


आंघोळ करून ओले केस कधीतरी मोकळे सोडशील
त्या ओल्या केसांना वाऱ्यासमोर धरशील.
तुझ्या केसात फिरणारा तो वारा व्हायचंय मला ...!!!


तुझ्या सुंदरतेला शृंगाराची गरज नाहीयेय,
तरीही आरशात उभी राहून स्व:ताचं ते रूप न्ह्याहाळशील
तुझे रूप हक्काने पाहणारा तो आरसा व्हायचंय मला ...


बाहेर जाशील तेव्हा अंगाला अत्तर लावशील,
तुला पाहून घायाळ होणारे आधीच खूप आहेत,
त्यात ते अत्तर लावून अजून भर घालशील.
तुझ्या जवळ सुगंधाने दरवळनारं ते अत्तर व्हायचंय मला ...


पावसाचा एखादा थेंब अचानक टपकन तुझ्या अंगावर पडेल
तुझ्या अंगावर एक मस्त शिरशिरी येईल
हर्षाने तुझ्या अंगावर उभा राहिलेला तो काटा व्हायचंय मला ...


बसने जाताना खिडकीतून बाहेर बघशील
बाईकवर बसलेल्या जोडप्याच्या गोंडस बाळाकडे बघून खुदकन हसशील
तुझ्या चेहऱ्यावरचे ते निरागस हास्य व्हायचंय मला ...


सगळी कामं झाल्यावर कधीतरी समाधानाने एका जागेवर बसशील
त्या शांततेत फक्त स्व:ताच्याच श्वास ऐकशील
ज्या श्वासाला तुझ्यासोबतचे इतके क्षण मिळालेत तो श्वास व्हायचंय मला ...


कधीतरी एकटे वाटेल,तुला माझी आठवण येईल
तेव्हा तुझ्या पापण्या ओल्या होतील
माझ्याच आठवणीने तुझ्या डोळ्यात आलेल्या पाण्याचा तो थेंब व्हायचंय मला .


ती’.
त्याच्या अखंड प्रेमात बुडालेली.
बडबडी. हसरी.
आणि ‘तो’
काहीसा अबोल. शांत. स्वतत हरवल्यासारखा.
एक दिवस ती चिडते. वैतागते. तिला वाटतं, इतर मुलं आपापल्या ‘तिच्या’विषयी किती भरभरून बोलतात. तिची तारीफ करतात. आणि हा गप्पच.
ती त्याला विचारतेच, ‘मी छान दिसते असं तुला वाटत नाही का.?
तो म्हणतो, ‘नाही.!’
‘याचा अर्थ तुला आयुष्यभर माझ्यासोबत राहण्याची इच्छा नाही.’- ती.
‘नाही.!’- तो.
‘म्हणजे मी आत्ता याक्षणी तुला सोडून गेले तर तुलाच काहीच वाटणार नाही.!’- ती.
‘नाही.’- तो.
ती हा नन्नाचा पाढा वाचून अधिकच संतापते. चिडते. डोळ्यातलं पाणी पुसत चालू लागते.
त्यावेळी तो तिचा हात हात हातात घेत तिला थांबवतो आणि म्हणतो.
‘तू फक्त छान नाही दिसत, तू नितांत देखणी आहेस.!’
‘आणि मला तुझ्याबरोबर आयुष्यभर राहण्याची केवळ इच्छाच नाही तर ती माझी जीवनावश्यक गरज आहे.!’
‘आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, तू मला सोडून गेलीस तर मी रडणार नाही. कारण रडण्यासाठी माणूस जिवंत असावा लागतो आणि तू सोडून गेलीस तर मी जिवंतच राहणार नाही.!’

ती हे ऐकून गप्पच होते. त्याक्षणी तिला कळतं, प्रेम म्हणजे फक्त शब्दात व्यक्त होणं नव्हे आणि जे शब्दात सांगता येतं तेवढंच समजणं नव्हे. प्रेम म्हणजे जे आपल्याला ऐकायला आवडतं तेच नव्हे. कारण जे आपल्याला ऐकू येत नाही, कळत नाही त्यापलीकडेही भरभरून देतं प्रेम. पण ते घ्यायला आपल्या मनाची खिडकी उघडी मात्र असायला हवी. नाहीतर गैरसमजाची जळमटं चढणारच नात्यावर.!

Monday, March 19, 2012



कसे भास होत असतात मला
कसे कसे सुंगध पसरतात मनात माझ्या
तू आठवत राहतेस संध्याकाळी
तिन्हीसांजेला,
कशी हलके हलके उतरतेस मनात माझ्या
ह्या खिन्न वेळी ,कातरवेळी
अलगद पावलांनी

किती दूर आहेस तू
नि मी असा परदेशी
फक्त एकटा
माझ्या खिडकीतून बघत बसतो
हे खिन्न आभाळ
नि घराकडे परतणारी पाखरे

तुझ्या आठवणीने
किती काहूर उठतात मनात माझ्या
नि किती व्याकुळ होऊन जाते मन माझे
गच्च कल्लोळ नुसता
मी गुदमरून जातो
तुझ्या आठवणीत

हे सगळे आठवून
हलकेच कल्लोळ कमी होऊ लागतो
माझ्या मनातला
नि हलके हलके शांत होऊन जाते मन
मग अलगद उतरते संध्याकाळची प्रार्थना
पाखरासारखी निशब्दपणे
पंख मिटून
झाडा -पानात हरवून जाते
तसे तुझ्यां प्रार्थनेच्या स्वरांनी
माझेही मन होऊन जाते निशब्द
मन मिटवून
प्रार्थनेच्या स्पंदनात



नको रे कान्हा आडबाजूला भेटूनी
नको लगट दावू उगीचच खेटूनी ||

नार मी भोळी साधी सरळ हरणी
रस्त्याने जाई येई सलज्ज तरणी
सख्यांसवे मथूरा बाजारी निघाले
अडवूनी दुध दही नको घेवू लुटूनी ||

गोरी माझी काया तू रे सावळा
मनात दुजे काही चेहेरा भोळा
नको छेडाछेडी दिसे मग सार्‍यांना
ओढताच वस्त्र अंगाचे गेले सुटूनी ||

श्रीहरी मनमोहन कृष्णा रे मुकूंदा
केशव मुरलीधर माधवा गोविंदा
अनंत नावे तुझी येती माझ्या मुखी
विनवीते गौळण पाया तुझ्या पडूनी ||

तुझ्याविण दुजे माझे आहे सांग कोण
तुझ्याविण जग सारे होई वैराण
यमुनेच्या वाळवंटी जीवन मज सापडले
तुझ्यासवे त्यात गेले चिंब न्हाऊनी ||


''ऐकव ना रे तुझी जुनी ती कविता''
म्हणते सखी मला, अन् हळूच हसते ।
तळहातांवर चेहरा घेउन,
उत्सुकतेने समोर बसते ।

समजत नाही काय करावे,
जुनीच कविता मांडावी? की स्वस्थ बसावे-
-समोरची वाचावी कविता?
वाचू देते खुशाल तीही,
केवळ माझ्या कवितेकरता ।

क्षणाक्षणाला अधिरा होतो रंग तिचा,
मी बुडू लागतो तिच्यात, तेव्हा
पुनश्च हसते, अन् उंचावुन भुवया म्हणते,
विसरलास का रे कविता ती?

