NiKi

NiKi

Monday, April 1, 2013



कुणीतरी लागत, आपल्याला वेडं म्हणणारं,

वेड म्हणताना, आपल्यातल शहाणपण जाणणारं,

कुणीतरी लागतं आपल्याला साथ देणारं,

पडत असताना अलगद तोल सावरणारं,

कुणीतरी लागतं आपलेपण जाणणार,

सुखं दु:खाच्या क्षणांना ह्रदयात साठवणारं,

कुणीतरी लागतं नातं जपणारं,

नात्यातील अश्रुंची किंमत जाणणारं,

कुणीतरी लागतं आपल्याला आपलं म्हणणारं,

दूर राहूणही आपलेपणं जपणारं..

No comments:

Post a Comment