NiKi

NiKi

Friday, April 26, 2013

धुंद होते शब्द सारे भावना त्या ओथांबल्या
तुजवीण सख्या मग आज त्या पुन्हा भारावल्या

जड झाले शब्द सारे पाहुनी तुझिया नयना
पुन्हा मग फिरुनी वादळ आले या गगना

सारेच होते थांबलेले जणू स्तब्ध झाली स्पंदने
तुजीया सवे मग पाहू लागली नवी स्वप्ने

आसमंत आज सारा फुलुनी बोलू लागला
माझिया अंतरीचे मग गुज तुजला बोलला

कसे कळेना कुठे तरी मग मन हे शांततेत रमले
जणू काही तुझ्या नसण्याची वाट पाहू लागले

सवयच झाली जणू मग आता तुज्या नसण्याची
बांध घालून सुद्धा नदीने पुन्हा वाहण्याची ……………
बांध घालून सुद्धा नदीने पुन्हा वाहण्याची ……………


No comments:

Post a Comment