उत्तर देण्याइतके नसते भान मला,
मी तिलाच केवळ पाहत बसतो,
बऱ्याचशा माझ्या कवितांचा
जन्माचा क्षण असाच असतो !!


कविता मला कधीही सुचतात.

झोपायचा आधीही

परीक्षेच्या मधीही

कविता करायच्या म्हणाल्या तर त्या होत नसतात

त्या दिव्यातील ज्योत असतात

तेल घातल्याशिवाय दिवा लागत नाही

शब्द जूळल्याशिवाय कविता स्फुरत नाही

कविता प्रत्येकाला येत असतात

वास्तवतेपेक्षा दूर नेत असतात

शब्द प्रत्येकाच्या मनात ठसलेले असतात

अगदी रुतून बसलेले असतात

एक एक शब्द वर घेऊन जूळवायला आला

की समजाच तुम्ही कवी झाला.


तुझ्या आठवणीच्या पावसात भिजणारी ही कविता

तुझ्या डोळ्यात बरसलेली ही कविता,
अश्रुंच्या शब्दात भिजलेली ही कविता.

राहुन राहुन डोळ्यांच्या कडातुन ओघळण्यास बैचैन ही कविता,
मोहक डोळ्यांच्या रगांत रंगलेली ही कविता.

तुझ्या पापण्यांच्या सावलीतुन पुढे सरकणारी ही कविता,
तुझ्या आठवणींचे थेंब डोळयातुन बरसवणारी ही कविता

तु दिलेल्या वेदना हसत मुखाने झेलणारी ही कविता
वेदनेच्या डोहात खोलवर बुडणारी ही कविता,

बघा जरा काय सांगु पाहते ही कविता.

मनातल्या सा-या वेदना सांगु पाहणारी ही कविता,
तुझ्या आठवनीची जाणीव करणारी ही कविता

जिंकल्यावरही ’फ़क्त तुझ्यासाठीच’ हरणारी ही कविता
तुझ्यासाठी रडणारी ही कविता.......

मग कशी वाटली ’ही’ कविता.......................
शब्द तू, संगीत तू. तूच गाणे
अंतरात निनादती तव तराणे.

बहरलेले झाड तू जे कळ्यांनी
बरसलेले मेघ तू जे सरींनी
सजविले आहे मना तू फुलाने.

रात तू जी भारली चांदण्याने
गीत तू जे गायले पाखराने
रंगल्याले तूच ते ना या नभाने.

तूच दर्या, तू नदी अन् झरा तू
चांदणे तू, चांद तू अन् धरा तू
ल्यायलेले रुप तू या धरेने...


माझ्या वहीच्या पानांमधुनी येशील का तू उतरूनी भूवर ।
उपमा-रूपक-छंदांमधुनी सांग सखे तू लपशील कुठवर ।।

अंगणात या नीलनभाच्या येती उतरूनी स्वप्नथवे ।
अशाच अनुपम उषासमयी पेरलेस तू स्वप्न नवे ।
स्पंदनांत मग या हृदयाच्या झंकारून तू गेलीस क्षणभर ॥
माझ्या वहीच्या पानांमधुनी येशील का तू उतरूनी भूवर ।।

गतप्राण जणू तुजविण होती माझ्या गीतांमधले सूर ।
उदासवाणा चंद्र झुरे मग तारेही जणू विरह आतूर ।
चित्र तुझे शब्दांत रेखिता श्वासही माझे होती सुस्वर ॥
माझ्या वहीच्या पानांमधुनी येशील का तू उतरूनी भूवर ।।

समजून सारे गूज मखमली मनास माझ्या अगम्य तू ।
शब्दस्वरांतून मूर्तिमंत जरी अमूर्त गहन सुरम्य तू ।
तूच प्रेरणा, तूच कल्पना, तूच चेतना भावमनोहर ॥
माझ्या वहीच्या पानांमधुनी येशील का तू उतरूनी भूवर ।


कोणते शब्द वापरू तुझे गुण गाण्या,
तू स्फूर्तीचीही मूळ प्रेरणा असशी,
मी इच्छा करतो आणि कौतुके तूही
लेखणीतून या सारे लिहवुन घेशी |

मग शब्दांना त्या लाभे अमृत-उपमा,
अर्थाला द्याया उपमा न चले बुद्धी,
हे मी नच केले, घडले तुझ्या कृपेने,
ही जाणिव होता मनास लाभे शुद्धी |

हे सगळे तरिही शब्दरूप, बाह्यांगी,
तू निसटुन जाशी मना मोहवुन माझ्या
अन् पुन्हा एकदा तुझे रूप-गुण गाण्या,
अन् तुला पकडण्याची मज होते इच्छा


प्रेमात पडणं सोपं असतं
पण प्रेम निभवणं कठीण असतं

हातात हात घेऊन चालणं सोपं असतं
पण तोच हात आयुष्यभर हातात घेऊन
पाऊलवाट शोधणं कठीण असतं

कधी कधी एकमेकांत गुंतत जाणं सोपं असतं
पण ती गुंतवणुक आयुष्यभर जपणं कठीण असतं

माझा तुझ्यावर विश्वास आहे हे म्हणनं सोपं असतं
पण तोच विश्वास कायम ठेवुन वाटचाल करणं कठीण असतं
प्रेमात खुप वचनं आणि शपथा देणं सोपं असतं
पण ती वचनं आणि शपथा निभवुन नेणं मात्र कठीण असतं

प्रेमात खोटं बोलणं सोपं असतं
पण खरं बोलुन प्रेम टिकवणं मात्र नक्किच कठीण असतं

म्हणुन सांगतो प्रेमात पडणं
सोप नसतं, सोप नसतं, सोप नसतं ..!

तू जवळ असलास की
माझं मलाच कळत नाही
इतक्या मायेने, इतक्या प्रेमाने
आनंद कधीच कुरवाळत नाही

तू जवळ असलास की
स्वर्ग धरतीवर स्वार होतो
चांदण्यांचा एक थवा
घरटं बांधण्यासाठी तयार होतो

तू जवळ असलास की
स्पर्श खूप बोलका होतो
तू हात गुंतवतोस केसात नि
अतृप्त मनाचा भार हलका होतो

तू जवळ असलास की
तुझ्या डोळ्यातील भाव वेचत राहते
एक अनामिक ओढ नकळत
मला तुझ्यापाशी खेचत राहते

तू जवळ असलास की
माझा प्रत्येक क्षण मोहरतो
तू अलगद मिठीत घेतोस
माझा उभा देह शहारतो

तू जवळ असलास की
माझं मला काहीचं माहित नसते
रात्रभर मग गुपीत वाचते
जे साचलं मनाच्या वहीत असते

तू जवळ असलास की
विचार भावनांपुढे नमतं घेतात
माझं तुझ्यासवे मुक्त विहरणं
त्या गोष्टीची ग्वाही देतात

तू जवळ असलास की
मला वेडं लागणं निश्चीत असते
काही क्षण का होईना
माझं शहाणपण उपेक्षीत असते

तुझ्यामुळेच तर माझ्या गाली
एक खळी खुलली आहे
तुझ्यामुळेच तर फूल होवून
एक कळी फुलली आहे
तुझ्यामुळेच तर जिवनात
रोज दसरा नि दिवाळी आहे
पण..........
तू नाहिस तर........
भयाण एकांत, ओसाड, विराण
अभाग्य माझ्या कपाळी आहे
मन बरसताना माझे तू हवा होतास.
ओल्या ओठांवरल्या दवाला तू हवा होतास.

