NiKi

NiKi

Wednesday, April 11, 2012

काही क्षण...काही क्षण येतात जीवनात ,
का आले? म्हणून घाबरायच नसत..
काही व्यक्ति भेटतात जीवनात ,
का भेटतात ?अस विचारायच नसत..
असच जीवन जगायच असत....


काही धागे गुन्तात रुद्यात,
का गुंतले? म्हणून तोडायचे नसतात..
काही भोग भोगावेच लागतात,
का भोगायचे? म्हणून रडायच नसत..
असच जीवन जगायच असत....


काही क्षण हसरे तर काही दुःखाचे
असे का? म्हणून विचारायच नसत..
काही क्षण पालटतात,
का पालटले? म्हणून विचारायच नसत..
असच जीवन जगायच असत ...


जीवन हे एक काचेच भांड असत ,
त्याला तडा लागुन फूटल तर..
का फूटल? म्हणून विचारायच नसत..
असच जीवन जगायच असत....

No comments:

Post a Comment