तुझी आठवण येते
जेव्हा …
पहाट वेळी क्षितिजावर
तो सोनेरी सम्राट
रंगांची उधळण करतो
धुक्याची दुलई ओढून
पहुडलेल्या झाडाच्या फांदीवर
कोकिळ पंचम लावतो
गच्च दाटलेल्या आभाळातून
तहानलेल्या धरेवर
तो मुक्त बरसतो
हिरवा शेला नेसून
सजलेल्या डोगर द-यात
निर्झर खळाळत वाहतो
वसंत बहरात लतिका
आपल ऐश्वर्य मिरवताना
फुलांची रंगावली घालतात
निरव चांदण वेळी
नभांगणात येवून तो
प्रेम राग आळवतो
…सखे तुझी आठवण येते
पण खर सांगू,
तुझी आठवण येते …
… जेव्हा मी श्वास घेतो
जेव्हा …
पहाट वेळी क्षितिजावर
तो सोनेरी सम्राट
रंगांची उधळण करतो
धुक्याची दुलई ओढून
पहुडलेल्या झाडाच्या फांदीवर
कोकिळ पंचम लावतो
गच्च दाटलेल्या आभाळातून
तहानलेल्या धरेवर
तो मुक्त बरसतो
हिरवा शेला नेसून
सजलेल्या डोगर द-यात
निर्झर खळाळत वाहतो
वसंत बहरात लतिका
आपल ऐश्वर्य मिरवताना
फुलांची रंगावली घालतात
निरव चांदण वेळी
नभांगणात येवून तो
प्रेम राग आळवतो
…सखे तुझी आठवण येते
पण खर सांगू,
तुझी आठवण येते …
… जेव्हा मी श्वास घेतो
No comments:
Post a Comment