NiKi

NiKi

Friday, December 28, 2012

जग सांगते वारंवार
काळच उपाय दुःखावर
दिवस जातील तसे
दुःखाचा पडे विसर ।
परि या विधानाचा
बोध मला होत नाहीं
काळाची आवरणे पडली तरी
दुःख काही विसरत नाहीं ।
दिवसा दिवसा बरोबर
दुःखही वाढत आहे
मनातील आठवणींना
जास्तच उधाण येत आहे ।
आठवितो एकेक दिन
सखी-संगे घालविलेला
श्वासागणिक येतो आहे
गंध तिच्या सहवासा-मधला ।। 

No comments:

Post a Comment