ढगांचा गडगडाट, मनाचा हिंदोळा,
अंगावरचा शहारा, तुझ्यासाठी थांबला होता.
उबदार कवेत घ्यायला तू हवा होतास.

पावसाळ्यातला एकटेपणा, निसरडी माती,
उडणारा पदर, तुझ्यासाठी थांबला होता.
वाहणारे ओहोळ सावरायला तू हवा होतास.

हिरवाई सगळीकडे, झाडं वाढलेली चिकार,
काट्यात झुलणारा गुलाब, तुझ्यासाठी थांबला होता.
त्याच्या सुवासाला तू हवा होतास.


मी तीला पाहत होतो
ती मला पाहत होती
पाहता पाहता एक दिवस तस काही होईल असे वाटले नव्हते
खरच प्रेमात हे असेच असते

मी तीच्याशी बोलत होतो
ती मझ्याशी बोलत होती
बोलता बोलता एक दिवस तस काही होईल असे वाटले नव्हते
खरच प्रेमात हे असेच असते

मी तीच्या घरी जायचो
ती माझ्या घरी यायची
येता जाता एक दिवस तस काही होईल असे वाटले नव्हते
खरच प्रेमात हे असेच असते

मी तीच्या तीने माझ्या सहवासात रहावे
असे एकदा वाटु लागले
होता होता एक दिवस तस काही होईल असे वाटले नव्हते
खरच प्रेमात हे असेच असते

अखेर एकदा मी तिला प्रेमाचि साद घातली
तिनेही मला प्रेमाने प्रतिसाद दिला
पण आता असेच वाटते एक दिवस असे होनार होते
कारण खरच प्रेमात हे असेच असते..हे असेच असते


शब्दांच्या ओळी बनतात जेव्हा
आठवतो तो प्रत्येक शब्द मला
तो शब्द कधी न विसरणारा
काय होते त्या शब्दात ज्यातून बनते ही कविता…..

मला लागली आहे ओढ त्या शब्दांची आज

दु:खी कविता प्रेम कविता
व्यंग कविता व्यक्तिमत्वावर कविता
ह्या सर्वांत ऋतले होते अनेक शब्द
ओळखू शकलो असतो त्या शब्दांना मी तर…

ते शब्द आज मला हवे आहेत जणू.. वेडच लागले त्या शब्दांचे

आज ऐकावीशी वाटते तिची हाक
तिच्या ओठांतून ऐकावे ते शब्द… शब्द प्रेमाचे
ऐकून ते शब्द मज अंत:करण भरून यावे
पण ते शब्द हरवले आहेत मज अंत:करणात

शोधू कुठे मी त्या शब्दांना मज लागली आहे ओढ आज त्या शब्दांची

असते त्या शब्दांचे महत्व अमाप
कारण ते शब्द असतात कधी न संपणरे
प्रत्येक शब्द प्रत्येकासाठी महत्वाचा असतो
कधी तो वाईट असतो कधी चांगला

अमूल्य असतात हे सगळे शब्द म्हणूनच ओढ लागली आहे आज त्या शब्दांची

शब्द आनंदाचा शब्द प्रेमाचा
क्षण सुखाचा क्षण उल्हासाचा
शब्द दु:खाचा शब्द विरहाचा
प्रत्येक क्षण समावती त्या शब्दांजोगे वैषिष्ठ्य

म्हणूनच मला आज लागली आहे ओढ त्या शब्दांची…

Friday, March 16, 2012



तिला म्हणालो,मला आजकाल झोप येत नाही
काय करु, तुझी आठवण मला झोपूच देत नाही
क्षणभर विलम्ब न करता तिने तिची पर्स उघडली
झोपेची गोळी काढून,माझ्या हातावरती दिली.
...... काय सांगू तुम्हाला,माझी वेगळीच केस आहे.
अहो! प्रेयसी माझी, एम.बी.बी.एस

मी म्हणालो, माझ्या प्रत्येक श्वासात तुझाच गंध आहे.
रक्ताच्या प्रत्येक थेंबास, तुझ्या
प्रेमाचा रंग आहे.
ती म्हणाली,धीर धर अजुन थोडासाच उशीर आहे.
उद्या आमच्या रुग्नालयात मोफ़त रक्ततपासणी शिबीर आहे.
...... काय सांगू तुम्हाला,माझी वेगळीच केस आहे.
अहो! प्रेयसी माझी, एम.बी.बी.एस


मी म्हणालो, तुझ्यासाठी काहीही करु शकतो.
माझ ह्रुदय काढून, तुझ्या हाती धरु शकतो.
त्याक्षणी ती उठली,आणि आत निघून गेली.
माघारी येताना हाती"डिसेक्शन बोक्स"घेवून आली.
..... मित्रांनो अशी ही, माझी वेगळीच केस आहे.
अहो! प्रेयसी माझी, एम.बी.बी.एस .

एकदा तिच्याशी बोलता बोलता
ठेच मला लागली.
तिने तिची ओढणी,माझ्या पायावरती बांधली.
नजरेस नजर मिळवून माझ्या,हळूच ती म्हणाली.
पडलास तू,पण जखम माझ्या काळजावरती झाली.
.......... तर माझी ही केस अशी


धुंद एकांत हा, प्रीत आकारली
सहज मी छेडीता, तार झंकारली
जाण नाही मला,प्रीत आकारली
सहज तू छेडीता, तार झंकारली

गंधवेडी कुणी, लाजरी बावरी
चांदणे शिंपिते चैत्रवेलीपरी
यौवनाने तिला आज शृंगारली

गोड संवेदना अंतरी या उठे
फूल होता कळी, पाकळी ही मिटे
लोचनी चिंतनी मूर्त साकारली

रोमरोमांतूनी गीत मी गायिले
दाट होता धुके, स्वप्न मी पाहीले
पाहता पाहता रात्र अंधारली
आज बाहूत या लाज आधारली


रूप पाहता तुझे , वाटे पाहतच राहावे,
वाटे, या मोहनाला आपल्यात सामावून घ्यावे.
तूला ओवाळून, आरती करावी.
प्रेमाच्या पवित्र्यात अंघोळ घालावी,
अन गोड तुझे ते बोल ऐकतच बसावं,
अखंड तुझं नामस्मरण करावं.
जिथं तू तिथं तुझ्यासवे मी यावं.
परी या दुनियेपुढे कशी मी जाऊ?
आपल्या निर्मळ प्रीतीला गालबोट कशी लाऊ?
इच्छांचे काय ? त्या तर वाढतच राहतात.
माझी सात्विकता तुला मी अर्पिली,
माझी भक्ती तुझ्या चरणी मी अर्पिली.
तुझ्यात मज दिसे सारे जग,
माझ्या कान्हा, माझी मुरली..........


