NiKi

NiKi

Wednesday, April 11, 2012

तू आणि मी..
मेहेंदी कशी खुळी रंगावी
रातराणी सम रात्र गंधावी

होता साक्षीस रातीचा चांदवा
प्रीतफुलांचा फुलला नव ताटवा

होती ती पहाटच गुलाबी ओली
गर्द धुक्यात कुठे अवचितच विरली

झाकून पापण्या नयनांत वसलो
आसुसलेल्या मुक्त स्पर्शात जगलो

थेंब टपोरे बोलले केसावरी
सूर अमृती सजले ओठावरी

कधी राग थोडा लटके रूसवे
होती पुन्हा नवनवीन आर्जवे

आजही तेंव्हासारखेच.....

लपू दर्पणी विसावू जरासे पुन्हा
नवी साद घालू एकमेका पुन्हा

साकारावे आज नवस्वप्न पुन्हा
जगावे त्याच वेडात आज पुन्हा  पुन्हा  पुन्हा .............................

No comments:

Post a Comment