कधी तू कधी मी
पण आपण हे सत्य सख्या
काही तुझं काही माझं
पण आपुलं हे विश्व सख्या
थोडा तू थोडा मी
पण दोघांत पूर्णत्व सख्या
क्षितीज फक्त भ्रम
पण आपण इंद्रधनुष्य सख्या
रोजचा तू रोजची मी
पण आपणात नाविन्य सख्या
चंद्र तू चांदणं मी
पण आपण आभाळ सख्या
तुझी मी माझा तू
पण आपण स्वतंत्र सख्या
माझ्यात मी तुझ्यात तू
पण आपणात देवत्व सख्या
सारं काही सर्वांसारख
पण आपण आपणच सख्या
No comments:
Post a Comment