काल तुला पाहण्यात
मी असा हरवून गेलो
हृदयाचा ठोका चुकला
काय माहित कसा भानावर आलो
तुझ्या हसर्या चेहऱ्याने
अशी काय जादू केली
गालावरची खळी तुझ्या
मला स्तब्द करुन गेली
तुझ्या कुरळ्या केसांत
मन माझे गुंतले
गुरफटले असे ग
नकळत वेडेपिसे झाले
नयनातले भाव तुझ्या
मी वाचत होतो
हरवून मी मजला त्यात
मी मलाच शोधात होतो
No comments:
Post a Comment