NiKi

NiKi

Wednesday, April 11, 2012

मला आवडेल तुझी वाट पहायला...

फुलपाखरांसोबत स्मृतींच्या पंखांनी उडायला

आभाळभर पसरलेल्या क्षणांना एकसंध शिवायला,

मला आवडेल तुझी वाट पहायला...

तुझे पाऊलश्वास मन लावून ऐकायला,

तू आल्यावर तुला एकटक पहायला

''किती बोलतोस रे तू? जरा धीर धर

बोलण्याआधी थोडा विचार तरी कर''

पण नाही; तू म्हणतोस:

''माझं असंचे!

मला आवडतात मनातले भाव पटकन सांगायला! ''

मी हसते, अन. मनातंच म्हणते,

'मला मात्र आवडेल हं तुझी वाट पहायला'...

रात्र झाली, की तुझ्या स्वप्नांमधे हरवून जायला,

तुझ्या कुशीत सारी दुःख विसरायला...

हातात हात मात्र ठेव हं कायमचा!

कारण मला आवडेल, जन्मभर ''फक्त तुझीच'' बनून रहायला

मला आवडेल तुझी वाट पहायला...!!!

No comments:

Post a Comment