NiKi

NiKi

Monday, April 30, 2012



मृदु मंद गंधित कमलनयनी,
सौरभ सुखद सुहासिनी.
नवनील नीरज नीरजा,
अरविन्द पुष्ट उरोजिनी.
मुकुलित कुमुद मृणालिनी,
मम हृदय कुञ्ज निवासिनी.

मुखारविंद,कर,पद्म चरण,
कंज लोचन कंजारुणं.
प्रमुदित अरविन्द लोचना.
विहंसित स्मिता सुलोचना.
लोल ललित हे पद्मिनी,
मम हृदय कुञ्ज निवासिनी.

तव प्रेम चाह की प्रतीक्षा,
मम हृदये कुरु अमृतवर्षा.
मृदु कोमल सुमधुर भाषिणी.
मम हृदय कुंज निवास कुरु,
छविनील सुनील सरोजिनी.

सखि प्राणप्रिये हे सुन्दरी!
मम हृदय कुञ्ज निवासिनी


चांदण्याच्या शुभ्रतेला प्रीतीचा सुगंध यावा

रातराणीच्या फुलाला आरक्त प्रीत रंग यावा

माझ्यात समरसून तू हे पहावे, अनुभवावे

सांग प्रिये मीलनात आणिक तुज काय हवे



कौतुकाने मुखचंद्रमा निरखीत मी बसून रहावे

बाहुपाशांच्या कडीत, तुज अधरांना मौन करावे

कल्पनेच्या कुंचल्याने सुखस्वप्न रंगवावे

सांग प्रिये आज मीलनात आणिक तुज काय हवे



तुज भेट म्हणुनि चंद्र हवा का ?

की हवा प्रीतीचा शुक्र तारा

की तारकांचा मुकुट चंदेरी

सांग माझ्या चंद्रमा तुज काय हवे



तुज कवेत घेऊन खुलवावे

निज हातांनी झुलवावे

प्रणयाचे गीत गावे

माग ना माझ्या फुला आणिक तुज काय हवे



अजुनि उरले असेल काही

हलकेच मला तू कळवावे

प्राणप्रिये मज प्राणापरते

माग आज आणिक काय हवे


असेल जीवन रटाळ खडतर

परि सुंदर गमले तुझ्यामुळे



नैराश्याची हास्यफुले

दु:खाचे बनले सौख्यझुले

कणखर स्पर्शही कोमल बनला, 
तुझ्यामुळे

चित्रातील तू मूलाकार

तूच स्वरातील स्वर गंधार

तू शब्दातीत अगम्य रचना

काव्य ही बनले तुझ्यामुळे



तूच धारणा सकल धरेतील

सौंदर्य कल्पना मनु रचनेतील

चहु अंगानी विश्व प्रसवले, तुझ्यामुळे



सामर्थ्यची तू अणूरेणूतील

असणे ते तू अस्तित्वातील

शाश्वत जाणीव चिंतनातील

मी स्वतःस कळलो तुझ्यामुळे.

 ♥♥
प्रेम म्हणजे काय असतं ?………..

प्रेम म्हणजे असतो
एकच श्वास दोघांसाठी…..

प्रेम म्हणजे असतो
एकच विश्वास, कधीही न संपणारा…

प्रेम म्हणजे असते
एकच गाणे, दोघांनी गुणगुणायचे….

प्रेमात नसावी काही
मिळव्ण्याची भाषा……..

प्रेमात असावी एकच अभिलाषा……
न बोललेले शब्द ऎकायची…..

प्रेमात नसावे रुसवे फ़ूगवे
असावा फ़क्त आनंदी आनंद गडे……….
इकडे तिकडे चोहीकडे……..

एकदा तरी प्रेम जरुर करावे
पण ते आंधळे नसावे………..

कोणी तरी बोललेच आहे
“प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आमचं same असतं”…………..



मी स्वत:स हरपून जाते, हा भास तुझा होताना
नसलास जरी समोर तू,वाटते जणू असलेला

स्वप्नात माझ्या येउन हैराण मला का करतो
अन अवचित जाग ही येता, तू असाच भवती विरतो!

वेगाने वाहून वारा ,हे केस जेव्हा उडवतो
वाटते मनाला माझ्या, की तूच बटा खेळवतो..

झाडांची अलबेल शाखा ह पदर असा अडवते
ह्र्दय असे धड्धडते जणू तुझीच चाहुल घडते!

पावसांचे अलवार थेंब या ओठांवर ओघळती
वाटॆ तुझाच स्पर्श होई, पण तो ही भासच ठरतो!!

ताटकळत कैक वेळा , वाट तुझी मी बघते
पण तू न ये सामोरा , मन उगा हताश होते !

न कळे मजला क मी, उगाच तुझ्यावर रुसते
मग येता तू सामोरा, गालातच खुद्कन हसते!!

हा भास तुझा होताना…
काहि न बोलता जात जा
मी असाच वाट पाहिन
काहि न बोलता नूसतच पाहत राहीन
शद्बाचे अडसर आता हवेत कशाला ?
स्पर्शाची अडगळ ही नको आता
आता तू हि अशी बध मुक्त……..
वारयाच छुळकि बरोबर येणारी आणि
मी अस तृप्त सचेतन पडलो
सागराचया किनारी आभाळाच
पतिबब माझ्या डोलयात पडलय
तूझ चांदण माझया मनात दडलय
कधि तरी अशीच ये
सहज भेटून जा
तुझया प्रेमळ नि्शवासाने पापणया मिटून
तुला उमगतं ना सारं…
बघ ना मी किती वेडा आहे
तुझा दिवस भेटुनही वाटतो थोडा आहे,
माझे असे नेहमीचेच वागणे
सांग ना मी खरचं वेडा आहे?
हा भेद तु खोलणार नाहीस
तु बोलणार नाही ठाऊक आहे
हा माझ्यातला बदल समझायचा की?
मी खरचं भावुक आहे।
प्रत्येक क्षण तुला द्यावासा वाटतो
तुझा हात हाती घ्यावासा वाटतो,
तुला समझतयं ना मी काय म्हणतोय
माझ्यातला मी,तुझाच व्हावासा वाटतो!
सांग ना ,तुला समझत ना सारं?
मी वेडा नाही ना?
तुला उमगत ना सारं?


जुन्या वहीची पानं चाळताना
मोरपीस हातात पडतं
मोरपीस गालावर फ़िरताना
आठवणींशी नातं जडतंया आठवणींत बुडुन जाताना
आजचं नाही उरत भान
क्षण ते परत ना येतील आता
तीच होती सुखाची खाण

आठवणी असतात अनेकांच्या
तुमच्या, माझ्या, सर्वांच्या
प्रत्येकाची असते एकतरी आठवण
दु:खाची अथवा सुखाची साठवण

माझ्याही आहेत अशाच आठवणी
पालटुन गेलेल्या भुतकाळाच्या
जीवन झाल्या त्याच आठवणी
सुवर्णरुपी गतकाळाच्या
ह्रुदयात या रुजुनि गेल्या
काही त्यातल्या बुजुनही गेल्या
मनात काहींनी घर केले
पण…
क्षण आता ते उडुन गेले

आठवणी आठवाव्या लागत नसतात
आपोआप त्या आठवत असतात
पालटुन गेलेल्या सुंदर जीवनाचे
सुंदर क्षण भेटीस पाठवत असतात
भरलेल आभाळ रात्रभर गळल होत
तिच माझ नात फ़क्त पावसालाच कळल होत

रात्र भर पाउस थेंब अन थेंब सांडुन गेला
तिच्या माझ्या आठवणीवर ओलावा मांडून गेला
भिजण्यासाठी मग मन माझं वळल होत

तिच माझ नात फ़क्त पावसालाच कळल होत

ती रात्र पावसाने भिजवून काढली होती
मग वीजही कडाडून मांडली होती
भर पावसात माझं आभाळ जळल होत

तिच माझ नात फ़क्त पावसालाच कळल होत
तुझ्या असण्यामुळं
जगणं थोडं सुसह्य झालंय
तुझ्यामुळं मला हक्काचं
विसाव्याचं स्थान मिळालंय...

माहित आहे मला...

वादळ थोपवायला
तूही असमर्थ आहेस नि मी ही
पण वादळं झेलण्याचं नि पेलण्याचं
तुझ्यामुळंच मला सामर्थ्य मिळालंय...

माहित आहे मला...

या भरकटलेल्या गलबताला
तू दिशा नाही दाखवू शकत
पण नांगर टाकून स्थिर होण्यासाठी
तुझ्यारुपी एक बेट मिळालंय...

माहित आहे मला...

घाव घालणारे घाव घालतच जाणार
तुकडे तुकडे होतच राहणार
घातलेले टाके उसवतच राहणार
धबधब्यासारखं जन्मभर कोसळतच राहणार...

पण यातून सावरण्यासाठी
मला तुझं दान मिळालंय
तुझ्या असण्यामुळं
जगणं थोडं सुसह्य झालंय..
सतत तुझा विचार येत राहतो

सतत तुझा चेहरा दिसत राहतो
सतत तुझी आठवण येत राहते

कधी दिवस भराच्या घायीत
तुझा चेहरा मनाला शांत करतो
कधी एकांतात तुझा चेहरा
मनाचा एकांत हरवून टाकतो
कधी अडचणीत तुझा चेहरा
जगण्याची नवीन आशा देतो

तुझाच चेहरा तुझीच आठवण
कधी हे मला लिहायला लावते
तू आणि तुझ्या साऱ्या गोष्टी
हल्ली माझ्या जगण्याच्या हालचाली ठरवतात
तुझे ते हास्य तुझे ते शब्द
नेहमी कानावर पडत राहतात
हेच शब्द कधी कधी वेळेचा हि विसर पाडतात

माझ्या जगण्यावरील तुझे हे नियंत्रण
कदाचित तुला हि माहित नसेल
जे ह्या जगात सगळ्यांनी केलं
ते प्रेम हि असंच असेल ??
चांदणे पांघरलेले आकाश नाही मागत तुझ्याकडे
क्षितिजावर लुकलुकणारा एक तारा मात्र आठवणीने दे
बेभान कोसळणारा मुक्त पाउस नाही मागत तुझ्याकडे
श्वासात दरवळणारा ओल्या मातीचा सुवास मात्र आठवणीने दे
बेधुंद करणार्या रातराणीचा बहर नाही मागत तुझ्याकडे
जाताना एक मोगर्याची कळी मात्र आठवणीने दे
उसळणारा बेछुट दर्या नाही मागत तुझ्याकडे
शांत जलाशयातील एक तरंग मात्र आठवणीने दे
मुठी एवढे ह्रुदय नाही मागत तुझ्याकडे
मझ्यासाठी चुकलेला एक ठोका मात्र आठवणीने दे
आठवणीने दे
आठवण आली तुझी की,
नकळत डोळ्यांत पाणी येतं..
मग आठवतात ते दिवस
जिथं आपली ओळख झाली..

आठवण आली तुझी की,
माझं मन कासावीस होतं
मग त्याच आठवणींना..
मनात घोळवावं लागतं..

आठवण आली तुझी की,
वाटतं एकदाच तुला पाहावं
अन माझ्या हृदयात सामावून घ्यावं..
पण सलतं मनात ते दुःख..
जाणवतं आहे ते अशक्य...


