NiKi

NiKi

Wednesday, April 11, 2012

तो: काय ग...
आज रडलीस वाटत?
कोणाशी तरी भांडलीस वाटत?
ती: तुला कस कळाल?
तो: हो कि नाही ते सांग...
ती: हो रे....
पण तुला कस कळाल?...
सांग ना...
तो: कळाल कस तरी...
ती: सांग ना ...
कस कळत रे तुला,
माझे डोळे पाणावलेले ते?...
कस कळत रे तुला,
आज मी खूप हसली ते?...
कस कळत रे तुला,
आज मी कोणाशी तरी भांडली ते?...
अन कस कळत रे तुला,
आज मी खूप खूप रडली ते?....




कस कळत रे तुला माझ मन?...
कशी कळते रे तुला,
तुझी येणारी ती आठवण?...
कस कळत रे तुला,
आज मी आहे खूप उदास?...
अन कस कळत रे तुला ,
माझ्याकडे आहे आज ,
तुला सांगायला काही तरी खास?...
सांग ना...
मला भेटताच,
कस ओळखतोस रे तू हे सगळ?...
सांग ना...
कस कळत रे तुला, माझ्या मनातल सगळ?...
तो: आग वेडे...
मला नाही तर कोणाला कळणार....
तुझ हे कोवळ मन,
माझ्याशिवाय कोण जाणणार...
प्रेम करतो न ग मी तुझ्यावर,
मग तुझ्या ह्या मनाला,
मी नाही तर कोण सांभाळणार...
सांग ना...
कोण सांभाळणार.. :)




हे ऐकून ती हस्ते,
अलगद त्याच्या मिठीत जाते...
प्रेमाचे ते गोड शब्द बोलते...
अन आयुष्याची सुरेल स्वप्न रंगवत सुटते...
आयुष्याची सुरेल स्वप्न..


ती रंगवत सुटते..

No comments:

Post a Comment