मला तिची आणि तिला माझी कमी का जाणवावी
चंद्राविना चांदणी का सुनी असावी
चंद्राच्या तेजाचा धनी तर सुर्य असावा
मग चंद्र आणि चांदनित एवढा जिव्हाळा का असावा
चंद्र आणि चांदणी यांच्यात स्वताचे असे काहीच नसते
पण दोघांचे तेज अलौकिक असते
रात्री का होईना त्यांना एकमेकांची मौलिक साथ तर असते
तुझ्या माझ्या प्रेमात सुद्धा असेच काहीसे असते
स्वताचे असे काहीच नसते तरीही मन आपसात गुंतत असते
कमी तुझी जाणवत असते
प्रत्येक क्षणात तू आठवत असते
तुझे प्रेम म्हणजे एक जिव्हाळा
एक हवाहवासा विसावा
अशा स्वप्नागत गावामध्ये आपले प्रेमळ घर असावे
तू आणि मी फक्त बाकी कोणीच नसावे
बाकी कोणीच नसावे
No comments:
Post a Comment