आठवण आली तुझी की,
देवालाच मागतो मी....
नाही जमलं जे या जन्मी
मिळू देत ते पुढच्या जन्मी
एक अनोळखी ...
तरी पण का वाटतंय..
तुजे आणि माजे नाते पूर्वीचे ते किती ..
ऋणानुबंध जुळले छान ते किती ...
ना नाव माहिती होते ...
ना गाव माहिती होते...
तरी पण का वाटतंय ..
भेटलो होतो आधी कधी..
कळलेच नाही तू मला आवडलीस कधी ..
समजलच नाही मी तुज झालो कधी..
एक अनोळखी..
म्हणून सोडून जाऊ नको ...
प्रीत हि हृदयाची तोडू नको..
एक अनोळखी..
म्हणून विश्वास सोडू नको..
आपले नाते विसरू नको..
पापण्यांचे पंख लावून आज
उडू पहातंय पाखरू ,
तूच सांग ,या वेड्या मनाला ,
आता कसं आवरू?
खूप समजावलं त्याला ,
अरे,क्षितीज असतं फसवं ,
गवसल्यासारख वाटतं ,तिथेच,
शोध होतो पुन्हा सुरु ........
इंद्रधनुचे सप्तरंग ,
आपल्यासाठी नसतात रे ,
सगळ हरपून बघ ,पण ,
त्याची आस मात्र नको धरू ........
आकाशीचे चंद्र -तारे ,
फक्त अंधाराचेच सोबती ,
त्या आभासाच्या मागे तू ,
नको रे गरगर फिरू.......
रहाता राहिला सूर्य ,अरे,
तो तर आपला कधीच नसतो ,
जवळ त्याच्या जाण्याचा तर ,
विचारसुद्धा नको करू..... ...
एकूण काय ,आभाळ नसतं आपल्यासाठी......
आपली स्वप्न जमिनीवरची ,
उडण्याच्या या हट्टापायी
त्यांनाच नको विसरू............
मग ते म्हणालं ,
एकदाच मला उडू दे......
पंखांची ताकद आजमावूदे ,
वाळूतली मृगजळसुद्धा ,
उडता -उडता पाहूदे....
फार तर काय होईल ?
पापण्यांचे पंख अश्रूंनी भिजतील.....
पण माझा प्रयत्न सच्चा होता ,
याचं समाधान तरी राहील ........
शेवटी मग मीही म्हटलं ,उडू दे बापड ,
आज त्याचाही हट्ट पुरा करू ,
सरळ बळ पंखातलं तर ................
आपणच एकमेकांना सावरू................................
-
आज खुप एकट-एकट वाटतय
आज खुप एकट-एकट वाटतय,
जणु तुला शोधावस वाटतय,
नज़रेतुन तुला बघावस वाटतय,
मनातून थोडस रडावसही वाटतय…..
चिंब पावसात भिजावस वाटतय,
तुझ्या हाताला धरून नाचावस वाटतय,
ओल्या डोळ्यांनी तुला पहावस वाटतय,
पहाता-पहाता तुला सर्व काही सांगावस वाटतय…..
भिजल्या अंगानी तुला मिठीत घ्यावस वाटतय,
गार पडलेल्या अंगाला थोड गरम करावस वाटतय,
बेभान वारयाबरोबर धावावस वाटतय,
जगाला विसरून वेगळ काही कारावस वाटतय…..
पण....
सर्व काही नुसत वाटतच रहातय,
नसून सुद्धा ह्या इथे, तू असल्यासारखी वाटतेस ,
तुझ्याशिवाय मन जणु वेड होऊन रहातय,
हळव्या मनाला कुठेतरी समजवावस वाटतय
ध्यानी मनी नसताना.... आयुश्यात एका क्षणी.. मैत्री प्रवेशते....
हिरव्या श्रावणात हातावर रंगलेल्या ... मेंदी सारखी....
आयुश्यभर आठवत रहाते....
मैत्री म्हणजे एकमेकांना समजणं..आणि समजावणं असतं.....
मैत्री म्हणजे... कधी कधी स्वताःलाच आजमावणं असतं .....
घट्ट लावलेलं मनाचं दार.. मैत्रीत अलगद उघड्तं....
हळव्या मनात जपलेलं 'अलगुज' अवचित ओठांवर येतं......
मैत्री मधुनच जन्म घेतं.. निखळ प्रेमाचं रोपटं.....
प्रेम ! परमेश्वरानं माणसाला दिलेली... सर्वात सुंदर गोष्ट !......
मित्राचा 'सखा' आणि मैत्रीणीची 'सखी'......
मैत्रीतुनच फ़ुलतात नाती.... फ़ुलपाखरासारखी........
इन्द्रधनुश्यी रंग लेवुन.. फ़ुलपाखरु आकाशात झेपावते.....
हिरव्या श्रावणातली मेंदी.. आणखीनच रंगत जाते.....
सांग सख्या माझ्या सवे मैत्री तू करशिलका...........?
माझ्या सवे अंगणी खेलात तू रमशीलका...........?
झाडावरच्या झुल्यावरी माझ्या सवे झुलाशील का.....?
खेलातला डाव मोडून माझ्यावरी रुसशील का.........?
सांग सख्या माझ्या सवे मैत्री तूकरशिलका............. ...?
अंधारात रात्रीचा चंद्र तू होशील का............ ..?
अडकलता पाउले हात तुझा देशील का..........?
चुकता माझी पाउले राग तू कराशिलाका...........?
सांग सख्या माझ्या सवे मैत्री तूकरशिलका............ ...?
आली असता संकटे झेलुनी तू घेशील का..........?
काटेरी रस्त्यावर साथ माझी देशील का............ ......?
लापविता दुःख मी तास माझा घेशील का............ .......?
सांग सख्या माझ्या सवे मैत्री तूकरशिलका............ ...?
माझ्या सवे मनामोकल्या गुजगोष्टी करशील का........?
समजुन माझ्या अडचणी सहानुभूति देशील का.......?
येता वाईट विचार मनी नवी उमेद होशील का.........?
सांग सख्या माझ्या सवे मैत्री तूकरशिलका............. ...?
देशील माला प्रेम अणि माझे प्रेमघेशील का......?
कही क्षण जीवनात आनंदाचे देशील का..........?
ठेवशील मला मनी अणि आठवणीत राहशील का....?
सांग सख्या माझ्या सवे मैत्री तूकरशिलका.............?
मैत्रीम्हणजे काय असतं?
एकमेकांचा विश्वास असतो?
अतूट बंधन असत? की
हसता खेळता सहवास असतो?
मैत्री म्हणजे मैत्री असते,
व्याख्या नाही तिच्यासाठी;
अतूट बंधन नसत,
त्या असतात रेशीमगाठी
मैत्री असते पहाटेच्या दवासारखी,
थंडगार स्पर्श करणारी;
मैत्री असते केवड्यासारखी,
तना-मनात सुगंध पसरवणारी
मैत्री असते सुर्योदयासारखी,
मनाला नवचैतन्य देणारी;
मैत्री असते झाडासारखी,
उन्हात राहून सावली देणारी;
मैत्री करावी सोन्यासारखी,
तावुन-सुलासुलाखून चमचमणा;
मैत्री करावी हिर्या सारखी,
पैलू पडताच लख-लखणारी;
मैत्री असावी पहाडासारखी,
गगनाला भिडणारी;
मैत्री असावी समुद्रासारखी,
तलाचा थान्ग नसणारी;
मैत्री म्हणजे समिधा असते,
जीवन यद्न्यात अर्पण झालेली;
स्वताच्या असन्याने सुद्धा
मन पवित्र करणारी;
मैत्री हे नाव दिलय
मनाच्या नात्यासाठी;
अतूट बंधन नसत त्या असतात
तुझ्यामैत्रीवर कितीही लिहिलं.....
तरी उणं वाटतं
सारं आहे माझ्याकडे आज
तरी कुठंतरी काहीतरी सुनं वाटतं
तुझ्या मैत्रीचे क्षण
पुन्हा हवेहवेसे वाटू लागतात
आज मन माझं लख्ख आकाश
त्यात तुझ्या आठवांचे ढग दाटू लागतात
तुझ्या मैत्रीची गर्द सावली
अशी आयुष्यावर दाटली होती
आयुष्यातली उन्हं माझ्या
तुझ्याचमुळे आटली होती
तुझ्या मैत्रीच्या आठवणी
मी आजही जपून ठेवतो
आनंदाचे ते क्षण हरवू नयेत म्हणून
काळजाच्या तिजोरीत लपून ठेवतो
मैत्रीचं नातं तुझ्या
माझ्याशी आजन्म असच राहील
तुला ठेच लागली कधी
तर पापणी माझी वाहील
मन माझे वेडे
पुन्हा एकदा त्या क्षणांचा शोध घेतात
अन शब्द माझे कवितेतून
तुझ्या मैत्रीचा वेध घेतात

Monday, April 23, 2012



काल तुला पाहण्यात
मी असा हरवून गेलो
हृदयाचा ठोका चुकला
काय माहित कसा भानावर आलो

तुझ्या हसर्या चेहऱ्याने
अशी काय जादू केली
गालावरची खळी तुझ्या
मला स्तब्द करुन गेली

तुझ्या कुरळ्या केसांत
मन माझे गुंतले
गुरफटले असे ग
नकळत वेडेपिसे झाले

नयनातले भाव तुझ्या
मी वाचत होतो
हरवून मी मजला त्यात
मी मलाच शोधात होतो
आठवणीत तू नजरेत तू,
ओठावरही तु्झेच नाव,
तुझ्यावर प्रेम करतो,
........ माझे नाव।
----------------------------------------

तुझ्यावर रागवणं तुझ्यावर रुसणं,
मला कधी जमलंच नाही,
कारण तुझ्याशिवाय माझं मन,
दुस-या कुणात रमलंच नाही।
---------------------------------------

एकटेपणा सारून जातो . .
असा तुझ्या आठवणीत ,
उन्हाचा चटका विसरून जातो . .
जसा पावसाच्या सावलीत .!
--------------------------------------
तुझं माझ्यावरचं प्रेम बघून
मला खूप बरं वाटलं
स्वप्नात जरी असलं तरी
जाग येईपर्यंत खरं वाटलं 

---------------------------------------

तुझ्याशिवाय जगणं काय,
जगण्याचं स्वप्नसुध्दा पाहू शकत नाही,
श्वासाशिवाय काही क्षण मी जगू शकतो,
पण तुझ्याशिवाय एकही क्षण जगू शकत नाही।
----------------------------------------------

माझ्या मिठीत अशी ये की,
माझेच मला भान नसावे...
वास्तवाचा पडुनी विसर मी,
फक्त तुझ्यातच रमावे..
----------------------------------------------

प्रेम मागुन मिळत नाही ते वाटावं लागतं,
ध्यानी मनी नसताना अवचित कोणी भेटावं लागतं...
प्रेमाचं फुलपाखरू स्वछंद उड़ते,
मनमोहक रंगानी पुरतं वेडं करतं.....
-----------------------------------------------

एका इशाऱ्याची गरज असेल,
हृदयाला किनाऱ्याची गरज असेल,
मी तुला त्या प्रत्येक वळणावर मिळेल,
जिथे तुला आधार ची गरज असेल.....
------------------------------------------------

प्रेम म्हणजे काय असते ते,
जाणण्यासाठी प्रेमात पडायचे असते ,
स्वछंदी प्रेमाचा वर्षाव करत,
एकमेकांना अलगद सावरायचे असते..
------------------------------------------------

गुलाबाची सुंदरता,
मोगऱ्याचा वास,
पावसाच्या सरीसारखा,
शीतल तुझा सहवास..
------------------------------------------------

तुझ्या आणि माझ्या प्रेमाचा,
साक्षीदार आहे तो क्षण,
ज्या क्षणी मी तुला,
देऊन टाकले माझे मन...!
-----------------------------------------------

एक क्षण तुझ्या शिवाय मला राहता येत नाही,
तुझे दू:ख मला सहन होत नाही,
का एवढे प्रेम करतेस की,
तुझ्या शिवाय मला जगता येत नाही..
-----------------------------------------------

प्रत्येकाच्या जीवनात येतो हा गोड क्षण,
अगदी आनंदाने जगतो प्रत्येक जण,
दोन जीवांचे मधुर मिलन,
त्याच नाव "प्रेम" आणखी कोण..
----------------------------------------------

माझ्या आठवणींना तुझ्या सोबतीची जोड़ असते,
तू सोबत असली तर प्रत्येक आठवण गोड असते,
प्रत्येक क्षण आठवतो तुझ्या सोबतितला,
क्षण असा की लाजवेल सुखाला...
-----------------------------------------------

प्रेम म्हणजे..
चंद्रासारखे शीतल राहणे,
कधीकधी सूर्यासारखे तापणे..
सुगंध होऊन दरवळत राहणे..
उसळणाऱ्या लाटेसारखे वाहने.!
----------------------------------------------

सौंदर्या पेक्षाही सुंदर तुझ दिसणं,
स्वप्न पेक्षा रम्य तुझ हसणं,
फुला पेक्षा कोमल तुझ रुसणं,
या सर्व पेक्षा तुझ माझ्या जवळ असणं.
---------------------------------------------

प्रेम तिच्यावर करावे,
जिला आपण आवडतो,
नाहीतर आपल्या आवडीसाठी,
आपण उगाच आयुष्य घालवतो.
--------------------------------------------

तिच्याशी भांडताना नकळत,
मीच नकळत तिच्या बाजूनी होतो!
तिच्या गालचे अश्रू पुसत,
रागच माझा फितूर होतो !!
-------------------------------------------

पहाटेची गुलाबी थंडी,
मी मुक्त अनुभवतो..,
त्यातून तुझा स्पर्श,
मला आजही जाणवतो..!
--------------------------------------------

रानोमाळ पळून गेलेले शब्द,

ती गेल्यावर परत येतात,

आणि, काय काय बोलायचे होते याची,

आठवण करून देतात..
----------------------------------------------

"प्रेम" हा रेशमाचा धागा असतो..
तो प्रत्येकाच्या नशिबात नसतो..
आपल्या नशिबात आला म्हणून..
तो खेळण्या सारखा खेळायचा नसतो!
------------------------------------------------

तू भेटशील तेव्हा,
खूप काही बोलायचे आहे . .
थोडे फार भांडण आणि,
खुपसे प्रेम करायचे आहे .
-----------------------------------------------

तुझ्या डोळ्यात दाटलेले ते अश्रू ,
तूच सांग सखे मी कसे विसरू ?
स्वप्नात हरवताना क्षणो - क्षणी तुझ्या ..
सांग सखे मी स्वतःला कसे सावरू.?
---------------------------------------------

