NiKi

NiKi

Monday, April 1, 2013



एक आस एक विसावा
तुझा चेहरा रोज दिसावा,
ज्या क्षणी तू माझा होशील
तोच क्षण आपुला असावा
एक शब्द एक कविता
तुझी प्रेरणा घेऊन लिहिता
मिटून जावा क्षणात एका
तुझ्या माझ्या तील दुरावा
एक नाते एक धागा
जुळून येणार्या बंधाला
साथ राहूदे शतजन्माची
तुझ्या मनाची माझ्या मनाला
एक आठवण एकच साठा
तुझ्या माझ्या प्रीतीच्या गाथा,
एकच हाक, एकच साद,
हास्य तुझे, मज सौख्याचा भाग,
एकच अश्रू डोळ्यात तुझ्या अन,
माझ्या नयनी रात्रीची जाग ...

No comments:

Post a Comment