माहित नाही कशी झाली भेट तुझी नि माझी
देवाला तरी कसं कळल मला गरज आहे तूझी
काहीच न बोलताही तू मला समजून घ्यायची
चूक माझी असली तरी स्वतःच रडून घ्यायची
मैत्रीतला हा गोडवा नकळत वाढत गेला
जेव्हा भांडलो तुझ्याशी त्रास मलाही झाला
मनापासून इच्छा आहे तुजसंग जगण्याची
पण नशिबान घात केला अन गंमत फसली वयाची
तुझं नि माझं चांगल जमत पण वयाने तू मोठी आहे
दुनियेच्या नजरेत मात्र प्रेमाची किंमत खोटी आहे
पुढल्या जन्मी अशीच भेट कि तुजसंग मला जगता यावं
या जन्मीच हतबल प्रेम त्या जन्मात बहरून यावं.........
No comments:
Post a Comment