NiKi

NiKi

Wednesday, April 11, 2012

वेड्या मना(तला) तू . . .

मन माझे तुला शोधी
तुझे मन कुणा?
माझे नयन तुला पाहती
तुझे नयन कुणा?
माझे हृदय तुझ्यासाठी
तुझे हृदय कुणा?
आहेस तू? मी कुठे?
एकदा तरी संगण
थोडा तरी समजून घे
तू मला शब्दाविना
अजून तुला भेटलेही नाही
तरी वाटतोस 'माझा' मला
भेट एकदा होणारच आपली
तू मला ओळखशील ना?
मी वाट बघेन तुझी
तू नक्की येशील ना?
'मी अन तू राज राणी'
असं तू तेव्हा म्हणशील ना?
आठवणीत तुझ्या कोमेजेन रे मी
मग बहर या आनंदाचा देशील ना?
मला आठवण येते तुझी
तुलाही माझी येत असेल ना?
कि नाहीस तू? माझ्यासाठी?

ए? असं बोलू नकोस ना!
काळात कसं नाही तुला माझं मन?
कसं करमत माझ्याविना ?
माझ्यासाठी तू तुझ्यासाठी मीच
तुला खरं वाटत नाहीय ना?
मी तुझीच आहे रे 'वेड्या'
तू आल्यावरच 'बघना' !!!

No comments:

Post a Comment