फुलाकडे सहानुभूतीने काय बघतेस
त्याला देठाचा तरी आधार आहे ,
जरा माझ्या हृदयात डोकावून बघ ,
तुझ्या वाचून सगळा अंधार आहे.
--------------------------------------------

दुरून तुला पहिले ..
याचा मला हर्ष आहे ..
तू जवळ नसलीस तरी ..
सोबत तुझा हलकासा स्पर्श आहे .!
-------------------------------------------
तुझं माझ्यावरचं प्रेम बघून
मला खूप बरं वाटलं
स्वप्नात जरी असलं तरी
जाग येईपर्यंत खरं वाटलं
-------------------------------------------

भावनेच्या भरात,
बरेच काही बोलून गेले,
प्रीतीचे बंध जोडत,
फुलपाखरू उडून गेले.
-------------------------------------------

जग सारे प्रेमात पोहत असताना,
मी तुझ्या डोळ्यात बुडलो होतो,
शाळेत घातल्यापासून असे पहिल्यांदाच झाले,
कि मी सगळ्या विषयां मध्ये उडलो होतो.
------------------------------------------

ओल्या तुझ्या त्या स्पर्शाला,
मंद मंद असा सुवास आहे....
आजही आठवतो मला तो क्षण,
ज्या मध्ये अडकलेला माझा श्वास आहे
-----------------------------------------

प्रेम म्हणजे.. "वसंत ऋतू"
जे एका नजरेत हृदयात उमलते,
डोळ्यात तरंगते आणि,
ओठावर थरथरते.!
-------------------------------------------

कविता करताना आज मला,
काही सुचतच नाही,
मनात दाटून आलेल्या भावना,
कागदावर आज येतच नाहीत..
------------------------------------------
तुझी मी माझा तू, आपण एकमेकांचे.....
माझे डोळे तुझीच छटा , स्वप्नं चांदण्याचे...
तुझे ओठ माझी गोडी, गुपित भारावल्या क्षणाच.
-------------------------------------------------

ओठांवर जेव्हा ओठ टेकवतांना,
भान दुनियेचे ठेवायचे नसते,
तूच तर सांगत असतेस ना मला,
तेंव्हा डोळ्यानीच डोळ्यांशी बोलायचे असते.
---------------------------------------------

प्रिये तू जायला निघाली आणि डोळ्यात पाणी आले,
तू हळुवार गालावर हाथ फिरवून,
पुन्हा भेटण्या चे वचन दिले,
पुन्हा मी तुला मिठीत घेतले.
-------------------------------------------------

काही बोलून रडवू नकोस,
चूप राहून शिक्षा देऊ नकोस,
सुख देवू नाही शकत तर दु:ख हि चालेल,
फक्त वचन देशील मला विसरू नकोस.
------------------------------------------------

एक ओंजळ प्रेमाची फक्त तुझ्या साठी
शपथ अतूट नात्याची फक्त तुझ्या साठी
आज दिले वचन तुला
माझी सर्व सुखे फक्त तुझ्या साठी..
------------------------------------------------

एक क्षण तुझ्या शिवाय
एक क्षण तुझ्या शिवाय मला राहता येत नाही,
तुझे दू:ख मला सहन होत नाही,
का एवढे प्रेम करतेस की,
तुझ्या शिवाय मला जगता येत नाही..
-------------------------------------------------------






आज पहाटे माझ्या मनाचा कोपरा न कोपरा ओलाचिम्ब झाला...चौकशी केल्यावर समजले, तुझ्या आठवणींचा पाउस ओला पडला....

एरवी तुझ्या आठवणी येतात अणि डोळे ओले करतात जाता ...मात्र आजचा आठवणींचा पाउस मात्र वलवाचा होता ...

तुझी प्रत्येक आठवण मनाला धुंद करते ...मनातील बाकि सर्व विचारांच्या वाटा पूर्णपणे बंद करते ...

तुझी प्रत्येक आठवण म्हणजे माझ्यासाठी चाफ्याचे एक फूल असते ...कितीही वास घेतला तरी ते कायमच अगदी फ्रेश दिसते ...

तुझी प्रत्येक आठवण म्हणजे माझ्यासाठी भावनेचा महापुर...तुझी प्रत्येक आठवण म्हणजे गवयाला बरेच दिवसानी गवसलेला सुर...

तुझी प्रत्येक आठवण म्हणजे वर्षानुवर्षे पुस्तकात ठेवेलेले पिंपलाचे पान ...तुझी प्रत्येक आठवण म्हणजे तू माझ्या पदरात टाकलेले आयुष्याचे दान ...

असाच आठवणी देवून मला श्रीमंत कर कुबेरापेक्षा ....
तू माझे आयुष्य कृतार्थ कर ...एवढीच देवाकडे अपेक्षा ....


कधी कधी विचार करतो ... का आपण परत भेटलो का जुन्या आठवणी जाग्या झाल्या .. का नशीब मेहरबान झाले ...

कधी कधी विचार करतो ... का तू माझ्यावर एवढे प्रेम करतेस ...का मला तुझी एवढी ओढ़ लागते ...का तुझ्या शिवाय आयुष्य खोटे वाटते ...

कधी कधी विचार करतो ... का देवाने असे केले ....का आपल्याला वेळेवर भेटावले नाही ... का तुला आधी माझी बायको केले नाही ....

कधी कधी विचार करतो ...झाले ते पण चांगले झाले ...उशिराने का होइना .. पण तुझे प्रेम मला मिळाले ....

कधी कधी विचार करतो ...का देवाने तुला एवढे सुन्दर केले ....का तू मला एवढी आवडतेस ....का तुझी एवढी आठवन येते ....

आता कधी कधी नाही ..तर कायम तुझा विचार करतो ...कायमच तू समोर दिसतेस ...कायमच देवाचे आभार मानतो ....

चल आपन दोघे मिळून देवाचे आभार मानुयात ..आनी एकच प्रार्थना करुयात ...
जेवढे आयुष्य राहिले आहे ..तेवढे प्रेमात जावु दे ...तुझ्याच प्रेमात मला आयुष्यभर न्हाऊ दे ....

Sunday, April 22, 2012



तू नुसती दिसणार असलीस तरी मन नाचायला लागते
हातात हात नाही घेता आला, तरी तुज्या डोळयातून प्रेम वाहताना दिसते
------------------------------------------
तू माज्या जीवनात प्रेमाचा पाउस घेउन आलीस ...
मला भिजवताना तू पण ओली चिम्ब जालीस ...
------------------------------------------
हे दिवस में आयुष्यात कधीच विसरणार नाही ....
तू इतके भरभरून देतेस की देवासमोर पण आता हात पसरणार नाही..
------------------------------------------
तू बरोबर असतेस तेव्हा मी सगळे जग विसरतो ..चल आपण आपले जग बनवुयात...
एकमेकंच्या साथीत राहिलेले आयुष्य घालवुयात....
------------------------------------------
तू मला इतके प्रेम दिले आहेस की ते मला आयुष्यभर पुरेल ..
उद्या मेलो तरी तुज्यासाठी परत शरीरात श्वास भरेल...
------------------------------------------
सकाळी तुला निरोप देताना माजे डोळे पाणावले...
बकुली चा वास इतका सुन्दर असतो हे मला सकाळीच समजले....
------------------------------------------
तुज्या बरोबर घालवलेला प्रत्येक क्षण माज्यासठी फार मोलाचा आहे दोष माझा नाही ...
दोष तू दिलेल्या चाफ्याच्या फुलाचा आहे ....
------------------------------------------
तुझे झाडावर पण प्रेम करने मला आवडले...
तुझ्या प्रेमात आज मी देवाला बघितले...
------------------------------------------
या माझ्या कविता नाहीत तर माझे प्रेम आहे ...
तुला खुप प्रेम द्यायचे हा आता माझा aim आहे...


पावसाला सांगतो जा माझ्या प्रियेच्या अंगावर मंद सरींचा पाउस पाड .... तिला माझ्या आठवणी मध्ये धुंद करून टाक ....तिला माझ्या प्रेमाच्या पावसात भिजताना मला पाहू दे ..... तिचे मोहक रूप मला माझ्या डोळ्यामध्ये साठवू देत ...पावसा please माझे एवढे काम कर .... माझ्या मनातील प्रेमाचे सर्व बांध तुटून तिच्यावर माझ्या प्रेमाचा वर्षाव होऊ दे ..


काल तू म्हणालीस ...ओंजळीमधून पानी कधीच गेले गलून .. राहिला फ़क्त ओलावा ....
अग वेडे ... आपले प्रेमाचे घरटे आहे खुप जुने ... त्याला हा आपला परत नव्याने गिलावा ...

पाणी गेले वाहून ...पण अजुन ओंजळ तर शाबूत आहे ....याला कमी समजू नकोस ....
पाण्याचे काय ...ते परत पण येइन ...विश्वास ठेव .... ओंजळ मात्र सोडू नकोस ...

प्रेमामध्ये ओली सुकी चालूच असते ... आपण फ़क्त प्रेम करायचे ....
एकमेकांच्या प्रेमात सम्पूर्ण जग विसरून जायचे ....


तुझ्या बरोबर घालवलेला प्रत्येक क्षण एका आयुष्याएवढा वाटतो ....
तू हरवशील या भीतीने माझा प्रत्येक श्वास शरीरात येतानाच घाबरतो ....

तुला केलेला प्रत्येक फ़ोन म्हणजे माझ्यासाठी सुखाची पर्वणी असतो ....
फ़ोन मधून पण तुझ्या शरीराचा गंध माझ्या नाकात जावून बसतो .....

तुला केलेला प्रत्येक SMS म्हणजे माझ्यासाठी एक पवित्र ओवी असते ....
कितीही वेळा ती वाचली तरी मन भरत नसते .....

तुझी प्रत्येक भेट मला एक नवीन अनुभव देवून जाते ....
प्रत्येक भेटीनंतर तितकीच तू माझ्या मनात खोल रुजत जातेस ...

तुझ्याशिवाय रहाण्याची कल्पना करवत नाही ... तुझ्याशिवाय राहण्यासाठी मन धजावत नाही ...का इश्वाराने ही वेळ आपल्यावर आणावी .... इतके प्रेम असून पण एकत्र रहाण्याची मुभा नसावी ...


माहित नाही कशी झाली भेट तुझी नि माझी
देवाला तरी कसं कळल मला गरज आहे तूझी

काहीच न बोलताही तू मला समजून घ्यायची
चूक माझी असली तरी स्वतःच रडून घ्यायची

मैत्रीतला हा गोडवा नकळत वाढत गेला
जेव्हा भांडलो तुझ्याशी त्रास मलाही झाला

मनापासून इच्छा आहे तुजसंग जगण्याची
पण नशिबान घात केला अन गंमत फसली वयाची

तुझं नि माझं चांगल जमत पण वयाने तू मोठी आहे
दुनियेच्या नजरेत मात्र प्रेमाची किंमत खोटी आहे

पुढल्या जन्मी अशीच भेट कि तुजसंग मला जगता यावं
या जन्मीच हतबल प्रेम त्या जन्मात बहरून यावं.........


नसती झाली भेट तुझी ती, नसते मी हसले
हसता हसता मनही हुरळूनी, जीवलगा नसते मी भुलले

ढलत्या शामल तिसऱ्या प्रहरी
जरी केला तू गनिमी हल्ला
नसती झाली नजर फितुरी
नसता पडला किल्ला
लाल किनारी निशाण तव ते
नसते शिरी चढले

शरणांगतीने गालावरती
पत्र गुलाबी जरी ते लिहिले
नसती केलीस कैद प्रीती
नसते नाते जडले
निरोप घेता पाउल माझे
नसते कधी अडले

Saturday, April 21, 2012



षण भरांच्या मिलनाची
वाट पाहते युगांन पासूनी
कशी ही ओढ अंतरीची
साद तुझी ऐकण्या साठी
अधीर आहे किती मी
दिवस सरला, रात्र गेली
घटका, पळ, सरता-सरता
अनेक वर्ष पण निघुन गेली
साद राहीली फक्त तुझ्या ओठा वरती
वाट पाहीन मी अजुन तुझी
सांग कशी ही ओढ अंतरीची
एक क्षण तुला पाहण्या साठी
किती वाट पाहते मी
प्रतिक्षे मधे अधीर होतात डोळे
वाहते अश्रु धारा समवेत
अंतर मधले तेच रा‍हीले
वाट पाहीन मी अजुन तुझी
सांग कशी ही ओढ अंतरीची
माझ्या मनीची ओढ तुजला
आणेल जरूर माझ्या पाशी
किती ही दूर असला तरी
सदैव राहील माझ्या हृदयाशी
येईल जरूर क्षण भाग्याचा
संपेल रात्र युगांतरीची
जाणवेल तुजला ओढ अंतरीची


ओठांस लाव राणी प्याला रिता कराया
ओतीन जीव माझा प्याला पुन्हा भराया

हे मद्य संपण्याची भीती तुला कशाला
ओठांस स्पर्शुनी ते लागेल मोहराया

नाकारशील माझे सारे उधाण राणी
(पण) लागेल वेळ थोडा काहूर ओसराया

थंडीत एकट्याने तू झोपशील तेंव्हा
माझेच चांदणे घे स्पप्नांस पांघराया

डोळ्यांत आठवांचा दाटेल मेघ माझ्या
धावून ये सखे त्या मेघास सावराया
झ्याविना सखे इथे उशी विराण आजही
तुझीच वाट पाहुनी उदास प्राण आजही

विराट सागरावरी तुझाच चांद येतसे
तुझीच लाट अंतरी, तुझे उधाण आजही

नकोस आज वापरू, तुझे धनुष्य तू सखे
अहेत अंतरी इथे जुनेच बाण आजही

नव्या युगास पाहिजे नवीन राम जानकी
कशास वाचतेस तू जुने पुराण आजही

जपून टाक तू तुझी सात पाउले सखे
तुझ्या मनातल्या नव्या दिशा अजाण आजही


माझ्या तुझ्या सुरांच नातं असं जुळू दे
नात्यात आपल्या गं मल्हार कोसळू दे

आलीस घेउनी तू तारांगणे सुखाची
जातेस का? जरा या चंद्रास मावळू दे

मकरंद चाखणा या फुलपाखराप्रमाणे
ओठांस आज माझ्या संजीवनी मिळू दे

नेसून ये सखे तू आकाश तारकांचे
एका मिठीत सारे आभाळ आवळू दे

देहांत तापलेल्या बरसून जा अशी तू
दाही दिशांस माझा मृद्गंध दरवळू दे


माझिया आतली मीरा बेभान नाचते आहे
तुझियात कृष्ण किनारा माझाच शोधते आहे

लाडक्या तुझ्या प्रेमाने अस्तित्व व्यापले माझे
प्रत्येक श्वास घेताना घुंगरू वाजते आहे

बोलते अता वा याशी, ऐकते अता ता यांचे
भासतो चंद्र हसलासा, मी उगा लाजते आहे!

पाहते वाट रात्रीची, येशील स्वप्ननगरीला
दिवसाच पाहते स्वप्ने, रातची जागते आहे

अंगणी तुझ्या गंधाने पेटून थांबण्यासाठी
प्राजक्त तुझा होण्याचे मी भाग्य मागते आहे


स्पंदनांचा आज माझ्या आसरा हो
तू सखे बागेत माझ्या मोगरा हो

शोधतो मी माझिया रूपास राणी
दर्पणी जो पाहतो तो चेहरा हो

धृपदाला आळवू आता किती मी
ये सखे तू जीवनाचा अंतरा हो

वाहुनी जाती जरी सारीच स्वप्ने
भंगला नाही कधी तू तो चिरा हो

पाकळ्या माझ्या तुझ्यासाठीच सार्‍या
गंध माझा चाखणारा भोवरा हो


तारकांपल्याड आहे जायचे
चांदण्यांचे गीत आता गायचे

कालचे गेले उन्हाळे संपुनी
पावसाने धुंद आता व्हायचे

अंगणी माझ्या फुलोरा हा तुझा
पारिजाताच्या फुलांनी न्हायचे

जाहलो आहे असा कापूर मी
स्पर्शता तू मी असे पेटायचे

घातली आहेत ऐसी माळ तू
श्वास माझे ज्यात मी गुंफायचे


ना तुला भेटूनही ही ओढ वाटावीच का?
अंतरी माझ्या तुझ्या ही ज्योत पेटावीच का?

सूर जे नाही मिळाले शोधुनी दाही दिशा
खिन्न माझ्या अंतरीची धून तू गावीच का?

जीव सांभाळून आहे कोणत्या आशेवरी?
वाळवंटी ही सुखांची आस स्पंदावीच का?

बोललो मी एवढा की शब्द सारे संपले
मी तरी बोलायचे ते बोललो नाहीच का!

स्वप्न जे जे पाहिले ते जाळुनी गेले तरी
आजही स्वप्नांधतेचे पारडे भारीच का?


एवढी आहे सखे प्रेमार्तता माझी तुझी
आपल्या नात्यात होते पूर्तता माझी तुझी

थांबल्या आकाशगंगा थांबली तारांगणे
स्तब्ध सारे ही कहाणी ऐकता माझी तुझी

एकमेकांच्या सुरांचा स्वर्गही मागू अता
देत आहे मागतो ते देवता माझी तुझी

कालही का वादळे? ही आजही का वादळे?
वादळे येतात, स्वप्ने ऐकता माझी तुझी


माझे जरा तरी तू ऐकून बोलणे घे
विझवून हे निखारे पदरात चांदणे घे

सारेच फेकुनी दे काटे उरातले तू
श्वासांत मोगर्‍याचे निष्पाप गंधणे घे

होवून लाट राणी आता मिठीत येना
तूफान सागराचे बेहोष झिंगणे घे

देवू नको निवाडा तूही जुना पुराणा
माझ्या जुन्या गुन्ह्यांची ऐकून कारणे घे

या अंगणात माझ्या आनंद शिंपतो मी
तूही अता ऋतुंनी आभाळ शिंपणे घे


भेटण्याला वाकले आभाळ सारे
सांग तू आतातरी येशील का रे?

धावुनी मागे तुझ्या वेड्याप्रमाणे
श्रांत आता जाहले बेभान वारे

सोडुनी ये तू तुझ्या आकाशगंगा
चांदणे गावातले या गंधणारे!

दाटला चोहीकडे अंधार तेंव्हा
तेवणारा तूच तू होतास ना रे?

धृपदे श्वासांत माझ्या ओवताना
अंतरेही जीवनाचे तूच गा रे!


अधीर ओठ टेकता जरी शहारतेस तू
मिठीत या सखे अशी कशास लाजतेस तू!

फुलून पारिजात हा उभा तुझ्याच अंगणी
उगाच लाजतेस अन सुवास टाळतेस तू

तुला न पाहता उनाड चंद्रही न मावळे
कशास 'चांदणे कुठे' असे विचारतेस तू?

अता कुठे जरा जराच रंगतेय ही निशा
अशात हाय कुंचलाच दूर सारतेस तू

सखे तुझ्या मिठीतलाच मागतोय स्वर्ग मी
कुशीवरी अशी फिरून पाठ दावतेस तू


किती कितीदा समुद्र व्हावे सखीमुळे
किती कितीदा उधाण यावे सखीमुळे

तशी न माझी मुळे कधी रोवली कुठे
तृषार्त आत्मा उनाड धावे सखीमुळे

तिच्याविना ना घरात माझ्या झुळुकही
समग्र जीवन सुगंध व्हावे सखीमुळे

सदैव देवो मला सुरांचे दान सखी
प्रीत बहरले गीत सुचावे सखीमुळे

ढकलत होतो श्वास एकटा कसातरी
क्षितीज आता मला खुणावे सखीमुळे


तू नसताना
तुझ्या सयींच्या
उधाण लाटा
चहुदिशांना

तू नसताना
उजाडलेल्या
भणंग वाटा
चहूदिशांना

तू नसताना
रित्या अंबरी
फिके चांदणे
चहूदिशांना

तू नसताना
तुझी आर्जवे
तुला शोधणे
चहूदिशांना


तुला पाहता षड्ज छेडतो
रिषभ स्पर्शण्यासाठी
तुझी मिठी गंधार होतसे
मध्यमा तुझ्या ओठी

पंचमातली एकरूपता
श्रांत धैवतासाठी
निषाधातली आर्त पूर्तता
अपूर्ण षड्जासाठी

कोमल सारे सूर तुझे अन
तीव्रच माझ्या ओठी
सात सुरांची अखंड मैफल
तुझ्या नि माझ्यासाठी!


किती आवडावे मला तू... तुला मी...
तरी का छळावे मला तू... तुला मी...

जसा चातका आठवे पावसाळा
तसे आठवावे मला तू... तुला मी...

सखे पारिजाता सवे देत राहू
हळू हेलकावे मला तू... तुला मी...

सदा दर्पणी पाहतो एकमेकां
अता ओळखावे मला तू... तुला मी...

जगू ग्रीष्मही हा वसंताप्रमाणे
ऋतू पांघरावे... मला तू... तुला मी...

जसा हात द्यावा धरेला नभाने
तसे सावरावे मला तू... तुला मी...

जिथे प्रेम आहे, तिथे ईश आहे
सदा आळवावे मला तू... तुला मी.


प्राण थोडासा जळावा लागतो...
मीलनासाठी दुरावा लागतो!

ताल का नुसतेच सांभाळायचे?
सूरही राणी जुळावा लागतो...

ऊब येण्याला जरा घरट्यामध्ये
जीव सारा अंथरावा लागतो...

रंगते ना काव्य शाईने गड्या
दर्दही थोडा झरावा लागतो!

राज्य जिंकायास का शस्त्रे हवी?
फक्त चरखा चालवावा लागतो!

पाकळ्या मिटल्या जरी माझ्या तरी
हाय, भृंगांना सुगावा लागतो...

प्रेम करतो मी पतंगासारखे
सिध्द करण्या जीव द्यावा लागतो

ही कशी प्रीती? असे नाते कसे?
रोज प्रेमाचा पुरावा लागतो!

ठेवली खाली जरा मी लेखणी
वादळालाही विसावा लागतो!

Friday, April 20, 2012

Monday, April 16, 2012



कधी-कधी तुझ्या ओठांवरचा ओलावा मला दुष्कालातल्या पानाव्थ्यावरचा एक थेंब वाटतो
तर कधी थंड दुधावर्ती तरंगणारी मंद-मंद साय वाटते.
कधी-कधी भाजार्या उन्न्हात ओठांना गारवा देणारा लाल-बुंद गरीगारचा गोळा वाटतो,

तर कधी गरम-गरम कॉफीवर जमलेल्या फेसाळ बुड-बुडयांचा मेळा वाटतो.
कधी-कधी चिंब करणारी पावसाची सर,
तर कधी वाहून नेणारा प्रेमाचा पूर वाटतो.

कधी-कधी पर्वतावर फसफस नारा ज्वालामुखी वाटतो,
तर कधी शम्पिअनच्या बाटलीतून फसफसनार्या शम्पिअनसारखाच नशीला वाटतो.
कधी-कधी पावसाची वाट पाहणाऱ्या मोराच्या ओलसर डोळ्यांप्रमाणे वाटतो,

तर कधी पावसात चिंब भिजलेल्या मोराच्या तोरावर मोत्यांप्रमाणे सजलेल्या ओलसर थेंबाप्रमाणे वाटतो.
असाच तुझ्या ओठांवरती मृगजळ होऊन चमचमणारा हा ओलावा ह्या सुकलेल्या, तहानलेल्या, माझ्या व्याकूळ ओठांना नेहमीच हवा हवा सा वाटतो,
नेहमीच हवा हवा सा वाटतो.............................



हे फक्त माझ्याचसोबत
नेहमी असंच घडणार आहे?
तुझ्याबरोबरची प्रत्येक भेट
न बोलताच संपणार आहे?

भेट-वेळ रोजची ठरलेलीचतरी अजून काय ठरणार आहे?
बोलायचं पटकन पण वेडं मन
त्याचाही मुहुर्त पाहणार आहे !

भेटतो तेव्हाच माहित असतं
निघायची वेळ येणार आहे
पटकन विचारावा प्रश्न हवासा
तर शब्द ओठीच अडणार आहे !

मी न विचारताच तू काय
हवं ते उत्तर देणार आहे?
हे पुरतं कळतंय तरीही
तोंड माझं का बोलणार आहे?

न बोलता बोललेले शब्द
तुला वेडीला कळणार आहे?
मी बोललो न बोललो तरी गप्पचनेहमीसारखी तू राहणार आहे !

भावभावना समजून घेणं
सगळंसगळं थांबणार आहे
उष्ट्या कुल्फीची चव मात्र
जिभेवरती रेंगाळणार आहे

स्वप्न माझं हे संपलं तरीही
मनात तूच उरणार आहे
तुझ्यात मी नसलो तरी
माझ्यात तूच सापडणार आहे

Friday, April 13, 2012



मन हे वेडं असतं
एखादी व्यक्ती आवडली
कि तिच्यावर प्रेम करून बसतं
पण.... मला हे कळत नाही
प्रेम का होतं?
डोळ्यांतून नेहमी
अश्रू वाहण्यासाठी कि,
हृदयाला सतत
वेदना देण्यासाठी
प्रेम का होतं?
त्या व्यक्तीच्या विरहाने
जीवनाचं रान होण्यासाठी कि,
त्याच व्यक्तीच्या सहवासाने
जीवनात पालवी फुलवण्यासाठी
प्रेम का होतं?
जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत
तिच्या आठवणीने
प्रेमपथावर एकटं चालण्यासाठी कि,
तिच्या सोबतीने नवीन
आयुष्याच्या सूर्योदयाबरोबर
जीवनाची पहाट सजवण्यासाठी
प्रेम का होतं?
कोणी म्हणतं
प्रेम हि जीवनातील
कठोर परीक्षा आहे आणि
त्या परीक्षेत सर्वच
उत्तीर्ण होत नाहीत
मग मला हे कळत नाही
प्रेम का होतं?


अंतकरणातून तुलाच
सर्वस्वी आपलं मानून
तुझ्याच स्वप्नात रंगून
नेहमी तुझ्या आठवणीने
तळमळत असतो
मी आणि माझी कविता!
माझं काव्य फक्त
तुझ्याचसाठी आहे
त्यात आपल्या प्रीतीचे
मधुर स्वर आणि भावना
एकवटल्या आहेत, म्हणूनच
तुझ्या विरह क्षणात तुला
काव्यातूनच अनुभवत असतो
मी आणि माझी कविता!
तुझ्यावर काव्य करण्यासाठी
सदैव शब्द कमी पडतात
कुठे अडखळलोच जर मी
तर काव्य पूर्ण करण्यासाठी
सदैव एकमेकाला मदत करतो
मी आणि माझी कविता!
तुझ्या विरहाचा गुंता सोडवून
तुझा विरह दूर करण्यासाठी
एकमेकांच्या सोबतीने आम्ही
सदैव प्रयत्न करत असतो
मी आणि माझी कविता!
तू नसलीस कि मला
सोबत होते शब्दांची
आणि एकतर्फी प्रेमात
निर्माण झालेल्या काव्याला
सोबत होते माझी,
का तर....
तुझ्याविना काहीच
अस्तित्व नसल्याप्रमाणे आहोत
मी आणि माझी कविता!


प्रेमाची व्याख्या
प्रेमाची भाषा
प्रेमाचा विश्वास तर
प्रेमाचा आत्मा म्हणजे
तो आणि ती!
त्यातला तो म्हणजे पूर्व
तर ती म्हणजे पश्चिम
दोघेही भिन्न स्वभावाचे
तरीही एकमेकांवर
जिवापाड प्रेम करणारे
तो आणि ती!
प्रेमाची साथ
जीवनाची गाठ
फिरवत नाही कधी
एकमेकांपासून पाठ
कारण दोघांची
एकाच पाउलवाट
तो आणि ती!
त्या दोघातली ती
रुसलीच कधी त्याच्यावर
तर तो देऊन गुलाब
समजूत काढतो तिची, असे
तो आणि ती!
दोघेही सापडलीच कधी
अडचणीत तर
सखी बनून त्याची
ती साथ देते त्याला
आणि सखा बनून तिचा
तो साथ देतो तिला, असे
तो आणि ती!
दोघांची या असली
भिन्न शरीरे जरी
तरी वसला आहे त्यांच्यात
एकचं आत्मा त्यांच्या प्रेमाचा
असे आहेत दोन जीव
एकमेकांवर जीवापाड
प्रेम करणारे....
तो आणि ती!


रेम तुझा रंग कसा?
हृदयातूनी उमलला जसा
रंग तुझे आहेत वेगळे
रूप तुझे आहे निराळे
जगावेगळा आभास तुझा
तुझ्याविना जीवन आहे सजा
प्रेम तुझा रंग कसा?
चेहर्यावर चंद्रकला उमलते
ओठांवरती हास्य उमटते
इंद्रधनुचे सप्तरंग पाहुनी
बागेत मोगरा फुलाला जसा
प्रेम तुझा रंग कसा?
नयनांचा हा खेळ निराळा
शब्दांनाही नसतो आळा
घाव करितो हृदयावरती
मनामधला भाव जसा
प्रेम तुझा रंग कसा?
वात्सल्याचा आपुलकीचा
नाजूक रेशीम धागा जसा
दोन शरीरात विश्वासाचा
एकच आत्मा वसला जसा
प्रेम तुझा रंग कसा?


तुझ्या विरहाने मी
सतत तळमळत असतो
तू आता येशील या विचाराने
तुझी वाट पाहत बसतो
—————————–
चार ओळींतून प्रेम व्यक्त करणं
प्रत्यकाला जमत नाही
ज्याला जमत नाही
त्याला प्रेम कधीचं उमजत नाही
—————————–
प्रेम केल्याने होत नसतं
नकळत होऊन जातं
ज्याच्यावर आपण प्रेम करतो
त्याच्या सुखासाठी नेहमी झटत राहतं
—————————
तुझ्या प्रेमात मला
एक अनोखी शक्ती जाणवते
तुझ्यावर प्रेम करायला मला
तुझी हरएक अदा खुणावते


वीणेच्या तारेतून निघणारा
संगीताचा मधुर सुर
की दोन जीवांच्या मनाला
लागणारी हुरहुर
प्रेमा तुला काय म्हणू?
लोकाच्या मनातला
तो दुर्मिळ तिरस्कार
की प्रेमविराच्या मनात
उगम झालेला अविष्कार
प्रेमा तुला काय म्हणू?
नशिबाने भेटलेलं
ईश्वरी शक्तीचं वरदान
की समाजाच्या मनातली
अश्लीलतेची घाण
प्रेमा तुला काय म्हणू?
मानवी जीवनातील
एक अद्भूत किमया
की आईची मुलावरील
एक वेडी माया
प्रेमा तुला काय म्हणू?
अमावस्येला चांदण्यांकडून
मिळणारा मंद प्रकाश
की जे अथांग आहे
असे ते निराकार अवकाश
प्रेमा तुला काय म्हणू?


चारोळ्यांच किती चांगलं असतं
प्रत्येकाच्या मनासारखं वागतात
मनातल्या प्रत्येक भावना
मोजक्या शब्दात सांगून टाकतात!
-----------------------------
चारोळ्यांच्या जगात वावरताना
मला काहिच आठवत नाही
सर्व आठवणी शब्दात मांडतो
कारण मनात मी काहिच साठवत नाही
-----------------------------
चारोळ्या आपल्या जीवनात
फार महत्वाची भूमिका बजावतात
एकूण एक शब्दतून आपल्याला
जुन्या आठवणीत पाठवतात
-----------------------------
चारोळ्यांच्या जगात वावरायला
प्रत्येकाला आवडत असतं
दुःखाच्या क्षणी आपल्याला ते
सुखाच्या गावात पाठवत असतं
माझ्या रचना, माझे शब्द
वाचून मला काहीजण म्हणाले
मित्रा तू झालास कवी
पण........
पण.... मी कवी नाही!
कारण माझ्या रचना, माझे शब्द
म्हणजे कवीचे काव्य नाही
माझे शव्द, रचना म्हणजे
माझ्या भावना आहेत
माझ्या ह्रदयाच्या  आहेत
 प्रेमाच्या कथा आहेत
याच  प्रेमात
मनात जन्मलेल्या भावनांना
काव्याचं स्वरुप देऊन
शब्दसूरांच्या मार्गाने
मी कागदावर उतरवले
माझ्या या रचना म्हणजे
तिच्या आठवणीचे
पुरावे आहेत
तिच्यासाठी वेचलेले
माझ्या प्रेममय आयुष्यातील
अनमोल आनंदाचे क्षण आहेत
याला मी काव्य कसे म्हणू?
म्हणूनच मी कवी नाही!
कवी लिहितो,
मनातले विचार कागदावर मांडतो
पण मी............
कागदावर उतरवतो
माझा प्रेमावरचा अतूट विश्वास
कधीही पूर्ण न होणारं माझं स्वप्न
माझ्या रचना म्हणजे
माझं जीवन आहे, कारण
माझे शब्द्, माझ्या रचना
माझ्या श्वासात सामावल्या आहेत
याला मी काव्य कसे म्हणू?
म्हणूनच मी कवी नाही!

Thursday, April 12, 2012

मी स्वत:स हरपून जाते, हा भास तुझा होताना

नसलास जरी समोर तू,वाटते जणू असलेला


स्वप्नात माझ्या येउन हैराण मला का करतो
अन अवचित जाग ही येता, तू असाच भवती विरतो!


वेगाने वाहून वारा ,हे केस जेव्हा उडवतो
वाटते मनाला माझ्या, की तूच बटा खेळवतो..


झाडांची अलबेल शाखा ह पदर असा अडवते
ह्र्दय असे धड्धडते जणू तुझीच चाहुल घडते!


पावसांचे अलवार थेंब या ओठांवर ओघळती
वाटॆ तुझाच स्पर्श होई, पण तो ही भासच ठरतो!!


ताटकळत कैक वेळा , वाट तुझी मी बघते
पण तू न ये सामोरा , मन उगा हताश होते !


न कळे मजला क मी, उगाच तुझ्यावर रुसते
मग येता तू सामोरा, गालातच खुद्कन हसते!!


हा भास तुझा होताना……..
आजही मला,
एकटच बसायला आवडत...
मन शांत ठेवून,
आठवणींच्या विश्वात रमायला आवडत...
कधी कधी हसायला,
तर कधी कधी रडायला आवडत...
अन कवितांच्या शब्दात,
फक्त तुलाच शोधायला आवडत...
माझ्या काही शब्दांन मोळे, हरवल मी तुला,
आज त्या शब्दांना आठवून,
स्वतःच स्वतःवर रागवायला आवडत...
अन तू नसतानाही,
ह्या आठवणींच्या विश्वात,
फक्त तुलाच पाहायला आवडत...

फक्त तुलाच पाहायला आवडत...
....................
मजला का बर वेड लावी तुझे पैंजण ............
छन छन छ्नक्तात तुझे पैंजण ............
हृदयाचे ठाव घेतात हे पैंजण ...........
निद्रेची वाट लावतात हे पैंजण ...........


मजला का बर वेड लावी तुझे पैंजण ............
तुझ्या आगमनाची चाहूल देतात हे पैंजण ........
चातकासारखी वाट पहायला भाग पाडतात हे पैंजण ......
बैचैन करून सोडतात तुझे हे पैजण ...........


मजला का बर वेड लावी तुझे पैंजण ............
गोर्यागुलाबी तुझ्या पादुकांचे सौंदर्य उजळवतात हे पैंजण ..........
स्वप्नी येवून रोमान्स करण्यासाठी भाग पाडतात हे पैंजण ........
तुज्या कांतीचा खरा आभूषण आहेत हे पैंजण ...........


सखे, नको अनवाणी होऊ कधी काढून हे पैंजण ...........
माझा जीव कि प्राण आहेत हे पैंजण ............
कारण तुला आवडतात म्हणून भेट दिले मी हे छन छन करणारे पैंजण ........
माझा तुझ्यावर जीव आहे एवढा जेवढा आहे तुझ्या जीवाचा भाग आहेत हे पैंजण ......
मजला का बरे वेड लावी तुझे पैंजण .....................
डोळ्याना सांगीतलय मी,

आज रात्र जागायची आहे....
निघालेल्या प्रत्येक अश्रुची कथा .
.आज तिला सांगायची आहे...



ऐकलय की,
तुझी आठवण येणार आहे.
आज परत मला,
ती माझ्यातूनच नेणार आहे...


डोळ्याना सांगीतलय मी,
आज तिला तिच्याकडुनच मागायची आहे,
पापण्यानो तुम्ही मिटू नका ,
आज रात्र जगायची आहे....


ए चंद्रा जरा एकडे बघ,
तिची आठवण येणार आहे...
तुझ्या सौम्य प्रकाश दे,
मला आठवणीत ती आज भेटणार आहे..


ए अश्रू, तू थांब रे,
इतके दिवस आलास ना..
माझा म्हणता म्हणता,
तू ही तिचा झालास ना...


तू आलास की,
पापण्या मग मिटायच म्हणतात..


ए पापण्यानो तुम्ही मिटू नका,
निघालेल्या प्रत्येक अश्रुची कथा ..
आज तिला सांगायची आहे...
डोळ्याना सांगीतलय मी,
आज रात्र जागायची आहे....
(¯`v´¯)
.`•.¸.•´
¸.•´.•´¨) ¸.•¨)
(¸.•´(¸.•´ (¸.•¨¯`* ♥ ♥~~
माझ्या या नजरेची भाषा तुला कळता कळेना.....
माझ्या या नजरेची भाषा तुला कळता कळेना,
काय चाललाय हा खेळ मन जुळता जुळेना,
माझ्या या वेड्या मनाला वेड का तुझे लागावे,
तू होणार नाहीस माझी या वेड्या मनाला कुणी सांगावे,


तू आहेस माझी स्वप्न परी,
नाही भाळलो फक्त तुझ्या रुपावरी,
फुलनार्या फुलाला घेऊन जाईल कुणीतरी,
मी मात्र तसाच राहील वार्यावरी,


येतील तुझ्या आठवणी एक एक करूनी,
ढाल हास्याची करूनी मन जळतय आतुनी,
फुलांचा गंध साठवून ठेवते मधुराणी,
तसाच तुझ्या प्रीतीचा गंध ठेवला आहे जतुनी,


माझ्या या नजरेची भाषा तुला कळता कळेना,
काय चाललाय हा खेळ मन जुळता जुळेना,
माझ्या या वेड्या मनाला वेड का तुझे लागावे,
तू होणार नाहीस माझी या वेड्या मनाला कुणी सांगावे...!!!
मज जाणवून गेले ...
गंधाळलेले वारे
सांगून काही गेले
स्पर्श तुझ्या मनाचा
मज जाणवून गेले ...

मुके शब्द वेडे
मौनात बोलून गेले
उरी दडलेल्या भावना
मज जाणवून गेले ...

गुंतलेले श्वास
वेड लावून गेले
हलकेच तुझी स्पंदने
मज जाणवून गेले ...

वाटेतले चांदणेही
वाट उजळून गेले
स्मित तुझ्या चेहऱ्यावरचे
मज जाणवून गेले ...
आहे बरेच काही सांगायला मला
काळीज ठेव तूही ऐकायला मला!

ठेवून ओळ गेली माझ्या वहीत ती
झाला उशीर थोडा वाचायला मला

असतो कधी इथे मी, असतो कधी तिथे
जावे कुण्या दिशेने शोधायला मला?

का रात्र मी अमेची जागून काढली?
येणार चंद्र नव्हता भेटायला मला

भेटायला हवे ते, का भेटले कधी?
आले नको नको ते बिलगायला मला!

हलकेच हात मीही हातात घेतला
होतेच शब्द कोठे बोलायला मला?
काल ती मला म्हणाली,
"तुला कधी स्वप्न तुटायची भीती नाही वाटत.......?
उंच मनोरे तू स्वप्नांचे बांधतोस..........,
ते कधी कोसळायची भीती नाही वाटत ...........?
...................
...................
मी फक्त हसलो, आणि तिला म्हटले
"अगं तुझ्या स्वप्नातच तर माझे जग आहे....
हे आयुष्यच स्वप्नांच्या हवाली केले आहे
त्यांच्यातच जगणे आणि
त्यांच्यातच विलीन होणे आहे....."


"केवळ एकच क्षण तुझ्यासोबत जगायचा आहे
मग नंतर.... तो स्वप्नांचा मनोरा
माझ्या सकट कोसळला तरी चालेल ..........!!!"


..............
................
"इतका कसा रे स्वप्नाळू तू ?........
इतकी सुध्दा स्वप्ने पाहू नयेत कोणाची.......
किती रमशील स्वप्नांच्या दुनियेत?"
"एक दिवस मी जाईन तुला सोडून.....
मग काय करशील हं?..... "
"आता अजिबात स्वप्ने पाहू नकोस माझी...... "


असं कालच माझ्यावर चिडून मला म्हटली होतीस
आणि............................
........................................
...
........................................
.......................................
........................................
......................
"काल देखील रोज रात्री प्रमाणे
तुझी असंख्य स्वप्ने .....
माझ्याकडेच पाठवली होतीस....
........
........
अगदी न चुकता..............." :)

Wednesday, April 11, 2012

तुझी लागता चाहूल,......
उमलते फुल,
होतो चिवचिवाट पाखरांचा, झाडा मोहोरांची झुळ.
आभाळाही होते पावसाचे खूळ,
संगे विजेला घेऊन, जाते माती आनंदून
दरवळतो सुगंध असा काही मातीचा,
जणू एकसंध कुंभ फुटला अत्तराचा.
फांद्याचा घेती पाखरे आडोसा,
अनवाणी पावलांचा, चिखली उमटतो ठसा.
धरत्रीला देते कोणी अन्कुरांचा वसा,
विहार करी आनंदाने, पाण्यातला मासा.
चांदण्यांचेही मग सुटते अवसान,
भाळतो चंद्र तुझ्यावरी, विसरतो भान.
भरती सागराला येते, नदी वाहते बेभान,
कोसळतो कुणी तारा, त्याचे चुकुनी ईमान.
ध्रुव लावी ध्यान एका जागेवर बसून,
एक एक तारा येतो, खाली निसटून.
तुझ्या अंगावर पावसाचे, बाष्प दिसते उठून,
निसर्ग येतो सारा तुझ्या रुपी बहरून.
तुझ्या कांती समोर आता, लाजते बघ उन.
तुझ्या रुपातूनच घेतो श्वास, आणि जगतो आनंदून.
राहत नाही जागेवर कुडीतला प्राण.
तुझी लागता चाहूल,
उमलते फुल.
विज म्हणावे तीला की निज म्हणावे
लख्खकन चमकते,उर्मिना जागवते
झरझर झपाझप.कडकडुन भेटते
नसानसाना जागवते,उतावीळ होउन
कागदावर उतरते,कागदाची मालकी घेते ती

कधी अश्रुच घेउन येते.स्वत:च ओलिचिंब होते ती
मलाही नखशिकांत ,भिजवते ती
तरसते , तरसवते ती
बरसते , उधाणते भरात ती

कशीही येउ द्या ,केव्हाही येउ द्या
अंतरंगी उसळते.शब्दांच्या अंगणात
धुमशान खेळते,रिंगन घालुन मिरवते ती

अधीर स्वप्नाना कवेत घेते ती
खोलात जाउन,रुतुन निघते ती
कविता माझी,अशीच येते
माझीच होउन,फ़ुलते ती
वेड्या मना(तला) तू . . .

मन माझे तुला शोधी
तुझे मन कुणा?
माझे नयन तुला पाहती
तुझे नयन कुणा?
माझे हृदय तुझ्यासाठी
तुझे हृदय कुणा?
आहेस तू? मी कुठे?
एकदा तरी संगण
थोडा तरी समजून घे
तू मला शब्दाविना
अजून तुला भेटलेही नाही
तरी वाटतोस 'माझा' मला
भेट एकदा होणारच आपली
तू मला ओळखशील ना?
मी वाट बघेन तुझी
तू नक्की येशील ना?
'मी अन तू राज राणी'
असं तू तेव्हा म्हणशील ना?
आठवणीत तुझ्या कोमेजेन रे मी
मग बहर या आनंदाचा देशील ना?
मला आठवण येते तुझी
तुलाही माझी येत असेल ना?
कि नाहीस तू? माझ्यासाठी?

ए? असं बोलू नकोस ना!
काळात कसं नाही तुला माझं मन?
कसं करमत माझ्याविना ?
माझ्यासाठी तू तुझ्यासाठी मीच
तुला खरं वाटत नाहीय ना?
मी तुझीच आहे रे 'वेड्या'
तू आल्यावरच 'बघना' !!!
नजरेने तुझ्या मनी स्पर्श असा केला,
हरली मी.....अन् तू माझा दरबार नेला...
भेटुनी तुला आज हे सुखचैतन्य आले,
तुला स्पर्शुनी....आज मी सुंदर झाले....

रोजचेच वारे.....आज खूप बेभान झाले,
पायवाट माझी आता....तुझ्यासंगी चाले,
पाखराला आज ह्या घरटे मिळाले,
तुला स्पर्शुनी....आज मी सुंदर झाले....

मनी स्वप्नांचे मी एक घरकुल बांधले,
क्षण क्षण मी तुझ्यात चिंब चिंब नाहले,
शिंपल्यात तुझ्या...आज मी मोती जाहले,
तुला स्पर्शुनी....आज मी सुंदर झाले....

माझ्याच चंद्राची आज मी चांदणी झाले,
अपुरा तू नी मी...मी अर्धांगी झाले,
स्वप्न माझे दुरावलेले...आज सत्यात आले,
तुला स्पर्शुनी....आज मी सुंदर झाले....

जगू दे दोन क्षण मज आता...श्वास माझा चोरू नको रे,
प्रीत माझी समजुनी....तू आता परतू नको रे,
अनोळखीच सुख तसे मज...भेटाया त्यास आतुर झाले,
तुला स्पर्शुनी....आज मी सुंदर झाले....

तुला स्पर्शुनी....आज मी सुंदर झाले....
इतकं सुंदर असूच नये एखाद्यानं,
नजर लागायची भीती असते...
पाहुनी आज कळले मला
परमेश्वराची कलाकृती किती असते....


... सौंदर्याने तुझ्या.....आज तू....

शब्दांना हि निशब्द केलंस,
त्याच सौंदर्याला... आज तू....
सौंदर्याचं उदाहरण दिलंस.


तुझ्या डोळ्यात रात्रीची निरागस शांतता आहे,
तुझ्या हसण्यात एक "विलक्षण" शक्ती आहे,
उगाच नाही मिळत हे असं...त्यातही देवाची भक्ती आहे...
क्षितिजा पलीकडेही बरेचसे क्षितीज
अजूनही पाहणे माझे बाकी आहे..
मला खूप वाटत...
मला खूप वाटत की तुला पल्सरवरून फ़िरवाव,
मरीन ड्राईव्हच्या कट्ट्यावर गप्पा मारत बसाव,
'राणीचा हार'बघून तुला प्रसन्न वाटाव,

माझ्या राणीचा चेहरा बघून माझही मन हसाव!!
मला खूप वाटत की तुला मुव्हीला न्याव,

मुव्ही बघून रडताना,माझ्या खान्द्यावर तुझ डोक असाव,
येताना तुझ्याबरोबर candle light dinnerला जाव,
शेवटी घरी सोडताना शेवटपर्यन्त TATA कराव!!


मला खूप वाटत की अशाच कविता करत राहाव,
तुझ्या सगळ्या आठवणीना लहान बाळासारख जपाव,
ह्या आठवणीनी मन नेहमीच पुलकित व्हाव,
आकाशातला एक तारा आपला असावा,
थकलेले डोळे उघडताच चमकुन दिसावा,
एक छोटे जग प्रत्येका जवळ असावे,
जगाच्या या गर्दित कुणीच एकटे नसावे.....
क्षितीजापलीकडॆ पाहण्याची दॄष्टी असेल,
तर क्षितीज नक्की गाठता यॆत.


आपल्या रक्तातच धमक असॆल,
तर जगंही जिंकता यॆत.


आपले क्षितीज हे आपणच ठरवायचं असतं,
त्याच्या पलीकडे पाहण्याचं धाडस एकदा तरी करायच असतं.


असतॆ आपल्या रक्तात जिद्द व ताकद,
त्या ताकदीला एकदातरी अनुभवायचं असतं
उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी
नजरेत सदा नवी दिशा असावी
घरट्याचे काय आहे बांधता येईल केव्हा ही
क्षितीजांच्याही पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी.......!


वर्तमानात जगण्याची कला भुतकाळातुन दाखवतात.

(¯`v´¯)
.`•.¸.•´
सारे कळत नकळतच घडते -----------
ढग दाटताच तुझ्या आठवणींचे,
मन आभाळा सारखं भरुन येतं ...

जसा पावसासाठी चातक पक्षी,
तसं मन तुझ्या भेटीसाठी आतुर होतं...

विरहाच्या उन्हात कोमेजलेलं मन,
तुझ्या सहवासातील वर्षावाच्या जाणीवेने फुलुन येतं...

मोर जसा पावसाच्या स्वागतासाठी पिसारा फुलवून नाचू लागतो
माझंही मन तुझ्या दर्शनाने असंच आनंदाने बहरतं ...

तुझ्या प्रितीच्या सरींमध्ये भिजून...
मन धरती प्रमाणे हिरवंगार होऊन जातं,

मात्र पावसानंतर जेव्हा तेच विरहाचं ऊन पसरतं...
वेडं मन पुन्हा एकदा तुझ्या भेटीची वाट पाहू लागतं —
प्रेम हे प्रेम आहे..


किती प्रगल्भित हे,अडीच अक्षर आहे,


नाही बघत कोण अडाणी,कोण साक्षर आहे;


कधी,कुठे,कोणावर होईल,काय नेम आहे;


सर्वस्व ओवाळून टाकणारं,प्रेम हे प्रेम आहे.


... हळुवार असलं तरी आत्मिक रित्या शक्तिमान

आहे,

ओघीत असलं तरी,नैतिक रित्या नीतिमान आहे,

यात कसलं स्थैर्य वा काय क्षेम आहे;

सर्वस्व ओवाळून टाकणारं,प्रेम हे प्रेम आहे.

कायम ज्यात विरह करावा लागतो सहन,

बोलता माणूसही,विचारात पडतो गहन;

मिळालं वा नाही मिळालं,तरी अश्रुन्वित थेंब

आहे;

सर्वस्व ओवाळून टाकणारं,प्रेम हे प्रेम आहे.

ज्यात दिवस जातो तंद्रीत आणि रात्र जाते

जागीत,

ज्यात काहीच ठाम नसते, स्वतःचेच भागीत;

निव्वळ ठोक ताळ्यावर,सर्व काही जेम तेम

आहे ;

सर्वस्व ओवाळून टाकणारं,प्रेम हे प्रेम आहे.

मानलं तर सदैव, हुकुमी एक्का आहे,

जिंकतो तो ज्याचा, इरादा पक्का आहे;

पत्त्यांनाही मागे टाकणारा हा,आगळाच गेम

आहे;

सर्वस्व ओवाळून टाकणारं,प्रेम हे प्रेम आहे.
तू आणि मी..
मेहेंदी कशी खुळी रंगावी
रातराणी सम रात्र गंधावी

होता साक्षीस रातीचा चांदवा
प्रीतफुलांचा फुलला नव ताटवा

होती ती पहाटच गुलाबी ओली
गर्द धुक्यात कुठे अवचितच विरली

झाकून पापण्या नयनांत वसलो
आसुसलेल्या मुक्त स्पर्शात जगलो

थेंब टपोरे बोलले केसावरी
सूर अमृती सजले ओठावरी

कधी राग थोडा लटके रूसवे
होती पुन्हा नवनवीन आर्जवे

आजही तेंव्हासारखेच.....

