NiKi

NiKi

Monday, April 22, 2013



तुझ्याच आठवणींनी कां

डोळ्यात अश्रू तरळतात

माझ्या वेदनेतही मला

कसे सोडून जातात

कळत नाही माझ्याशी

ते कां असे वागतात

तुझी आठवण येताच

पापण्यात कोठून येतात

हे प्रेमच आहे प्रिये

माझ्या मनाला ते सांगतात

म्हणून फक्त तुझ्यासाठी

माझी रात्र ते जागवतात .

No comments:

Post a Comment