अडीनडीला हाक मारता
धावत तू येशी
कृष्णसख्या रे म्हणुनी मजला
तूच आवडशी ----

नीलवर्ण ह्या तनूस शोभे
मुद्रा तव हासरी
मोरमुकुट हा मस्तकी शोभे
हाती तव बासरी ----

बासरीतुनी सुरेल सुंदर
सूर जणू फुलती
ऐकण्यास ते म्हणुनी सारे
जमती तुजभवती ----

मंत्रमुग्ध रे होऊनी जाती
सारे गहिवरती
काय करावे उमगत नाही
गुंग होई ती मती ----

तुझ्याविना या जगती नाही
दुजा कुणी आसरा
मनात माझ्या सदैव वसतो
चेहरा तव हासरा ----

कृष्ण न केवळ मूर्तीमध्ये
दडुनी की बसला
चराचरातील वस्तुजाती तो
भरुनी असे उरला


स्वप्नी माझिया कुणीतरी आले
डोळयांच्या कडा टिपून गेले
सखये माझे भान हरपले
काहीही मजला कळेना झाले ----

कुंजवनी मी जेधवा गेले
स्वप्नीचे रूप नयनी आले
जळी-स्थळी अन् पाषाणी भले
सगुण सुंदर रूप दिसले ----

मुरलीचे सूर कानी आले
अमृतधारांनी न्हाऊनी गेले
राधेचे मन तल्लीन झाले
कृष्णरूपात विलीन झाले


कृष्ण उतरतो रोज नभातुणी

कालिंदीच्या तिरी

राधा येते शोधत तेथे

दोघांची बासरी ,

सुर तेच पण कृष्ण नव्हे तोच

सांजं राग हो निळा

तीरावर राधेला शोधत

कृष्ण बने सावळा

वाळूवरती कृष्ण शोधतो

तिच्या सांडल्या हाका

राधा राधा चाल तयला

काळोखाचा टेका

गगन निळे आणि रात सावली

भेट अनावर रोज

कृष्ण कृष्ण आण राधा राधा

गात पसरते सांज


तू उभी तिथे असे मुक जरी
तुझे नयन बोलती काहीतरी

आहे खोल खोल अन घारे
चमचम चमकती तारे
भूल घालती मज जादूगरी
तुझे नयन बोलती काहीतरी

डोळ्यातले जहरी भाव
मज करीती खोल घाव
वेडावते छटा मज लाजरी
तुझे नयन बोलती काहीतरी

कसे नजरेत बाण पेरीले
मज दाही दिशा घेरीले
किती जखमा झाल्या भरजरी
तुझे नयन बोलती काहीतरी

नजरेत तुझ्या धार किती
सांग केले तू ठार किती
मज वार लागला जिव्हारी उरी
तुझे नयन बोलती काहीतरी


सजल नयन नित धार बरसती
भावगंध त्या जळी मिसळती

वीणेचे स्वर अबोल झाले
गीतामधले काव्यहि सरले
मुक्या मनाचे मुकेच आठव
मूक दीपज्योतीसम जळती

चंद्र चांदणे सरले आता
निरस जाहली जीवनगाथा
त्या भेटीतिल अमृतधारा
तुझ्याविना वीषधारा होती

थकले पैंजण चरणहि थकले
वृंदावनिचे मोहन सरले
तुझ्या स्मृतींची फुले प्रेमले
अजुनि उखाणे मला घालिती

Thursday, March 15, 2012



फक्त तू नकोस मला

फक्त तू नकोस मला
साथही तुझी हवी आहे
शांत स्थळी एकांतवेळी
प्रीत तुझी हवी आहे

शृंगार प्रेम नको मला
वात्सल्य प्रेम हव आहे
सांजवेळी सूर्यास्ताला
प्रेमगीत हव आहे

दवबिंदू नकोत मला
रिमझिम पाऊस हवा आहे
रानफुलाला सुखावणारा
गार वारा हवा आहे

फक्त शब्द नकोत मला
अर्थ त्यातला हवा आहे
तिमिरातून तेजाकडचा
मार्ग त्यातून हवा आहे

सृष्टी सारी नको मला
द्रुष्टी तुझी हवी आहे
तुझ्या डोळ्यात दिसणारा
विश्वास मला हवा आहे

तुझा दुरावा नको मला
सहवास तुझा हवा आहे
खचनाऱ्या माझ्या मनाला
आधार तुझा हवा आहे

क्षण तुझे नकोत मला
प्रत्येक क्षणी तू हवी आहेस
वेळ तुझी नको मला
वेळीस तू हवी आहेस


तू आणि मी फक्त तू आणि मी
बाकी कोणीच नाही!
माझी तू नि तुझा मी!
तू दूर जाताना तुझा हात पकडून
तुला जवळ घ्यावे मी
कडाडू दे सारे आभाळ
आणि बरसू दे मेघमल्हार
तू घाबरशील अन बिलगशील मला...
तुला घेईन मिठीत मी!
तू पाहशील माझ्याकडे
अन तुझ्याकडे पाहीन मी
गहिवरू दे श्वास...
आणि संपून जावू देत सारे आभास
विसरून जावू जगाला जेव्हा....
तुझ्या ओठांना स्पर्श करतील ओठ माझे
लागू दे आग पेटू दे ठिणगी जेव्हा...
भिजलेल्या तुला पाहतील डोळे माझे
तू आणि मी फक्त तू आणि मी
बाकी कोणीच नाही!
माझी तू नि तुझा मी!.......................................


ती म्हणजे खरंच पावसासारखी.
ती म्हणजे खरंच पावसासारखी
थेंबा थेंबाने येते आणि आपल्याला व्यापून टाकते.
वरून दिसतो आपण कोरडेच
पण ती आपलं मनही ओलेचिंब करून जाते.


आपण पहात रहातो खिडकीतून रिमझिमणारा पाऊस पाणी,
पण तो पाऊस नसतोच मुळी त्या असतात तिच्या आठवणी.
आपल्याही नकळत आपण खिडकीतून हात बाहेर काढतो
आणि तिला तळहातावर घेतो. पुन्हा पावसात हरवून जातो.

तळहातावर ती, बाहेरही ती, आपणही स्वतःला झोकून देतो
आपल्याही नकळत खिडकीतून बाहेर जातो.
ती रिमझिमणारी सर, आपण मुसळधार पाऊस होतो.
तिच्यासह अवताल भवताल सारं सारं कवेत घेतो.
पाऊस

हिरवी राने, हिरवी पाने, हिरव्या वेली, हिरवी मने
हिरव्या हिरव्या हिरवाईतून टपटपणारी दोन जणे
कोणती ती आणि कोणता मी, ओळखत नाही आता कोणी
आई म्हणते, ” काय रे घरात आले कोठून पाणी ?”

दचकून तेव्हा मी माझ्या पायाशी पहातो
पाणी नसतेच तिथे मग भांबावून जातो
माझ्या चेहऱ्यावर उमटलेल्या तिला आई पहात रहाते
कुठल्यातरी कौतुकानं माझ्या हाती चहा देते.

खिडकीमधून रिम झिमणाऱ्या पुन्हा तिला पहात रहातो
चहावरची वाफ होतो खुशाल तिच्या कवेत जातो.
ती आपल्या आयुष्यात येते आणि आपण हरखून जातो. ती असते आपल्या काळजाचा ठोका………ती आपल्या हृदयाची स्पंदनं. आपल्याला हवी तशी ती आपल्या आयुष्यात आली कि आपल्या मनातला झोका आपल्याही नकळत आभाळाला जाऊन भिडतो. आपल्याला आभाळ अगदी आपल्या कवेत आल्यासारखं वाटू लागतो. काळ पर्यंत जमिनीवर असणारा आपल्या स्वप्नांचा झोका असा आभाळात न्यायला कारणीभूतही तीच असते.
ती आयुष्यात आली कि आपल्याला वास्तवाचं भानच रहात नाही……….आभाळातून आपण जमिनीवर उतरायला नकोच म्हणतो. वास्तवाच्या जमिनीवर कसं उतरायचं याचं भानही उरलेलं नसतं आपल्याला आणि मग आपण तिलाच विचारतो, ” आग तुझ्या सहवासात मी नभात उंच भरारी घेतलीय खरी पण आता मला वास्तवाच्या भूवर कसं उतरायचं हे कळतच नाही.”
आणि मग ती हात उंचावते आणि म्हणते, ” अरे, त्यात काय अवघड !!! खुशाल झेप घे ना. “
आपला तिच्यावर पूर्ण विश्वास. परमेश्वरावर असावा तेवढाच. सहाजिकच आपण खुशाल तिच्या बाहुत झोकून देतो. पण आपण असे स्वतःला तिच्या बाहुत झोकून देतो तेव्हा काय होत.


कृष्ण मुरारी होईन मी

तू प्रीतबावरी मीरा हो

महादेवाच्या माथ्यावरची

गंगेची तू धारा हो………

कृष्ण सावळा होईन मी

तू अल्लड अवखळ राधा हो

मिठीत शिरता सांज सकाळी

फुलता फुलता मुग्धा हो………

चक्रपाणी होईन मी तू

गीतेमधली वाणी हो

पहाटलेल्या स्वप्नामधली

तू एकटी राणी हो………

मीरा हो तू, राधा हो तू

हो गीतेची वाणी

तुझ्याचसाठी भोगीन मी

पुन्हा मानवी योनी………

तुझ्याचसाठी पुन्हा एकदा

जन्म येथला घेईन मी

तुझ्या दुखाच्या प्यालामधला

थेंब सुखाचा होईन मी.………


मी राधिका मी प्रेमिका
तन श्याम, मन श्याम, प्राणसखा घन:श्याम
रंगले जयाचे रंगी
मी राधिका मी प्रेमिका

अपरात्री कुंजवनी, सूर मधूर जाग मनी
कळेना, सुचेना, माझी मी उरेना, साहवेना
मीलनासी आतुरले
मी राधिका मी प्रेमिका

श्यामरंग, श्यामसंग, मीलनात चित्तदंग
सुखाच्या क्षणी ही, मोहुनी वाजे ही मनवीणा
मंत्रमुग्ध मोहरले
मी राधिका मी प्रेमिका

येई भान तृप्त गात्र, गोकुळी पहाट मात्र
कुणा हे सांगू मी, कसे हे सांगू मी उमजेना
श्यामक्षण जगले
मी राधिका मी प्रेमिका

मनाच्या तळ्यावरती
आठवांचे पक्षी आले
तुझ्या जुन्या पाऊल खुणा
त्यात माझे ठसे ओले
तळहाती तुझ्या-माझ्या
सारख्याच रेषा रेषा
दोन सावल्यांची जणू
एक बोली एक भाषा
आभाळाची ओढ लागे
उडे मनाचे पाखरू
पुन्हा पुन्हा जन्मते मी
एकाच ह्या जन्मी जणू....

Wednesday, March 14, 2012



जशी एक बाहुली
हसणारी सावली
स्वप्नातली स्वप्न सुंदरी
आकाशातली परी

क्षण भर दिसावी
हसतच रहावी
हसणारी ती परी
कधी ना रुसावी

चालते अशी
जशी पावसात हवा सुटावी
गारगार वाऱ्यात
ती अचानक दिसावी

ती अशी देखणी
जसं समुद्राच पाणी
चंद्राची जशी चांदणी
तशी माझी राणी


मी तर मी नाहीच
मनातले रुप माझे
कधी कधी तू स्मरताना
ओली पापणी करतोस का
नभाचे पाऊल वाकडे
कधी अंगणी पडते का

उद्याचे स्वप्न बापुडे
कधी आपले म्हणतोस का
गीत माझे स्मरताना
भास जवळी घेतोस का


मी तर मी नाहीच
तूला कधी मी दिसते का
गतकाळाच्या जिर्ण सावल्यां
कधी कुशीत तू भरतोस का

पाऊस वेडा सांगुन जातो
सरीसरीतुन भिजताना
तूला असेच होते कारे
पावसाचे मन जळताना

चिंब झाले मी राधा
नभी सावळा दिसला रे
तूझ्या सावलीचे भास सारे
तू ढगातून हसला ना


कृष्ण-राधिकेच्या निश्चल प्रेमा बद्दल,एकमेकांच्या अतूट स्नेहा बद्दल
,कृष्ण भार्या रुख्मिनि च्या मनात सदैव एक सल असे.राधिकेचा कधी
द्वेष नाही केला रुख्मिनिच्या मनाने,पण स्त्री सुलभ . मत्सर असवा
आपण कृष्णा वर राधिके इतकेच किवा जास्तच प्रेम करतो,कृष्णाचे सुद्धा
प्रेम आपल्यावर आहे,पण हृदयात राधिके साठी खोलवर रुजलेले भाव का?
असा प्रश्न ती सतत कृष्णास करत असे,त्याच प्रश्नाचे उत्तर एकदा मुरलीधरा ने
एका प्रसंगातून दिले.

हे श्री कृष्णा,जगता च्या पालनहारा
उत्तर हवे मजला,विचारी रुख्मिनि
राधिकेशी इतका स्नेह का असावा
मोह माझा करावा,मी तुझी अर्धांगीनी
मनात मी,हृदयात राधिका दिसली
का असा दुरावा,मी तुझी धारिणी
मिश्किल हसे कृष्ण,काही ना वदला
पाहून रुख्मिनि कडे कापिली तर्जनि
रक्त गळे थेब थेंब ,साचले अश्रू चक्षुत
गोंधळली भार्या अचानक हे पाहुनि
दिलासा देई मग स्वामिला आपल्या
बांधण्या साठी वस्त्र आणते शोधूनी
नुसत्या एकूण कृष्णा च्या वेदना
राधिका रे कळवळली,आली धोऊनि
क्षणाचा विलब नको,फाडले तिचे उंची वस्त्र
निश्वास घेतला तिने,जख्मेवर बांधुनी
निशब्द पाही भार्या कृष्ण-राधिकेच्या स्नेहाला
अंतरमनाचे भाव उमजले,काही ना सांगूनी
समाधान झाले होते आता तिच्या मनाला
समजले दुखात कृष्णाची फक्त राधिका-तारिणी.


प्रेम सागरात् भीजलेत् सगळे
तरी म्हणती प्रेमास अंधळे
पाउल ठेवा जपूनी जरा तुम्ही
उघडे असुदेत सतत ते डोळे

प्रेमात स्वतः ला विसरून जाणे
फक्त दुसर्‍या साठी मग जिणे
जेव्हा ओथम्बुन वाहते घागर
एक मेकांचे नंतर मोजति उणे

कोणावर प्रेम करण्या पूरवी
आधी स्वतः वर प्रेम करावे
ह्याच सुंदर गुलाब पुष्पानी
दुसरे हृदय सुद्धा भरावे

प्रेमाचे गीत हे असे असावे
दोन्ही नयनी सारखे दिसावे
प्रेमाचे रांग कितीही उधळले
तरीही ते ओंजळीत उरावे

प्रेम हे एकमेकांना अर्पण
प्रेमाचे दुसरे नाव समर्पण
नुसते पाहून मनी ओळखावे
प्रेमाचा पारदर्शक हा दर्पण

कधी प्रेम उमलते बहरते
कधी अगणित प्रतीशा पहाते
दोघाच्या वाटा मिळाल्या ठीक
नाही तर ते हृदयात रहाते.


