प्रेम म्हणजे जीवन असतं!
प्रेम म्हणजे जीवन असतं
अन जीवनातलं;
गुंतागुंतीच एक वळण असतं!
कधी असतं ते बेधुंद
तर कधी असतं ते स्तब्ध!
कधी असतं ते खळाळनाऱ्या
धबधब्यासारखं!
तर कधी असतं ते तरंगणाऱ्या
बुडबुड्यासारखं!क्षणात विरघळणारं!
क्षणात तरंगणारं!
प्रेम म्हणजे जीवन असतं
अन जीवनातलं;
गुंतागुंतीच एक वळण असतं!

No comments:
Post a Comment