NiKi

Wednesday, April 24, 2013
आठवण तुझी आली की
मी डोळे अलगद मिटतो
येते मग तू अश्रू बनुनी गालांना माझ्या स्पर्शते
कारण तू आता आठवण भेटतेस ...
मी होतो गप्प तेव्हा
माझा श्वास हि थांबून जातो
मग तेव्हा देहातून हुंदके देऊन मी रडतो
मग जर मोकळे वाटतं
कारण तू आठवण बनूनच राहिलीस
हसत खेळत सोबत बसलेलो ते क्षण
आता कागावरून हि पुसू लागलेत
कारण ती प्रेमाची शाई आज
मला अनंतात नेऊ लागली
तरी हि मी शेवट बघतो आहे देह सोडण्याची
पण तुझी आठवण हि माझ्या रस्त्यात येउन थांबली ....
आज तुझी आठवण आली की म्हटले
खरच डोळे मिटून घ्यावं
तू निघून जाण्या आधीच मग
श्वासांनी देह सोडून द्यावा ....
शेवट हि माझा मग तुझ्या आठवणीतच होऊन जावा ....
शेवट हि माझा मग तुझ्या आठवणीतच होऊन जावा ...!!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment