सप्तमीचा चंद्र आज
मेघाआड लपला आहे
तुझ्या आठवणींचे दुःख
त्यालाही सतावित आहे ।
ढगाळलेले आभाळ ही
व्याकुळ झाले आहे
पावसांच्या सरीरूपे
मुग्ध अश्रूं गाळत आहे ।
गार वारा आषाढाचा
आज स्तब्ध झाला आहे
शोधासाठी तुझ्या तो
अंतराळात गेला आहे ।
आठवण तुझी श्वासांना
नेहेमीसारखी येत आहे
आज तो थबकून थबकून
तुझा शोध घेत आहे ।
निद्राही आज माझी
जागरूक राहिली आहे
स्वप्नांत तरी तूं दिसशील
म्हणून वाट पहात आहे ।।
मेघाआड लपला आहे
तुझ्या आठवणींचे दुःख
त्यालाही सतावित आहे ।
ढगाळलेले आभाळ ही
व्याकुळ झाले आहे
पावसांच्या सरीरूपे
मुग्ध अश्रूं गाळत आहे ।
गार वारा आषाढाचा
आज स्तब्ध झाला आहे
शोधासाठी तुझ्या तो
अंतराळात गेला आहे ।
आठवण तुझी श्वासांना
नेहेमीसारखी येत आहे
आज तो थबकून थबकून
तुझा शोध घेत आहे ।
निद्राही आज माझी
जागरूक राहिली आहे
स्वप्नांत तरी तूं दिसशील
म्हणून वाट पहात आहे ।।
No comments:
Post a Comment