तुझ्या मुक्या वेदनांना
शब्दातुनी साठवतो
कधीतरी गाईलेले प्रीतीगीत
आठवतो
साठवतो भाव तुझे कल्पनांच्या
आगारात आणि माझ्या उसस्यांना
आसवांची चांदरात
बाभूळल्या वाटांची ही
मिठी अनवाणी पाया
आयुष्याच्या प्राक्तनात अश्या
रक्ताळल्या रेषा
सारे कसे रेखांकित माझे सरळ
जीवन परी पुढल्या धुक्यात
वाट चुकला अंधार
कधी आसवांची सय
कधी सायीची असावे
अश्या प्रीती पसाऱ्यात
मन जळते निखारे
येथे संपुनिया सारे
सत्य मधले सुंदर
नेई भलतीच कडे
आश्वासानातले अर्थ .....
No comments:
Post a Comment