स्वप्नांनी आज पाहीला
पुन्हा आठवांचा फुलोरा
त्या पाहिल्या चांदराती
अन रंगभरली नवी उगवती
शब्दांनी टिपून ठेविल्या
त्या अंतरीच्या गोष्टी
तुझी याद येता नव्याने
उमटले रोमांच गात्री
मल्हार साजरा कोकिळाचा
धुंद गंध मोग-याचा
चिंब पावसाने नाहलेला
हर एक क्षण अमृताचा
नाही पुनव चंदेरी
मज आठवली कोजागिरी
फिरुनी गात्रात सा-या
पुन्हा झंकारल्या सतारी
No comments:
Post a Comment