NiKi

NiKi

Monday, April 30, 2012

तुला उमगतं ना सारं…
बघ ना मी किती वेडा आहे
तुझा दिवस भेटुनही वाटतो थोडा आहे,
माझे असे नेहमीचेच वागणे
सांग ना मी खरचं वेडा आहे?
हा भेद तु खोलणार नाहीस
तु बोलणार नाही ठाऊक आहे
हा माझ्यातला बदल समझायचा की?
मी खरचं भावुक आहे।
प्रत्येक क्षण तुला द्यावासा वाटतो
तुझा हात हाती घ्यावासा वाटतो,
तुला समझतयं ना मी काय म्हणतोय
माझ्यातला मी,तुझाच व्हावासा वाटतो!
सांग ना ,तुला समझत ना सारं?
मी वेडा नाही ना?
तुला उमगत ना सारं?

No comments:

Post a Comment