NiKi

NiKi

Wednesday, April 11, 2012

कोणाची तरी ओढ लागली......की ओढाताण होतेच !

अश्रु का ओघळावे
गालात फ़क्त खळीने फ़ुलायचे
हे डोळ्यांनाही न समजावे ?

तुझ्या नाजुकपणावर लिहायचं म्हणजे,
मला खुपच अवघड वाटतं.
कविता-चारोळ्या तर लांबच,
’नाजुक’ शब्द सुद्दा जरा जड वाटतं.

मोकळ्या हवेचा श्वास दे,
मला पुन्हा एकदा जगण्याचा भास दे.
आज चांदण्याही विजलेत बघ,
त्यान्हाही चमकण्याचा ध्यास दे.

कोणाची तरी ओढ लागली
की ओढाताण होतेच !
वणवा लागतो मनाला,
नि आयुष्याचे कोरडे रान होते.

कोणाची तरी ओढ लागली......की ओढाताण होतेच !

No comments:

Post a Comment