NiKi

NiKi

Friday, December 28, 2012



स्वप्नांमध्ये वाट पहातो ...

येऊनि गाढ निद्रेत
वाट मी तुझी पहातो
तुझ्या भेटीसाठी ग
जीव माझा आसुसतो ।
विचार तुझा सदा-सर्वदा
जागेपणी मनीं वसतो
धूंद होऊनि त्यामध्ये
संगे तुझ्या वावरतो ।
स्पर्श गंध गोड तुझा
मनांस तो मोहवितो
अन मधूर स्वर तुझा
कायम कानी गुंजतो ।
नेत्रांतील भाव तरल
नजरेपुढे माझ्या दिसतो
हृदयांत सुक्ष्म अशी
वेदना असह्य उठवितो ।
स्मृतिंमध्ये दंग होउनि
मलाच हरवुनि बसतो
समाधान नच होई म्हणुनि
स्वप्नांमध्ये वाट पहातो ।।

No comments:

Post a Comment