NiKi

NiKi

Wednesday, April 11, 2012

'लक्ष कुठाय तुझ ?'


तुझा प्रश्न


'अं?काही नाही '


माझ उत्तर


'जा,मी नाही बोलत'


तू म्हणतेस

फुगलेले तुझे गाल पाहून

मी सुखावतो

'बोल ना'

म्हणुन विनवतो



'बर बर 'सांगायला जणू

ओठ तुझे विलग होतात

'मी नाही जा'

अरे!भलतेच शब्द बाहेर पडतात

मला आणखी गम्मत वाटते

मग तुझ ख़ास ठेवानितल

नाव घेउन

'राणी बोल ना प्लीज़ '

म्हणतो

मग तू उठून चालु लागतेस

आणि मी तुझ्यामागुन...

तू दणादणा पाय आपटत निघतेस

आणि मी मधुनच रस्त्याने

एखाद फूल खुडतो

तू रागातच

मी सुखातच

शेवटी तुझ एक पाय जोरात

माझ्या पायावर पडतो

आणि माझ्या मुठीतल ते फूल

जमिनीला मीठी मारत

आणि तू मला... अचानकच ...




No comments:

Post a Comment