लपू दर्पणी विसावू जरासे पुन्हा
नवी साद घालू एकमेका पुन्हा

साकारावे आज नवस्वप्न पुन्हा
जगावे त्याच वेडात आज पुन्हा  पुन्हा  पुन्हा .............................
तू भेटलीस......
तू भेटलीस..अन्
आयुष्यच बदलल..!

तशी तुझी अन् माझी
भेट पहिलीच..
तरीही तुझ्या डोळ्यात..
जन्माची ओळख पटली..
दोन अनोलख्या जीवांची
कशी अगदी सहज..
जोडी जुलली..!

प्रेम.. नुसता एक शब्द..!
स्वप्न .. नुसत एक खूळ..!
पण..
तू भेटलीस..
मग कलल..
प्रेम काय असत..!
स्वप्न पाहन काय असत..!
कुणालातरी..
कुशीत घेन.. काय असत..!

खरच..
तू भेटलीस.. अन्
तुझ्या श्वासासोबत..
माझ आयुष्य जगू लागलो..!
स्वप्नाच्या पालीकडेल्या जगात..
तुझ्या सोबत हरवू लागलो..
काही क्षण...काही क्षण येतात जीवनात ,
का आले? म्हणून घाबरायच नसत..
काही व्यक्ति भेटतात जीवनात ,
का भेटतात ?अस विचारायच नसत..
असच जीवन जगायच असत....


काही धागे गुन्तात रुद्यात,
का गुंतले? म्हणून तोडायचे नसतात..
काही भोग भोगावेच लागतात,
का भोगायचे? म्हणून रडायच नसत..
असच जीवन जगायच असत....


काही क्षण हसरे तर काही दुःखाचे
असे का? म्हणून विचारायच नसत..
काही क्षण पालटतात,
का पालटले? म्हणून विचारायच नसत..
असच जीवन जगायच असत ...


जीवन हे एक काचेच भांड असत ,
त्याला तडा लागुन फूटल तर..
का फूटल? म्हणून विचारायच नसत..
असच जीवन जगायच असत....
पत्रात मावणार नाही,
इतके प्रेम करतेस..!
वाट नसून ओळखीची,
माझ्या कडे धावतेस..!!

धावणं नाही होत कमी,
मनी प्रीतीची ओढी..!
लिहिल्या शिवाय कळेल मला,
हीच माझी हमी..!!

कधी पडशील धावताना,
विचार मनी आणू नकोस..!
ओढ तुझी उत्कट,
मीही तुझाच विसरू नकोस..!!

प्रेमाशिवाय जगणं नाही,
मनी प्रीतीचा सागर..!
कितीही असला दुष्काळ,
प्रीतीची भरते घागर..!!

किती असतील गुंते,
तमा बाळगू नकोस..!
सोडवू सर्व प्रेमाने,
विश्वास मनचा सोडू नकोस..!!

असेल नेहमी माझी साथ,
जिंकेन - हरेन विचारू नको..!
जगावं आयुष्य आनंदे,
क्रोधाची माया जमवू नको..!
कुठुन तरी मनात माझ्या तुझी आठवण आली,


कुठुन तरी मनात माझ्या तुझी आठवण आली,

स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली ...

आठवण तुझी नसानसांना धक्का देउन जाते,

मन कधी प्रेमाचे कधी विरहाचे गीत गाते,

रोजच्यासारखीच आठवण तुझी नवीन वाटून आली,


स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली ...

वारा तुझा स्पर्श बनून जवळ येतो माझ्या,

क्षणात करतो आपल्या सा-या जुन्या आठवनी ताज्या,

वा-यालाही घेउन श्वासावाटे काळजापर्यंत गेली,

स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली ...

घुसळून टाकलं मनं तिने जसं जमेल तसं,

मलाच सुचेना तिला आता बाहेर काढू कसं,

याच विचारात दिवस गेला, संध्याकाळही झाली,

स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली ...

संध्याकाळी वाटलं थोडं बरं वाटेल आता,

मित्रांबरोबर बसून थोड्या टाकू म्हटलं टापा,

चौपाटीवर गेल्यावर ती सांज डोळ्यापुढे आली,

स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली ...

किती पाहशील अंत आता, परतून ये लवकर,

तुलाही ऐकू येत असेल माझ्या मनामधली घरघर,

जाणवतय मला तुझीही अवस्था माझ्यासारखीच झाली,

माझ्या आठवणीने, तुझी सुद्धा पापणी ओली केली..!!!!!!
तुझा हात माझ्या हातात


•♥• निराशेच्या रात्रीत •♥•
•♥• आशेच्या किरणात •♥•
•♥• असावा तुझा हात •♥•
•♥• ...माझ्या हातात... •♥•
!~•♥•~!!~•♥•~!! ~•♥•~!!


•♥• शांत सावलीत •♥•
•♥• रख रखित उन्हात •♥•
•♥• असावा तुझा हात •♥•
•♥• ...माझ्या हातात... •♥•
!~•♥•~!!~•♥•~!! ~•♥•~!!


•♥• यशाच्या शिखरावर •♥•
•♥• अपयशाच्या उम्बरठयावर •♥•
•♥• असावा तुझा हात •♥•
•♥•... माझ्या हातात... •♥•
!~•♥•~!!~•♥•~!! ~•♥•~!!


•♥• दुखाच्या ओझरत्या स्पर्शात •♥•
•♥• सुखाच्या ओसंडत्या हर्षात •♥•
•♥• असावा तुझा हात •♥•
•♥•... माझ्या हातात... •♥•
!~•♥•~!!~•♥•~!! ~•♥•~!!


•♥•आयुष्यात येणा-या प्रत्येक क्षणात•♥•
•♥• आणि जाणा-या श्वासात सुद्धा •♥•
•♥• असावा तुझाच हात •♥•
•♥• माझ्याच हातात •♥•
!~•♥•~!!~•♥•~!! ~•♥•~!!
ती त्याला नेहमी ओरडते ...

"का रे तू अस करतोस ?
मी रोज खूप बोलते, अन तू नुसताच शांत असतोस ..
मी तुझी काळजी करते, अन तू हि माझी काळजी करतोस...
काहीही झालं मला, तर पूर्ण जग डोक्यावर घेतोस...




मी रोज तुझी वाट बघते, अन तू रोज उशिरा येतोस..
office असो, कि रात्री online,
तू नेहमीच का अस करतोस?....
का कळत नाही तुला माझ्या वागण्याचा अर्थ,
कि कळून हि न कळल्या सारखा करतोस?....


मनातल्या भावनांना माझ्या,
का समजून हि नसमजल्या सारखा करतोस?...
का करतोस रे अस तू ?
माझा असून हि का नाहीस रे माझा तू ?.... "


हे बोलून तिझे डोळे पाणावतात,
आणि तो तिझे डोळे पुसतो,
तिला पाहून हळूच हसतो...
अन तिला जवळ घेत घेत बोलतो..
"शब्दात सगळ कस सांगू ग तुला,
मनात आहे खूप काही...
वागण्यातून सांगतो जे ,
तुला ते कळत नाही...


चल शब्दात न सांगितलेलं,
आज मी तुला सांगतो,
मनातला गुपित माझ्या ,
आज तुझ्या पुढे मांडतो,
कळत नकळतच जुळल,
नात आपल्या प्रेम, आज मी हे मानतो..
अन तुझ्यावर खरच ग खूप प्रेम करतो मी ...
घे आज मी हे तुला सांगतो...
घे आज मी हे तुला सांगतो... "


हे ऐकून ती स्तब्ध होते,
अन तो तिला मिठीत घेतो..
आयुष्भर साथ देण्याच वाचन,
आज तो तिला देतो..
आयुष्भर साथ देण्याच वाचन,
आज तो तिला देतो..
मी तिला विचारले किती गं करतेस माझ्यावर प्रेम,हसत म्हणाली माझ्या नजरेला जरा वाचत जा...


मी विचारले किती गं असे भेटायचे चोरून चोरून,
ती म्हणाली प्रेमात थोडासा धीर धरत जा...


मी म्हणालो आता मला तुझ्या साथीची गरज आहे,
ती म्हणाली त्यासाठी देवासमोर रोज हात जोडत जा...


मी म्हणालो खूप ओझं झालंय एकाकीचं आता,
ती म्हणाली अरे वेड्या मग आठवणी थोडंसं रडत जा...


मी म्हणालो अरे पापण्या ओल्या होतात विरहात तुझ्या,
ती म्हणाली मुखवटे घालून थोडंसं हसत जा...


मी म्हणालो ऋतू सुद्धा माझ्यावर हसतो आहे,
ती म्हणाली अरे मग एक छानसी गझल ऐकत जा...


मी विचारलं असतेस कुठे सध्या तू,
तेव्हा मात्र ती म्हणाली माझ्या श्वासांना तुझ्यातच कुठेतरी शोधत जा..


मी विचारलं हि कुठली रीत तुझी प्रेम करण्याची,
ती म्हणाली अरे प्रेमात कधी असाही एकमेव अनुभव घेत जा..


मी विचारलं आता किती वाट बघायची तुझी सखे,
ती म्हणाली नेहमीच तू तरसवतोस मला आता तू ही तरसून बघत जा.
प्रेम करणे हा काही गुन्हा नाही..

मी तुला आवडणे,तू मला आवडणे..
हे काही पाप नाही..
तुजे माजे प्रेम खोटे नाही..
तुजे माजे नाते असच" नाही..




कोणतेही संकट आले तरी ..
घाबरून जाऊ नको..
कोणतेही अडचण आली तरी..
मी आहे तुज्या बरोबर विसरू नको ..


परीक्षा घ्यायलाच येतात ..
हि संकटे,या अडचणी..
पण आपण मात्र पास व्हायचे..
विश्वास ठेव माज्यावर..
आता नाही मागे सारायचे..


मी समजू शकतो तुजे मन ..
मी समजू शकतो तुजी मजबुरी..
पण दुरावा नाही सहन करू शकणार..
पण हृदय तुटलेले नाही सहन होणार..


म्हणूनच सांगतो..
प्रेम हि गोष्ट जगात सर्वात उच्च आहे..
प्रेमाचे आपले हे नाते पवित्र आहे..
नको करू कसलाही अविचार..
नको करू पुढचा विचार..
होईल सगळे नीट नाही म्हणणार मी..
साथ दे अशीच..
सगळे नीट करून दाखवेन मी..
साथ दे अशीच..
सगळे बंध तोडून येईन मी..


फक्त एकच..
अश्रू तुज्या डोळ्यात पाहवणार नाही..
प्रोमीस कर ,
तू रडणार नाहीस...
माने दुरावलेली चालणार नाही..
प्रोमीस कर..
तू मला कधी सोडणार नाही..


मी आहे न,नको काळजी करू..
मी आहे न,नको विचार करू..
मी आज हि तुजच आहे,
नेहमी तुजच राहीन.
मी आज हि तुज्यावर प्रेम करतो..
नेहमी तुज्याव्रच प्रेम करीन..
विश्वास ठेव..

फक्त विश्वास ठेव
तो: काय ग...
आज रडलीस वाटत?
कोणाशी तरी भांडलीस वाटत?
ती: तुला कस कळाल?
तो: हो कि नाही ते सांग...
ती: हो रे....
पण तुला कस कळाल?...
सांग ना...
तो: कळाल कस तरी...
ती: सांग ना ...
कस कळत रे तुला,
माझे डोळे पाणावलेले ते?...
कस कळत रे तुला,
आज मी खूप हसली ते?...
कस कळत रे तुला,
आज मी कोणाशी तरी भांडली ते?...
अन कस कळत रे तुला,
आज मी खूप खूप रडली ते?....




कस कळत रे तुला माझ मन?...
कशी कळते रे तुला,
तुझी येणारी ती आठवण?...
कस कळत रे तुला,
आज मी आहे खूप उदास?...
अन कस कळत रे तुला ,
माझ्याकडे आहे आज ,
तुला सांगायला काही तरी खास?...
सांग ना...
मला भेटताच,
कस ओळखतोस रे तू हे सगळ?...
सांग ना...
कस कळत रे तुला, माझ्या मनातल सगळ?...
तो: आग वेडे...
मला नाही तर कोणाला कळणार....
तुझ हे कोवळ मन,
माझ्याशिवाय कोण जाणणार...
प्रेम करतो न ग मी तुझ्यावर,
मग तुझ्या ह्या मनाला,
मी नाही तर कोण सांभाळणार...
सांग ना...
कोण सांभाळणार.. :)




हे ऐकून ती हस्ते,
अलगद त्याच्या मिठीत जाते...
प्रेमाचे ते गोड शब्द बोलते...
अन आयुष्याची सुरेल स्वप्न रंगवत सुटते...
आयुष्याची सुरेल स्वप्न..


