NiKi

NiKi

Wednesday, April 11, 2012

पत्रात मावणार नाही,
इतके प्रेम करतेस..!
वाट नसून ओळखीची,
माझ्या कडे धावतेस..!!

धावणं नाही होत कमी,
मनी प्रीतीची ओढी..!
लिहिल्या शिवाय कळेल मला,
हीच माझी हमी..!!

कधी पडशील धावताना,
विचार मनी आणू नकोस..!
ओढ तुझी उत्कट,
मीही तुझाच विसरू नकोस..!!

प्रेमाशिवाय जगणं नाही,
मनी प्रीतीचा सागर..!
कितीही असला दुष्काळ,
प्रीतीची भरते घागर..!!

किती असतील गुंते,
तमा बाळगू नकोस..!
सोडवू सर्व प्रेमाने,
विश्वास मनचा सोडू नकोस..!!

असेल नेहमी माझी साथ,
जिंकेन - हरेन विचारू नको..!
जगावं आयुष्य आनंदे,
क्रोधाची माया जमवू नको..!

No comments:

Post a Comment