कान्हा आज मल्हाराची छेडु नको तान रे
वेडावली राधा, मन झाले बेभान रे
श्रावण सरीवर, शहारते बासरी
सुरातुन राधे तुला, भुलवतो श्रीहरी
ओल्याचींब तनावरमोहरले प्रेम सुर
मेघावर सातसूर ईंद्रधनू छान रे
वेडावली राधा, मन झाले बेभान रे
काजळल्या रुतुमधे, कान्हा तुझा भास रे
जागवली बासरीने, मिलनाची आस रे
नभातुन गीत पुन्हा
राधा कान्हा राधा कान्हा
राधा देह बासरीचा, सुर-तुझा, प्राण रे..
वेडावली राधा, मन झाले बेभान रे
No comments:
Post a Comment