आयुषाच्या प्रत्येक पायरीवर तुझ्या सोबतीने
उभा केलाय हा विश्वासाचा रेशमी डोलारा

कधी भावनांचा उन्माद ,कधी शांत दीप ज्योती
कधी गुंफलेले सुवासिक विचार , कधी वावटळ गारा

कधी एक एक गळणारे मनातले हिरवे पिवळे पान
कधी मनाच्या हिरव्याकंच गालीच्यावर पाउस धारा

नागमोडी वळनावरचा प्रवास हा वेगळा सारा
तुझ्या छोट्याश्या स्पर्शाने फुलतो हा स्नेहबंध फुलोरा


बंद खोलीत सुद्धा
सुगंध येतोच त्याचा
माती आणि थेंबाच्या
मधुर मिलनाचा
जसे किती वर्ष उलटले
कवेत घेऊन
घट्ट मिठी मारुन
झळ झळ वाहात जातो
तो वेडा प्रेमी पाउस

हिरव्याकंच पानांच्या झालरीवर
लाल टपोरया फुलांच्या परागी
फांद्याच्या रस्त्यावरुन
काटयांच्या वस्त्यांमधून
झर झर धावणारा
हळूवार ओघळनारा स्पर्श
हृदयाच्या मुळाशी वसनारा
नवजीवन पल्लवितो
तो वेडा प्रेमी पाउस

खिडकीच्या काचेवरुन
नदी सारखी वाट काढत
ओघळनार्‍या धारा
नागमोडी आयुषाची
धूळ साफ करत
बंद पुस्तकातल्या
हज़ारो स्मृति उधळत
एक थेंब हळूच
हातावर सोडून
धो धो वाहणार्‍या पावसास मिळतात
दर वेळी नवीन
आठवण घेऊन जातो
तो वेडा प्रेमी पाउस………


वेडी मी राधा प्रीत त्या कृष्णाची

वेडी मी राधा प्रीत त्या कृष्णाची
संगे माझी सारा गोपिकांचा मेळा

कृष्ण वाजवी पावा वेडा करतो मला
बोलुनी मला यमुना किनारी हा दंग मित्रान मधी

असाच तो मला त्रास देतो
म्हणुनी दूर जाणार आज रुसुनी

तरी माझा जीव त्याची जवळी
नाही वेगळी त्य पासुनी

कशी दिसणार मी वेगळी
आहे दोघांची एकच सजीव मूर्ती

वेडी मी राधा प्रीत त्या कृष्णाची
संगे माझी सारा गोपिकांचा मेळा

Logged

Tuesday, March 13, 2012



एक कवडसा स्नेहाचा
तुझ्या नाझ्या नात्याचा
एक कवडसा धीराचा
अंतर्मनातील हाकेचा

एक कवडसा मैत्रीचा
तुझ्या माझ्या निरागसतेचा
एक कवडसा विश्वासाचा
सर्व वचणे पाळण्याचा

एक कवडसा भावनेचा
तुझ्या माझ्या रेशीमगाठीचा
एक कवडसा मदतीचा
न बोलावता येण्याचा

एक कवडसा विचाराचा
तुझ्या माझ्या समजुतदारपणाचा
एक कवडसा चांदण्याचा
मनी प्रीत फुलण्याचा

एक कवडसा स्वप्नांचा
तुझ्या माझ्या भविष्याचा
एक कवडसा अभिलाषेचा
विरहात पूर्ण जळण्याचा


बिंबणं तुझं माझ्यावर
माझ्यामधल्या मनावर
माझं मन भटकताना
तुझ्यातल्या त्या
आठवणींवर ...

जाणीव तुझी माझ्यावर
माझ्यामधल्या भवनावर
माझा मीच भरकटताना
तुझ्यातल्या त्या आशेवर
कोंदण तुझं माझ्यावर
माझा क्ष्वास येता जाता
तुझ्यातल्या त्या
हास्यावर ...

शब्द तुझा माझ्यावर
माझ्यामधल्या विश्वासावर
विश्व माझं तुझ्यासाठी
तुझ्या एका शब्दावर ...


आठवते नजर पहिली?
भाषा तिची न कळली
कसे व्यक्त व्हावे आपण
माझी जीभ न वळली

अवसेच्या राती त्या
जणु चांदणे पाहिले
खोल डोळ्यात तुझ्या
गुपित काय दडविले

नांव मनी कोरण्या
शब्द शब्द जुळविले
बांधली प्रीत पुजा
मी प्रेम फूल अर्पिले

गाली खट्याळ हास्य
मन अधीर हरवले
अधरावरील दवाने
चिंब मजसि भिजवले

प्रीत मेघ अनंत
लोचनांत विसावले
अस्तित्वाने तयाच्या
सखया मी भारावले

आता नको दुरावा
नको क्षण विरहाचे
रंग नभी रंगवू
अपुल्याच स्वप्नांचे

Monday, March 12, 2012

मला आवडत ........
ते तुझ दिसंण , ते तुझ हसण ..
सर्वांमधे सामाहुनी एकटच असण .

समजावून सांगन आणि समजुन घेण
सर्व काही समजुन ..उमजुन न घेण..

थोडस चिडण, थोडस रडण..
अन पुन्हा शहाण्यासारख हसण..

डोळ्यांचा बोलावा अन गालावरच्या खळीच खुलण
जसा बंध फुलांचा हळूवार उमलण

प्रेम व्यक्त करताना ..अव्यक्त होण..
जस लाजाळूच्या झाडाच ..अलगद मिटून घेण ...

मला आवडत ........
ते तुझ दिसंण , ते तुझ हसण..
सर्वांमधे सामाहुनी एकटच असण .


अशी आहेस तू...................
ती मला आवडते...
तिच्या प्रत्येक हरकतीला टिपतो मी...
तिलाही मी जवळचा वाटावा म्हणून झुरणारा मी.....
तिचा अबोला अन माझ्या हृदयाचा ठोका चुकावा...
ती हसली अन त्या हास्यात मी रमणारा..
आणि... ती आज समोर का नसेना... ती अन तीच माझ्या अंतरी उरते.
तुझ्या हसण्यात होती..
चंद्र तार्यांची सुंदर आरास...
 तू रुसलीस कि...
व्हायची अमावसेची रात..


काल मी साबणाच्या पाण्याला...
 फुगे होऊन उडताना पहिले..
त्या प्रत्येक निर्जीव फुग्याला.. 
सप्तरंगात नटलेला पाहिले...




तुझ्या बद्दल लिहायचे ठरवले ..
 कि माझे शब्द पुढे पुढे सरावतात..
 मी आधी मी आधी म्हणत...
मग स्वतःच शहाण्या सारखे वागतात
राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपी जन!
मन मेरा बन गया सखी री सुँदर वृँदावन
कान्हा की नन्ही ऊँगली पर नाचे गोवर्धन
राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपी जन!
मन मेरा बन गया सखी री सुँदर वृँदावन।

श्याम सांवरे, राधा गोरी, जैसे बादल बिजली!
जोड़ी जुगल लिए गोपी दल, कुञ्ज गलिन से निकली,
खड़े कदम्ब की छांह, बांह में बांह भरे मोहन!
राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपी जन !

