तुझ्यासवे उन्हातही
सावली मी अनुभवतो
तुझ्यासवे अंधार रात्री
चांदण्यात फिरतो
तुझ्यासवे फिरतांना
स्वतःसही विसरतो
तुझ्यासवे जगतांना
बेधुंद मी जगतो
तुझ्यासवे ग्रीष्मातही
पावसात भिजतो
तुझ्यासवे मोकळ्या नभी
इंद्रधनू पाहतो
तुझ्याविना चांदण्यातही
मनी अंधार दाटतो
तुझ्याविना सावलीकडे
पाहण्यास घाबरतो
तुझ्याविना श्वासही
थांबून जातो
तुझ्याविना जगणेही
विसरून जातो
तुझ्याविना मनास
काळोख घेरतो
तुझ्याविना हृदयास
जळतांना पाहतो
तुझ्यासवे काळजात
प्रेमाला भेटतो
तुझ्याविना मनाला
सरणावर पाहतो .
No comments:
Post a Comment