चांदण्याची मिठी
सखे तुझे कर
मोगर्याचे सर
चांदण्याची मिठी
नको करू दूर
सखे तुझा श्वास
बकूळीचा वास
हवाहवासा वाटतो
तुझा हा सहवास
भावना ओलावल्या
गोफ गुलाबी विणला
नको सोडवू त्याला
उलगडून धाग्याला
स्वप्न मी पहिले
तुझ्या माझ्या डोळ्यातले
विश्व त्यात साकारले
तुह्या माझ्या जीवनाचे
कुमुदिनी काळीकर
सखे तुझे कर
मोगर्याचे सर
चांदण्याची मिठी
नको करू दूर
सखे तुझा श्वास
बकूळीचा वास
हवाहवासा वाटतो
तुझा हा सहवास
भावना ओलावल्या
गोफ गुलाबी विणला
नको सोडवू त्याला
उलगडून धाग्याला
स्वप्न मी पहिले
तुझ्या माझ्या डोळ्यातले
विश्व त्यात साकारले
तुह्या माझ्या जीवनाचे
कुमुदिनी काळीकर
No comments:
Post a Comment