वही द्वारिकाधीश सखी री, वही नन्द के नंदन!
एक हाथ में मुरली सोहे, दूजे चक्र सुदर्शन!
कान्हा की नन्ही ऊँगली पर नाचे गोवर्धन!
राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपी जन

जमुना जल में लहरें नाचें , लहरों पर शशि छाया!
मुरली पर अंगुलियाँ नाचें , उँगलियों पर माया!
नाचें गैय्याँ , छम छम छैँय्याँ , नाच रहा मधुबन!
राधा नाचे कृष्ण नाचे , नाचे गोपी जन!
मन मेरा बन गया सखी री सुँदर वृँदावन.
तुझ्या बद्दल सांगु काय मी
शब्दांना गुंतवु कसा मी
रात्रीच्या आठवणी नंतर
सकाळच्या सोनेरी उन्हामध्ये
उमलते एखादे फुल.
टपोर्‍या डोळ्यावरील पुसत दव बिंदू
हास्य रंगाचे चेहर्‍यावर घेऊन
सुगंधाची करत बरसात
उमलते एखादे फुल.
नाजुक पाकळी ओठांची
किंचित विलग
आश्वासक शब्दांचा दिलासा देत
तुझ्या बद्दल सांगु काय मी
शब्दांना गुंतवु कसा मी
फुले पाकळी मन मोहणारी
कोमजली आहे या वसंतात
या जन्माची उजाड़ बाग़
जन्मी पुढच्या फुलवू आपण !!!

आठवून भेट प्रथम आपली
आजुनही होते हृदयात कम्पन
सात पावले या जन्मातली
जन्मी पुढच्या चालू आपण !!!

रंग गुलाल उधळले सारे
रंग विहीन जीवन झाले
या जन्मी न रंग्लो जरी
जन्मी पुढच्या रंगु आपण !!!


या जन्मातले राजा राणी
जन्मी पुढच्या होऊ आपण !!!


नाहीतरी कुठे जगतोए एकटे
जन्मी पुढच्या जगु आपण !!
तुझ्या मैत्रीचे क्षण
पुन्हा हवेहवेसे वाटू लागतात
आज मन माझं लख्ख आकाश
त्यात तुझ्या आठवांचे ढग दाटू लागतात

तुझ्या मैत्रीची गर्द सावली
अशी आयुष्यावर दाटली होती
आयुष्यातली उन्हं माझ्या
तुझ्याचमुळे आटली होती

तुझ्या मैत्रीच्या आठवणी
मी आजही जपून ठेवतो
आनंदाचे ते क्षण हरवू नयेत म्हणून
काळजाच्या तिजोरीत लपून ठेवतो

मैत्रीचं नातं तुझ्या
माझ्याशी आजन्म असच राहील
तुला ठेच लागली कधी
तर पापणी माझी वाहील

मन माझे वेडे
पुन्हा एकदा त्या क्षणांचा शोध घेतात
अन शब्द माझे कवितेतून
तुझ्या मैत्रीचा वेध घेतात
आथांग, विशाल असं काहीतरी असतं

वेगलं काही नसून ते अपलं मन असतं;

अस्थिर, चंचल असं काहीतरी असतं,

खरंच ते आपलं वेडं मनंच असतं



काही क्षण फारंच सुंदर असतात,

ते मनाच्या गाभार्यात साठवायचे असतात,

काही गोष्टी कोणाला सांगायच्या नसतात,

त्या फक्त आपल्या मनाशी बोलायच्या असतात,



जगण्यासाठी प्राणवायु मानसास लागतो,

सोबत एक चांगलं मनसुद्धा लागतं,

जगण्यासाठी मनासंसुद्धा एक छानसं स्वप्नं लागतं,

तुटलं जर ते, तर बिचार्‍या मनालाही लागतं



क्षणात हसवणारं,क्षणात रडवणारं हे मनंच असतं,

रहस्यमयी,फसव्या गोष्टींन्चं ते गोदामंच असतं,





जर हे मन कायम रिकामंच राहिलं असतं

तर वाटतं किती बरं झालं असतं,किती बरं झालं असतं....
एक पाखरू मनातलं,


खूप दिवसापासून जपलेलं,

आताशा कुठे भिरभिरू लागलेलं,



एक पाखरू मनातलं,

कधी खूप आनंदून जाणारं,

तर कधी लगेच खट्टू होणारं,



एक पाखरू मनातलं,

खूप खूप अगदी जीवापाड प्रेम करणाऱ,

अन तेवढ्याच रागाने लाल-लाल होणारं,



एक पाखरू मनातलं,

पावसात ओलं-चिंब होऊन नाचणारं,

रणरणत्या उन्हात खूप कष्ट करणारं,



एक पाखरू मनातलं,

मोठ्या कारणावरून मुसमुसून रडणार,

आणि छोट्या आनंदासाठी लढणार,



एक पाखरू मनातलं,

कायम स्वप्नात रमणार,

वास्तवाशी बिनघोरपणे झगडणार,



एक पाखरू मनातलं,

मायेच्या कुशीत अलगद शिरणार,

मोठ होऊन समजुतदारपणे थोपटणार,



एक पाखरू मनातलं,

आवडतं गाण हळुवार गुनगुनणार,

स्वतःच अस्तित्व ताकदीने शोधणार ,



एक पाखरू मनातलं,

आपल्या माणसाच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल,

तितक्याच तन्मयतेने वेगळी वाट नव्याने हुडकणार,



एक पाखरू मनातलं,

वाईट अनुभवांना भेदरणार,

अन दिलखुलासपणे हसत सर्वांगाने स्वीकारणार,



एक पाखरू मनातलं,

खूप घाबरून भुरकन उडणार,

पण "वेड" होऊन आकाशाकडे झेपावणार,



एक पाखरू मनातलं,
न मागताच तू खूप काही दिलेस ..........

पहाटेच्या गुलाबी थंडीत आठवणींची ऊबदार रजई दिलीस
चांदण्यांच्या शीतल प्रकाशात उजळणारी स्वप्नांची रात्र दिलीस

एका क्षणातच जणू आयुष्य जगण्याचा हर्ष दिलास
दुःखी निराश मनाला मायेचा हळूवार स्पर्श दिलास

आकांक्षांचे ढासळलेले मनोरे पुन्हा एकदा उभे केलेस
हरवलेले सूर छेडूनी अंतरी प्रीतीचे गीत फुलविलेस

आयुष्यात ज्याची कमी होती ते सारे काही पदरात टाकलेस
एका कोमेजलेल्या कळीला जणू पुन्हा नवजीवन दिलेस

काही उरलेच नाही आता मागण्यासारखे ...

खरंच ... न मागताच तू खूप काही दिलेस !!!
एखाद्याच्या येण्याने असं काही बदलून जातं .......

की सर्व जग त्याला सुंदर दिसू लागतं.
फुलांचा सुवास त्याला प्रफुल्लित करून टाकतो,
पक्ष्यांची किलबिल जणू त्याला मधुर गाणं वाटू लागतं...
जगणे हे तर आत्ताच सुरु झाले आहे याचा आनंद मिळू लागतो.
एखाद्याच्या येण्याने असं काही बदलून जातं .......

कामातील नीरसपणा जाऊन त्यात उत्साह येऊ लागतो,
काम काम न राहता तो एक खेळ आहे असे वाटू लागतं .
रात्रीच्या वेळी आकाश पाहताना एक वेगळीचं मजा येऊ लागते,
झोपल्यावर स्वप्नांच्या दुनियेत जगण्याची एक वेगळीच किमया वाटू लागते.

हे सर्व असचं घडत राहत
कारण

एखाद्याच्या येण्याने असं काही बदलून जातं .......
एक कविता तुझ्यासाठी.....


