विज म्हणावे तीला की निज म्हणावे
लख्खकन चमकते,उर्मिना जागवते
झरझर झपाझप.कडकडुन भेटते
नसानसाना जागवते,उतावीळ होउन
कागदावर उतरते,कागदाची मालकी घेते ती
कधी अश्रुच घेउन येते.स्वत:च ओलिचिंब होते ती
मलाही नखशिकांत ,भिजवते ती
तरसते , तरसवते ती
बरसते , उधाणते भरात ती
कशीही येउ द्या ,केव्हाही येउ द्या
अंतरंगी उसळते.शब्दांच्या अंगणात
धुमशान खेळते,रिंगन घालुन मिरवते ती
अधीर स्वप्नाना कवेत घेते ती
खोलात जाउन,रुतुन निघते ती
कविता माझी,अशीच येते
माझीच होउन,फ़ुलते ती
लख्खकन चमकते,उर्मिना जागवते
झरझर झपाझप.कडकडुन भेटते
नसानसाना जागवते,उतावीळ होउन
कागदावर उतरते,कागदाची मालकी घेते ती
कधी अश्रुच घेउन येते.स्वत:च ओलिचिंब होते ती
मलाही नखशिकांत ,भिजवते ती
तरसते , तरसवते ती
बरसते , उधाणते भरात ती
कशीही येउ द्या ,केव्हाही येउ द्या
अंतरंगी उसळते.शब्दांच्या अंगणात
धुमशान खेळते,रिंगन घालुन मिरवते ती
अधीर स्वप्नाना कवेत घेते ती
खोलात जाउन,रुतुन निघते ती
कविता माझी,अशीच येते
माझीच होउन,फ़ुलते ती
No comments:
Post a Comment