NiKi

NiKi

Sunday, April 22, 2012



नसती झाली भेट तुझी ती, नसते मी हसले
हसता हसता मनही हुरळूनी, जीवलगा नसते मी भुलले

ढलत्या शामल तिसऱ्या प्रहरी
जरी केला तू गनिमी हल्ला
नसती झाली नजर फितुरी
नसता पडला किल्ला
लाल किनारी निशाण तव ते
नसते शिरी चढले

शरणांगतीने गालावरती
पत्र गुलाबी जरी ते लिहिले
नसती केलीस कैद प्रीती
नसते नाते जडले
निरोप घेता पाउल माझे
नसते कधी अडले

No comments:

Post a Comment