ती रंगवत सुटते..
'लक्ष कुठाय तुझ ?'


तुझा प्रश्न


'अं?काही नाही '


माझ उत्तर


'जा,मी नाही बोलत'


तू म्हणतेस

फुगलेले तुझे गाल पाहून

मी सुखावतो

'बोल ना'

म्हणुन विनवतो



'बर बर 'सांगायला जणू

ओठ तुझे विलग होतात

'मी नाही जा'

अरे!भलतेच शब्द बाहेर पडतात

मला आणखी गम्मत वाटते

मग तुझ ख़ास ठेवानितल

नाव घेउन

'राणी बोल ना प्लीज़ '

म्हणतो

मग तू उठून चालु लागतेस

आणि मी तुझ्यामागुन...

तू दणादणा पाय आपटत निघतेस

आणि मी मधुनच रस्त्याने

एखाद फूल खुडतो

तू रागातच

मी सुखातच

शेवटी तुझ एक पाय जोरात

माझ्या पायावर पडतो

आणि माझ्या मुठीतल ते फूल

जमिनीला मीठी मारत

आणि तू मला... अचानकच ...




माझ्या आयुष्यात तुझ येण,


माझ्यासाठी अगदी खास आहे,


मी कायमची तुझीच राहावी,


हीच मनात आस आहे.


नेहमी मला केवळ,


तुझ्या भेटीचीच ओढ असते,

कितींदाही भेटलो तरीही,

मनी ती एकच हुरहूर असते,

तुझ्या सहवासात मी,

स्वत:लाच हरवून बसते,

तुझ्या होणाऱ्या त्या स्पर्शाने,

मी पूर्णपणे मोहरून जाते.

मिठीत तुझ्या आल्यावर,

मन तुझ्यातच रमून राहते,

तू काहीच बोलत नाही,

आणि तुझा स्पर्श सारे सांगून जाते.

तुझ्या स्पर्शाच्या भाषेला मग

मन हि माझे फितूर होते,

तू भेटून गेलास तरी परत,

तुला भेटण्यासाठी आतुर होते.

तुझा आठवणीत आजकाल,



मी एवढी गुंतून जाते,

रात्री झोपेतही केवळ तुझ्या,

भेटीचीच स्वप्ने पाहते...!!!
कोणाची तरी ओढ लागली......की ओढाताण होतेच !

अश्रु का ओघळावे
गालात फ़क्त खळीने फ़ुलायचे
हे डोळ्यांनाही न समजावे ?

तुझ्या नाजुकपणावर लिहायचं म्हणजे,
मला खुपच अवघड वाटतं.
कविता-चारोळ्या तर लांबच,
’नाजुक’ शब्द सुद्दा जरा जड वाटतं.

मोकळ्या हवेचा श्वास दे,
मला पुन्हा एकदा जगण्याचा भास दे.
आज चांदण्याही विजलेत बघ,
त्यान्हाही चमकण्याचा ध्यास दे.

कोणाची तरी ओढ लागली
की ओढाताण होतेच !
वणवा लागतो मनाला,
नि आयुष्याचे कोरडे रान होते.

कोणाची तरी ओढ लागली......की ओढाताण होतेच !
मला आवडेल तुझी वाट पहायला...

फुलपाखरांसोबत स्मृतींच्या पंखांनी उडायला

आभाळभर पसरलेल्या क्षणांना एकसंध शिवायला,

मला आवडेल तुझी वाट पहायला...

तुझे पाऊलश्वास मन लावून ऐकायला,

तू आल्यावर तुला एकटक पहायला

''किती बोलतोस रे तू? जरा धीर धर

बोलण्याआधी थोडा विचार तरी कर''

पण नाही; तू म्हणतोस:

''माझं असंचे!

मला आवडतात मनातले भाव पटकन सांगायला! ''

मी हसते, अन. मनातंच म्हणते,

'मला मात्र आवडेल हं तुझी वाट पहायला'...

रात्र झाली, की तुझ्या स्वप्नांमधे हरवून जायला,

तुझ्या कुशीत सारी दुःख विसरायला...

हातात हात मात्र ठेव हं कायमचा!

कारण मला आवडेल, जन्मभर ''फक्त तुझीच'' बनून रहायला

मला आवडेल तुझी वाट पहायला...!!!

Monday, April 9, 2012

      त्या प्रेमाची संवेदना जाणून घेणे मला पसंद नव्हत

पण आज मी त्या प्रेमाच्या प्रत्येक कश्यासाठी आतुरलेला असतो

म्हणूनच या प्रश्नाचे उत्तर शोधतो

की मी का बर तुझ्यावर एवढ प्रेम करतो?





त्या चंद्रावरही डाग आहेत हे मला कधी जाणवलच नव्हत

पण आता तो प्रत्येक डाग ही मला सुंदर भासतो

म्हणूनच का बर मी तुझ्यावर प्रेम करतो?



त्या सूर्याचे तेज मला कधीच उमगाल नव्हत

पण आता त्याच्या प्रत्येक किरणात मला तुझा सहवास भासतो

म्हणूनच का बर मी तुझ्यावर प्रेम करतो?



त्या फुलाच आणि भवरयाच नात खरच मला भावल नव्हत

पण आता त्या वेड्याला पाहून मी हसन देखील विसरून जातो

म्हणूनच का बर मी तुझ्यावर प्रेम करतो?



त्या कमळावरच्या पानावरचा थेंब पहाणे माझ्यासाठी नवल नव्हत

पण आता मात्रा त्या प्रत्येक थेंबात मे माझ अस्तित्व शोधत फिरतो

म्हणूनच का बर मी तुझ्यावर प्रेम करतो?



त्या गर्दीत चालताना चेहरे पाहाण कधीच गरजेच नव्हत

पण आता प्रत्येक चेहर्यात केवळ तुझाच चेहरा शोधत फिरतो

म्हणूनच का बर मी तुझ्यावर प्रेम करतो?





आरशात पाहाण मला कधीच सुखवत नव्हत

आता माझ्या प्रतिबिंबात ही मी केवळ तुझच रूप शोधतो

म्हणूनच का बर मी तुझ्यावर प्रेम करतो?



त्या वाऱ्याच्या स्पर्शने मला कधीच मोहक वाटल नव्हत

आता तोच गार वारा प्रत्येक क्षणी तुझ्या स्पर्शाची जाणीव करून देतो

म्हणूनच का बर मी तुझ्यावर प्रेम करतो?



त्या आकाशातला दूरचा तारा पाहाण मला कधीच पसंत नव्हत

आता त्या त्याशी देखील संवाद साधण्याचा मी करतो

म्हणूनच का बर मी तुझ्यावर प्रेम करतो?



ह्या हृदयाच स्पंदन मी कधी ऐकल नव्हत

पण आता त्या प्रत्येक स्पंदनातून तुझेच नाव ऐकतो

म्हणूनच का बर मी तुझ्यावर प्रेम करतो?

आठवणींच्या मागे धावलो
कि माझं असंच होतं.
आठवणीं वेचत जाताना,
परतायचं राहुन जातं.





जळुन तृप्त होतो गुलमोहर,
तरी पाउसाची भेट नाही.
गुलमोहराचं जळणं,
कधीच का पावसाला कळत नाही





पाय मुकेच चालतात,
परी मन आठवणींना ठेचाळते.
नजरे समोर गाव तुझे अंधुक,
अन ही वाट स्वप्नांकडे जाते.





आपली पहीली भेट.. नवी ओळख..
एक सुगंध मनात ठेऊन गेली.
तसं पाहीलं तर अनोळखीच होतो आपण,
तरी एक बंध मनात ठेऊन गेली.







प्रेम म्हणजे काय…
हवा असलेला तिचा नि:शब्द सहवास,
नी, तिनं माळलेल्या गज-याचा
मी ऊर भरुन घेतलेला श्वास.







हिरवळीवर धावणारी पायवाट,
किती अस्मितेने वागते.
हिरवळ ओसरली की,
निपचीत पडुन पुन्हा वाट पाहते.







शब्द होऊ पाहणा-या भावनांची
जेव्हा गळ्यापर्यंत येऊनही कत्तल होते,
तेव्हा कुठे जाऊन
एक कविता जन्माला येते.



तुझा 'अनोळखी'पणा ही
आता ओळखीचा वाटायला लागला आहे.
अनोळखी 'तु' असलीस तरीही
तो माझ्या ओळखीचा झाला आहे.





तुझ्या आठवणींचा एक थेंब
नेहमी माझ्या डोळ्यांच्या कोप-यात असतो,
पानांवर दव चमकावे
तसे नजरेत माझ्या चमकतो.



खुणवीत आहे काही
तिळ तुझ्या गालावरचे,
मलाच समजत नाही
ते शब्दात कसे सांगायचे.







फुल कधी म्हणत नाही की
सुगंध नेहमी वा-यावरच फिरतो,
कारण, त्यालाही माहीत असतं
कितीही दुर गेला तरी तो फुलाचाच असतो.



पानांवर सठलेल्या थेंबासारखे
रंग मैत्रीचे,
रोजरोज भांडुण घट्ट होणारे
हे बंध मैत्रीचे.







असे कितीतरी बंध
जुळले असतील तुझ्या आयुष्यात…
एक बंध माझ्याही मैत्रीचे
जपशील का शेवट पर्यंत तुझ्या मनात…







कोवळ्या उन्हात न्हाऊन
नखशिखांत तु नटलेली,
जणु, सोज्वळ ती फुलराणी
ओली आताच फुललेली.







पिकलेल्या पनाला
वा-याची तमा नसते.
म्हणुनच कदाचीत
ते जास्त सळसळते.





एकांताला सोबत घेऊन
समुद्र किना-यावरुन चालताना,
वाळुनेही जागा सोडावी पायाखालुन ?
लाट माझ्यापासुन ओसरताना…!!!





संध्याकाळची वेळ
सुर्य दमुन अस्ताकडे झुकलेला,
नि:शब्द सांगुन जातो
'उगवणार आहे मी पुन्हा एकदा मावळायला'







सगळंच बरोबर करताना
काही चुका करुन गेलो,
त्यात न विसरना-या व्यक्तीलाही
मी आज विसरुन गेलो,







आठवणींतल्या आठवणींना
हळुच आठवायचं असतं.
डोळे पान्हावलेले असले तरी
मंद गालातल्या गालात हसायचं असतं.







आठवणींचा हा गुच्छ,
कोप-यात मनाच्या साठवण्यासाठी.
सोंग करुन विसरल्याचं,
पुन्हा एकदा आठवण्यासाठी.







माझ्या कविता-चारोळ्या म्हणजे,
माझ्या भावना, माझे अनुभव.
माझ्या मनाच्या पात्यावर साठलेले,
माझ्याच आठवणींचे दव.





माझ्या ओंजळीतुन
तुझ्या आठवणींची नेहमी पिसं मी उडवावी…
अलगद अशी उडुन ती,
पुन्हा माझ्याच पदरत पडावी…







माझ्या ओठावरचं हसु,
आहे साक्ष तु आठवल्याचं.
आठवणी तुझ्या आठवुन,
क्षणभर जगाला विसरल्याचं







थंडीचं एकदा
प्रेम जडलं पहाटेवर,
आजही ते एकत्र चालताना दिसतात
सकाळच्या वाटेवर.







ती वा-याची एक झुळुक
हळुच शेजारुन जाणारी,
जाता जाता पाहत वळुन
मंद गालातल्या गालात हसणारी.





दिवसागन श्वास नविन
श्वासागन भास नविन
पण तुझ होकारानेच सुरु होइल
माझ्या आयुष्याचा प्रवास नविन !!!





कोमल तुझ्या चेहर-या वरुन
अश्रु का ओघळावे
गालात फ़क्त खळीने
फ़ुलायचे हे डोळ्यांनाही न समजावे ?





तुझ्या नाजुकपणावर लिहायचं म्हणजे,
मला खुपच अवघड वाटतं.
कविता-चारोळ्या तर लांबच,
'नाजुक' शब्द सुद्दा जरा जड वाटतं.





मोकळ्या हवेचा श्वास दे,
मला पुन्हा एकदा जगण्याचा भास दे.
आज चांदण्याही विजलेत बघ,
त्यान्हाही चमकण्याचा ध्यास दे.





कोणाची तरी ओढ लागली
की ओढाताण होतेच !
वणवा लागतो मनाला,
नि आयुष्याचे कोरडे रान होते.



तू बोलत नाही काही
अन् मी ही बोलत नाही
पण क्षण आठवांचे
गुणगुणतात काही


अबोल शब्दातही
प्रीतीचा एक अर्थ आहे
माझ्या मनाच्या स्वप्नासाठी
माझे प्रेम नि:स्वार्थ आहे...............



जीवन कसे पक्ष्यां सारखे असावे
कुठे ही उडावे आणि कसे ही जगावे
आणि मरताना देखिल कधी कुणावर
आपले ओजे न देता जावे


माझ्यासाठी प्रेम म्हणजे
मोठ्ठ कुतूहल आहे
पडले नाही तरी लागते
अशी एक चाहूल आहे