तू दिलेल्या मैत्रीसाठी आणि मैत्रीतल्या त्या अनामिक प्रेमासाठी...!

एक कविता तुझ्यासाठी...

तुझ्या माझ्यापाशी व्यक्त झालेल्या त्या प्रत्येक अश्रुसाठी आणि खळाळून वहाणार्या तुझ्या हास्यासाठीही....!

एक कविता तुझ्यासाठी...

तुझ्यातल्या प्रौढपणासाठी आणि त्यात डोकावणार्या तुझ्या निरागस बालपणासाठी....!

एक कविता तुझ्यासाठी....

फक्त तुझ्याचसाठी..
तुझ्या नयनांच्या अग्नीमध्ये सजनी


मला प्रेमयद्य करावेसे वाटते

तुझ्या गोड हास्याच्या लहरींसंगे

मला वाहुन जावेसे वाटते....

तुझ्या मनाच्या कोण्यात हरवलेल्या

जाणीवांना पुन्हा जागवावेसे वाटते....



नको तु रुसुन बसु अशी सजनी

मनाच्या त्या काटेरी कुंपणाशी

तोडुन टाक आज बंधने सगळी

मिळुन जा नदी बनुन सागराशी

तुझ्या दगडधोंड्यांच्या मार्गामधले

सगळे अडथळे हटवुन द्यावेसे वाटते...



तुजविन अधुरा आहे खेळ सावल्यांचा

तुझ्या विरहाचे दु:ख उन्हापरी चटके

मोत्यांचे ते चमकणे खेळ शिंपल्यांचा

कोहिनुर मन माझे तुझ्यासाठी भटके

ना सावली ना शिंपले तुच माझे आपले

तुला पुन्हा आपलेसे करावेसे वाटते
का बरं मला तुझी आठवण यावी...?

जीवाची अशी घालमेल व्हावी....?

सारं काही जवळ असुनही,

दूर असल्याची जाणीव व्हावी.....?

आठवताहेत ते क्षण,

जांच्यावर जगतेय अजुनपण,

सतत तुला माझ्याकडे आणि माला तुझ्याकडे,

खेचणारे असे हे क्षण

आठवतेय तो सारा पसारा,

जो, पसरलाय सैरावैरा,

त्यातूनच तुझा तो इशारा,

तेव्हा अंगावर आलेला शहारा.....!

एवढे सर्व असुनही,

का बरं मला तुझी आठवण यावी...?

जीवाची अशी घालमेल व्हावी..........!

आठवतेय  माझं चिडणं - रागावणं,

मग स्वत:च बोलणं,

नाहीतर दोन - चार दिवस थांबून,

 तु  बोलतेय का हे बघणं......!

वाटतं ही वेळ अशी,

चुटकित सरून जावी,

आणि शेवटी कायमची,

आपली गाठभेट व्हावी......

Thursday, March 8, 2012

सगळ्यांपेक्षा वेगळी तु नक्किच आहेस
. .
पाण्यापेक्षाही खळखळूण तुझ हसण आहे
..
फुलापेक्षाही नाजुक तुझ बोलण आहे
..
स्वपनांपेक्षा सुदंर तुझ दिसण आहे..पण त्यापेक्षाही सुदंर तुझ माझ्या आयुष्यात असणं आहे…….
काचेहुन ही निर्मळ तुझ मन आहे
..
बाणां पेक्षा ही धारदार तुझे नयन आहेत… मधा पेक्षा ही मधाळ तुझी वाणी आहे… पण त्यापेक्षाही सुदंर तुझ माझ्या आयुष्यात असणं आहे….

डोळ्यातली नशा तुझ्या काय सांगू ग मी तुला,
काही केल तरीहि विसरता विसरत नाही...
भुरळ पडून जातेस ग तू मनाला,
आणि सांज का हि होत नाही....


डोळ्यातली नशा तुझ्या काय सांगू ग मी तुला,
काही केल तरीही विसरता विसरत नाही...
डोळे मिटले असो किव्हा असो उघडे,
तूच दिसतेस ग समोर,
आणि दुसर कोणीच दिसत नाही....


डोळ्यातली नशा तुझ्या काय सांगू ग मी तुला,
काही केल तरीही विसरता विसरत नाही...
देवाला हि भुरळ पडून आलीस तू,
मी तर फक्त एक कवी आहे,
याच मातीने घडवलं त्याने ग मला...


पण,
नक्की विचारेन जाऊन मी त्या देवाला,
कोणत्या मातीने बनवला त्याने ग तुला?.....
कोणत्या मातीने बनवला त्याने ग तुला?

किती गोड आहे आपले हे प्रेम...............
किती सुंदर आहे आपले हे नाते.............
एकमेकांच्या प्रेमात चिंब बुडालेले असणे..........
एकमेकांच्या आठवणीत एकटेच हसणे ...........

... नजर न लागो कोणाची आपल्या या नात्याला .........
उभी रहा अशी दृष्ट काढतो नजर न लागो आपल्या प्रेमाला......
दूर झालो एकमेकांपासून तर एकटे जगू शकणार नाही.....
दूर झालो एकमेकांपासून तर स्वताला सांभाळू शकणार नाही ..........

सवय झालीय तुज्या मोहक हास्याची............
सवय झालीय तुज्या लाडिक बोलण्याची..............
सवय झाली आहे तुज्या स्वप्नांची......
सवय झाली आहे आयुष्य तुज्याबरोबर पाहण्याची....
ठेव विश्वास माज्यावर
असे कधी म्हाणु नकोस
मित्र आहें मी तुजा
हे कधी विसरु नकोस ||१||

नाते आपले हे प्रेमाचे
अखंड चालू राहू दे
समजून घेतलेस तू मला
मैत्री अशीच वाहू दे||२||

ना मंजूर जर असेल लोकाला
मैत्री आपली सत्याची
जीवन मरण देवाच्या हातात
शरीर मातीच्या मित्याची ||३||

मित्र म्हणजे
जीवलग, सखा कोणीही समज
दोस्ती आपली पक्की ठेव
तू आता हे लवकर उमज||४||


मी एक तारयासारखा होण्याचा प्रयत्न करतोय
ज्याला स्वताचा प्रकाश खटतो
पण तरीही कोण जाने का म्हणुन
स्वताहावर पड्नारा प्रकाश टाकून द्यावासा वाटतो

आज पावुस येणार म्हणुन
नेहमी मनाला गारवा वाटतो
इन्द्रधनुष्य आज दिसणार या आशेने
मनाला सावरू की नको हा ध्यास गाटतो

आता फुलपाखरे येतील
माजं रान हिरवे गार करायला हवे
फक्त फुलपाखरे नकोत तर
मला पक्शांचे हवेत थवे

एका तारयाला या सर्वं गोष्टी व्यर्थ आहेत
पण मी तुमच्यातलाच एक तारा आहें


निसर्गाच्या सानिध्यात
निसर्ग आपला सोबती
मी तिचा होतो
आणि ती माझी होती

जिथे जिथे जात होतो
तिथे तिथे येत होती
कधी पुढे येत होती
कधी मागे राहत होती

मी करायच्या आधी
तीच करून टाकत होती
बोलत नव्हती ,हसत नव्हती
फक्त माझ्या बरोबर येत होती

मी तर तिचा होतो
आणि ती माझी होती
तों तर मी होतो आणि
ती माझी कवी कल्पना होती