जरी देह दुरावले
दुरावले जरी अंतर
लागे तुझा ध्यास
दूरतेत ह्या निरंतर ।
विरहाच्या दिवसांत
येई दिसोनी दुरावा
रंगलेल्या पत्रांतुनी
मिळे प्रीतिचा पुरावा ।
येई घडोनि दर्शन
प्रीतिचे तव शब्दांत
आशाभाव मीलनाचे
भासती काव्यांत ।
ओघळल्या आंसवांत
लाभे जीवा विसावा
आणि तुझ्या विरहांत
आशेचा किरण असावा ।
आतां आहे जवळीक
अंतरलो एकमेकां
मीलनाच्या कारण
घेतल्या आणा-भाका ।।
दुरावले जरी अंतर
लागे तुझा ध्यास
दूरतेत ह्या निरंतर ।
विरहाच्या दिवसांत
येई दिसोनी दुरावा
रंगलेल्या पत्रांतुनी
मिळे प्रीतिचा पुरावा ।
येई घडोनि दर्शन
प्रीतिचे तव शब्दांत
आशाभाव मीलनाचे
भासती काव्यांत ।
ओघळल्या आंसवांत
लाभे जीवा विसावा
आणि तुझ्या विरहांत
आशेचा किरण असावा ।
आतां आहे जवळीक
अंतरलो एकमेकां
मीलनाच्या कारण
घेतल्या आणा-भाका ।।
No comments:
Post a Comment