NiKi

NiKi

Saturday, April 21, 2012



षण भरांच्या मिलनाची
वाट पाहते युगांन पासूनी
कशी ही ओढ अंतरीची
साद तुझी ऐकण्या साठी
अधीर आहे किती मी
दिवस सरला, रात्र गेली
घटका, पळ, सरता-सरता
अनेक वर्ष पण निघुन गेली
साद राहीली फक्त तुझ्या ओठा वरती
वाट पाहीन मी अजुन तुझी
सांग कशी ही ओढ अंतरीची
एक क्षण तुला पाहण्या साठी
किती वाट पाहते मी
प्रतिक्षे मधे अधीर होतात डोळे
वाहते अश्रु धारा समवेत
अंतर मधले तेच रा‍हीले
वाट पाहीन मी अजुन तुझी
सांग कशी ही ओढ अंतरीची
माझ्या मनीची ओढ तुजला
आणेल जरूर माझ्या पाशी
किती ही दूर असला तरी
सदैव राहील माझ्या हृदयाशी
येईल जरूर क्षण भाग्याचा
संपेल रात्र युगांतरीची
जाणवेल तुजला ओढ अंतरीची

No comments:

Post a Comment