NiKi

NiKi

Tuesday, April 23, 2013



क्षणांचे मणी दिवसाची माळ
तुझ्या नावे जपतो आहे ।
अन् खोल खोल श्वास-निश्वास
तुझ्यासाठीच सोडतो आहे ।
एक एक तुझ्या स्मृतिचा
हार मनीं गुंफतो आहे ।
तुझ्या सहवासांत कंठलेले
क्षण गोळा करतो आहे ।
हार गुंफतो आहे तरी
स्मृतिंचा डोंगर मोठा आहे ।
जन्मभर गुंफला तरी
तो तसाच राहणार आहे ।
श्वासांत श्वास असे पर्यंत
तो तसाच गुंफणार आहे ।
अन् अखेरीस तो घेऊन
तुझ्याकडे मी येणार आहे ।।

No comments:

Post a Comment