तुला बघून मलाही प्रेम करावेसे वाटते
नेहमीच चेहऱ्यावर तुझ्या स्मित हास्य असते
तुला बघून मलाही हसावेसे वाटते
तुला बघून मलाही प्रेम करावेसे वाटते
दुसऱ्याशी बोलताना नकळत माझ्याशी बोलते
तुझ्या त्या बोलण्यामधून नेहमीच भुरळ पाडते
तुला बघून मलाही प्रेम करावेसे वाटते
तुझ्याशी बोलणे मलाही आवडते
असे असूनही मला ते टाळावे लागते
तुला बघून मलाही प्रेम करावेसे वाटते
नाही आवडत दुसऱ्याने तुझ्याशी प्रेमाने बोलणे
तुझ्याजवळ येउन नको ते इशारे करणे
कारण
तुला बघून मलाही प्रेम करावेसे वाटते
No comments:
Post a Comment