NiKi

NiKi

Monday, April 30, 2012



असेल जीवन रटाळ खडतर

परि सुंदर गमले तुझ्यामुळे



नैराश्याची हास्यफुले

दु:खाचे बनले सौख्यझुले

कणखर स्पर्शही कोमल बनला, 
तुझ्यामुळे

चित्रातील तू मूलाकार

तूच स्वरातील स्वर गंधार

तू शब्दातीत अगम्य रचना

काव्य ही बनले तुझ्यामुळे



तूच धारणा सकल धरेतील

सौंदर्य कल्पना मनु रचनेतील

चहु अंगानी विश्व प्रसवले, तुझ्यामुळे



सामर्थ्यची तू अणूरेणूतील

असणे ते तू अस्तित्वातील

शाश्वत जाणीव चिंतनातील

मी स्वतःस कळलो तुझ्यामुळे.

 ♥♥

No comments:

Post a Comment